Fitness

गोड खाण्याने नाही तर ‘या’ पेयांमुळे वाढतं वजन, शक्यतो टाळा ही पेयं

Dipali Naphade  |  Oct 18, 2019
गोड खाण्याने नाही तर ‘या’ पेयांमुळे वाढतं वजन, शक्यतो टाळा ही पेयं

वजन वाढणं ही आयुष्यातील एक मोठी समस्या आहे.  आपल्या बदलत्या लाईफस्टाईलमुळे जेवणाची वेळ सांभाळणं कठीण जातं.  तसंच इतर अनेक पदार्थ असे येता जाता खाल्ले जातात. त्यामुळे वजनावर नियंत्रण राहात नाही. बऱ्याचदा गोड खाण्याने वजन वाढतं असं म्हटलं जातं. पण हे खरं आहे का असाही प्रश्न पडतो. काही प्रमाणात खरं आहे. पण त्याव्यतिरिक्त अशी काही पेयं आहे ज्यामुळे तुमचं तुमच्या वजनावर नियंत्रण राहात नाही. अशी काही लिक्विड ड्रिंक्स आहेत ज्यामुळे तुमचं वजन वाढतं आणि याबद्दल तुम्हाला माहितीही नसते. तुम्ही कोणत्याही पेयांमुळे वजन वाढत नाही या समजामुळे अतिरिक्त प्रमाणात पेयं पिता आणि त्याचा परिणाम मात्र उलटाच होतो. आम्ही तुम्हाला अशाच काही पेयांबद्दल सांगणार आहोत जी प्यायल्याने तुमच्या वजनामध्ये वाढ होते. गोड पदार्थ नाही तर अशी पेयं तुम्हाला त्रासदायक ठरू शकतात. 

1. पाण्यात साखर घोळून पिणं

Shutterstock

बऱ्याच जणांना जेवणानंतर अथवा दिवसभरात पाण्यामध्ये साखर घोळून प्यायची सवय असते. पण ही सवय त्यांना फारच त्रासदायक ठरू शकते. कारण त्याचा सर्वात जास्त परिणाम होतो तो वजन वाढण्यामध्ये. साखर पाण्यात घोळून पिणाऱ्यांचे रक्तातील शुगर प्रमाण अधिक असतं हे अभ्यासातून सिद्ध झालं आहे. बरेच जण लिक्विड डाएट अंतर्गत हा प्रयोग जास्त करतात. पण त्याचा असा उपयोग करणं चुकीचं आहे. तुम्ही डायरेक्ट स्वरूपात साखर पाण्यातून घेत असल्याने साखर रक्तात मिसळते आणि वजन वाढीवर नियंत्रण राहात नाही. 

2. चहा आणि कॉफीचं अतिसेवन

Shutterstock

चहा आणि कॉफी हे प्रमाणात पिणं कधीही आरोग्यासाठी लाभदायक ठरतं. पण हेच प्रमाण जर तुम्ही अति केलंत अथवा चहा वा कॉफीचं अतिसेवन केल्यास, तुमच्या वजनामध्ये वाढ होण्यास कारणीभूत ठरतं. यातील कॅफेन तुमच्या शरीराला त्रासदायक ठरून तुमचं वजन वाढण्यासाठी याची मदत होते. तसंच तुम्हाला कॅफेनमुळे चहा आणि कॉफीचं एकप्रकारे व्यवस लागतं. जे तुमच्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकतं. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करणं हे कधीही वाईट असतं हे नेहमी लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. 

3. कोल्ड ड्रिंक्सचा होतो वाईट परिणाम

Shutterstock

बऱ्याच जणांना पेप्सी, मिरींडा यासारख्या कोल्ड ड्रिंक्स पिण्याची सवय असते. पण ही सवय तुमचं वजन वाढायला कारणीभूत ठरते. या पेयांमध्ये साखरेचं प्रमाणे हे अधिक असल्याने तुमच्या शरीरामध्ये साखर वाढण्यास डायरेक्ट मदत होते. ही साखर तुमच्या शरीरातील रक्तात डायरेक्ट मिसळते. त्यामुळे तुम्हाला किडनी, हार्ट, लिव्हर यावरदेखील परिणाम होत असतो. 

तुमचं वजन वाढवायचं आहे का? तर जाणून घ्या खास गोष्टी आणि फॉलो करा १० टीप्स

4. सरबत पिणं टाळा

Shutterstock

कोणत्याही प्रकारच्या सरबतामध्ये जास्त प्रमाणात साखर असते. त्यामुळे याच्या सेवनानंतर अचानक शरीरामध्ये साखरेचं प्रमाण वाढून मधुमेहासारखे आजार होऊ शकतात. त्यामुळे वेळीच आपण काळजी घेणं गरजेचं आहे. याचा परिणाम म्हणजे शरीरातील काही भाग खराब होण्यामध्ये होऊ शकतो. उदाहरणार्थ किडनी फेल होण्यासाठीदेखील सरबताचं नियमित सेवन धोकादायक ठरू शकतं. 

संध्याकाळी कधीही खाऊ नका हे पदार्थ नाहीतर वाढेल वजन

5. पेय पदार्थात वरून साखर पेरणं

Shutterstock

तुम्ही वजन कमी करण्यासाठी विविध पेयं पिण्यात येतात. पण बऱ्याचदा स्मूदी अथवा अन्य पेयांमध्ये वरून साखर पेरली जाते. पण हे योग्य नाही. याने वजन कमी होण्याऐवजी तुमचं वजन अधिक वाढतं. कारण साखर तुम्ही जर अशाप्रकारे मिसळली तर त्याचा शरीरावर उलट परिणाम होत असतो हे लक्षात ठेवायला हवं. 

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.

मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

Read More From Fitness