मनोरंजन

अभिनेता सुबोध भावे लवकरच येत आहे एका नव्या भूमिकेत

Aaditi Datar  |  Nov 25, 2019
अभिनेता सुबोध भावे लवकरच येत आहे एका नव्या भूमिकेत

छोट्या पडद्यावर सध्या प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी एक से एक कार्यक्रम प्रत्येक चॅनलवर सादर केले जात आहेत. 2 डिसेंबरपासून छोट्या पडद्यावर दाखल होणारा लोककलांवर आधारित “जय जय महाराष्ट्र माझा” हा कार्यक्रम त्यापैकीच एक. महाराष्ट्रावर प्रेम असणाऱ्या प्रत्येकाचा आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीविषयी जाणून घेण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकासाठीचा हा कार्यक्रम. सोनी मराठीवर सुरू होणाऱ्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्राने आजवर जपलेल्या परंपरांचं, संस्कृतीचं आणि लोककलांचं सिंहावलोकन होणार आहे. पारंपरिक लोककलांनी नटलेला हा कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्राच्या विविध भागांमधील लोककला पुनरुज्जीवित करण्याचा एक प्रयत्न आहे.

सुबोध दिसणार सूत्रसंचालकाच्या भूमिकेत

या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला अजून एक नवी गोष्ट पाहायला मिळणार आहे. ती म्हणजे महाराष्ट्राचा लाडका आणि गुणी अभिनेता सुबोध भावे आतापर्यंत अनेक रूपात प्रेक्षकांसमोर आलेला आहे. पण या कार्यक्रमाच्या निमित्ताने तो संपूर्ण महाराष्ट्राला सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे. याबाबतची पोस्टही सुबोधने काही दिवसांपूर्वी त्याच्या इन्स्टा अकाउंटवर शेअर केली होती. ज्यामध्ये सुबोधने लिहीलं होतं की, मी परत येतोय….छोट्या पडद्यावर ,मोठा कार्यक्रम घेऊन…#जयजयमहाराष्ट्रमाझा. तुला पाहते रे या मालिकेनंतर सुबोधचा हा टीव्हीवरील पहिला रिएलिटी शो आहे.

बिग बी आणि सुबोध भावे ‘AB आणि CD’ च्या निमित्ताने येणार एकत्र

कार्यक्रमाचं वैशिष्ट्य

ज्या लोककलांनी महाराष्ट्र घडला, एक झाला अशा शाहिरी, लावणी, पोवाडा, तमाशा, भजन, कीर्तन, भारूड, गोंधळ, वासुदेवसारख्या विविध लोककलांचा आविष्कार या मंचावर पाहता येणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शकुताई नगरकर, शाहीर अमर शेखांची परंपरा चालवणारे निशांत शेखसारखे कलाकार या कार्यक्रमातून प्रेक्षकांना भेटणार आहेत.

प्रेक्षकांसाठी खास मेजवानी

2 डिसेंबरपासून सोमवार आणि मंगळवार रात्री 9 वाजता सादर होणाऱ्या या कार्यक्रमाची सुरूवात महाराष्ट्र गीताने होणार असून आदर्श शिंदे, नंदेश उमप, कार्तिकी गायकवाड, प्रसनजीत कोसंबीसारखी मंडळी आपल्या लोककलांचा वारसा प्रेक्षकांसमोर सादर करणार आहेत. दिगज्ज कलाकारांसोबत होणार लोककलांचा जल्लोष. तेव्हा महाराष्ट्रातील लोककलांच्या उत्सवात तुम्हीही सहभागी व्हा.

सर्वाधिक मानधन घेणारे मराठी कलाकार

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

मुलींना आवडतात वयस्क पुरुष, चित्रपट मालिकांमध्ये दिसतोय ट्रेंड

Read More From मनोरंजन