बॉलीवूड

Review: स्टुडंट नाही हा तर आहे डान्स ऑफ द इयर

Leenal Gawade  |  May 10, 2019
Review: स्टुडंट नाही हा तर आहे डान्स ऑफ द इयर

चित्रपट: स्टुडंट ऑफ द इयर 2 (student of the year 2)

निर्माता: धर्मा प्रोडक्शन 

दिग्दर्शक: पुनीत मल्होत्रा 

संगीत: विशाल-शेखर, सलीम- सुलेमान

स्टार कास्ट: टायगर श्रॉफ, तारा सुतारीया, अनन्या पांडे, आदित्य सील

स्टार: 2

टायगर, तारा आणि अनन्या यांचा #soty2 फायनली रिलीज झाला. अनेकांनी चित्रपटाचा ट्रेलर पाहून काही अंदाज बांधला असेल. पण तरीही चित्रपट कसा आहे हे तुम्हाला कळायला हवे ना?… तर चित्रपटाची सुरुवात होते देहरादूनमध्ये… रोहन सचदेव (टायगर  श्रॉफ, हा तो ज्याला स्टुडंट ऑफ द इयर व्हायचे आहे) तो एका सर्वसामान्य कॉलेजमध्ये शिकत असतो. मृदुला/मिया (तारा सुतारीया) या दोघांचे शाळेपासून प्रेम असते. मृदुलाला सेंट तेरेसा नावाच्या एका मोठ्या कॉलेजमध्ये अॅडमिशन मिळते. ती तिथे शिकायला जाते आणि तिच्या मागोमाग तिची स्वप्न पूर्ण करायला रोहन देहरादूनहून मसुरीला जातो. कॉलेजमध्ये गेल्यानंतर या दोघांच्या लव्हस्टोरीमध्ये येतो छोटासा ट्विस्ट… त्यांच्यामध्ये येते श्रेया (मानवची बहीण, अनन्या पांडे) आणि मग या चौघांमध्ये होते स्टुडंट ऑफ द इयर ची स्पर्धा…. आता कोणाला मिळणार स्टुडंट  ऑफ द इयरचा किताब यासाठी तुम्हाला हा चित्रपट पाहावा लागेल (तुम्हाला माहीत असेलही की टायगर हिरो म्हणून त्यालाच हा मान मिळेल पण तो ते कसा मिळतो हे सांगणारीच तर ही कथा आहे.)

अनन्या जिंकेल मन

ट्रेलर आल्यानंतर या चित्रपटात अनन्याचे काही काम असेल की नाही असा अनेकांना प्रश्न पडला होता. पण चित्रपटात जर कोणी अभिनय केला असेल तर तो केवळ अनन्यानेच… कारण तिच्या अभिनयामुळेच चित्रपटाने तग धरला असे म्हणायला हवे. कारण या फँटसी कॉलेजमधून बाहेर पडण्यासाठी केवळ अनन्याचे डायलॉगच मदत करु शकतात. तिची डायलॉग डिलीव्हरी इतकी नॅचरल आहे की, चित्रपटात तिलाच ही ट्रॉफी द्यावी असे तुम्हाला नक्की वाटेल.

आदित्य सीलचा मानव अंदाज लय भारी

चित्रपटात टायगर हिरो असून बोअर करत असला तरी आदित्य सील  निगेटिव्ह भूमिकेत असून चांगला वाटतो. श्रीमंत घरातील माजलेला मुलगा… ज्याला हरण्याची सवय नाही आणि तो जिंकण्यासाठी काहीही करु शकतो अशी भूमिका आदित्यची या चित्रपटात आहे. त्यामुळे आदित्यही सतत या चित्रपटाच्या केंद्रस्थानी असलेला दिसतो. त्याचा चित्रपटातील रेट्रो लुक तर त्याला इतका जास्त चांगला दिसत आहे की, त्याच्या प्रेमात नक्कीच पडायला होतं.

आभासी दुनिया आणि  सगळे काही अर्धवट

चित्रपट पाहिल्यानंतर ही आभासी दुनिया आहे हे माहीत होतचं. कारण असे कॉलेज अस्तित्वात असतं कुठे. हा प्रश्न पडतो. जिथे अभ्यास कमी, नाचं गाण जास्त आणि नको ती स्पर्धा( जी कुठे अस्तित्वात नसते.)  शिवाय चित्रपटात सगळ्याच गोष्टी अर्धवट दाखवण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक गोष्टींचा कधी कधी ताळमेळ बसत नाही.

चित्रपटात नाही ते गाणं

चित्रपटात तारा, टायगर आणि अनन्या या तिघांचे एक गाणे आहे.. मुंबई दिल्ली की छोरिया रातभर नही सोंदिया…. हे  गाणे चित्रपटात नाही. चित्रपट संपल्यानंतर ही गोष्ट लक्षात येते. त्यामुळे या गाण्याला वेळेमुळे कात्री लावली की, काय असा प्रश्न पडतो. तर आलियाचे हुकअप गाणं हे चित्रपटाच्या शेवटी आहे. शिवाय ये जवानी हे दिवानी या गाण्यामध्ये will smith अगदी काहीच सेकंदासाठी हिंदी गाण्यावर ठुमके लगावताना दिसत आहे.

म्हणून पाहावा चित्रपट

तुम्हाला जर काही अगदीच टाईमपाससाठी काहीतरी पाहायचे तर तुम्ही हा चित्रपट एकदा नक्कीच पाहू शकता.चित्रपटातील काही सीन्स नक्कीच चांगले आहेत. म्हणजे इंटरवलनंतर आलेले सामने पाहण्यासारखे आहेत. त्यालाही धर्मा टच असला तरी ते सामने मोठ्या पडद्यावर पाहायला बरे वाटते.

म्हणून पाहावत नाही चित्रपट

चित्रपटाचा पहिला भाग इतका संथ आहे की, पहिल्या भागापर्यंत सगळं काही मंगलच आहे असे वाटते. त्यामुळेच पहिला भाग कधी संपेल असे वाटते. तुम्ही जर या चित्रपटाकडून काही अपेक्षा केली असेल तर मग हा चित्रपट निराश करतो आणि हा चित्रपट पाहण्याची तुमची इच्छा मरुन जाते.

हेही वाचा

प्रेमाच्या नात्याला लागलेला ‘कलंक’,वाचा चित्रपटाचा Review

सौजन्य- Instagram)

Read More From बॉलीवूड