नेपोटीझम हा विषय बॉलीवूडमध्ये सुरु झाल्यापासून अनेकांचे लक्ष सध्या स्टार किडकडे जास्त असते. स्टार किड कसे दिसतात. ते काय करतात ते चित्रपटांमध्ये काम करणार का? अशा अनेक चर्चा त्यामुळे सोशल मीडियावर होत असतात. आता अनेक सेलिब्रिटींची मुलंही चित्रपटात येण्याच्या मार्गावर आहेत. त्यातील अनेकांना आताच सोशल मीडियामधून पसंती मिळत आहे. स्टार किडमध्ये सध्या सगळ्यात जास्त पसंती मिळत असलेली स्टारकिड म्हणजे अजय आणि काजोलची मुलगी निसा.. पण त्यासोबतच जर कोणाच्या हॉटनेसची चर्चा होत असेल तर ती आहे शाहरुखची मुलगी सुहाना… आता तिने सोशल मीडियावर असे फोटो शेअर केले आहेत की, आता तुम्हाला उ ला ला असेच म्हणावे लागेल.
लॉकडाऊनमध्ये रिया कपूरला येत आहे सोनमची आठवण, शेअर केला बालपणीचा फोटो
सोशल मीडियावर तिच्या या अदा
सुहाना नेहमीच तिच्या हॉट अंदाजात दिसते. तिने तिचा इन्स्टाचा प्रोफाईल फोटो अपलोड केला आहे. हा फोटोच सध्या सगळ्यात जास्त व्हायरल होत आहे. सूर्याचे किरण चेहऱ्यावर घेत गोड हसणाऱ्या सुहानाचा फोटो तिच्या चाहत्यांना भारीच आवडला आहे. तिचे फोटो तिच्या फॅन पेजवरही शेअर केले जात आहेत. त्यामुळेच अचानक तिचा फोटो पुन्हा एकदा सोशल मीडियावर जास्त पाहिला जात आहे.
बॉलीवूडच्या प्रसिद्ध कुटुंबांचे जावई
सुहानाने शेवटचा फोटो शेअर केला मार्चमध्ये
आता तुम्ही सुहानाच्या प्रोफाईला व्हिझिट द्याल तर तिने सगळ्यात शेवटचा फोटो हा 30 मार्चला पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये ती काळ्या रंगाच्या सेक्सी टॉपमध्ये दिसत आहे. तिच्या या हॉट फोटोलाही खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे. त्यानंतर मात्र तिने तिचा एकही फोटो शेअर केला नाही.
अभिनेता म्हणून चालला नाही पण गायक म्हणून झाला हिट
सुहाना कुठे आहे?
सुहाना सध्या काय करत आहे असा प्रश्न पडला असेल तर ती अमेरिकेत सध्या शिक्षण घेत आहे. पण ती सध्या अमेरिकेत आहे की भारतात यासंदर्भात कोणतीही माहिती मिळू शकली नाही. त्यामुळे ती कुठे आहे ते कोणालाच माहीत नाही. आता तिच्या अभिनयाबद्दल सांगावे तर ती तिच्या कॉलेजमधून अभिनयाचे धडे घेत आहे. ती अनेक नाटकांमधून काम करत आहे. शिवाय तिने ‘द ग्रेट पार्ट ऑफ ब्लू’ नावाच्या एका शॉर्ट फिल्ममधून कामही केले आहे.
सुहाना येईल का बॉलीवूडमध्ये
सुहानाच्या बॉलीवूड प्रवेशाविषयी बऱ्याच चर्चा होत्या. तिची अभिनयाची आवड पाहता ती शाहरुखप्रमाणे बॉलीवूडवर राज्य गाजवेल असे म्हटले जात होते. पण तिच्या त्वचेच्या रंगावरुन आधी तिला बरेच ट्रोल केले गेले.आजही अनेकांना ती फारशी आवडत नाही. तर काहींच्या गळ्याचे ती अक्षरश: ताईत आहे. तर दुसरीकडे शाहरुखचा मुलगा मात्र अनेकांना शाहरुखचं अपडेटेड व्हर्जन वाटतो. आर्यन शाहरुख खान हा सुंदर आणि हिरो मटेरिअल असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्याने डेब्यू करावा असे अनेकांना वाटते. पण त्याच्या डेब्यूबद्दल शंका आहेत. कारण त्याला अभिनयात तसा इंटरेस्ट नाही. पण तो डबिंगचं काम करतो हे अनेकांना माहीत नसेल.
आता राहिला विषय सुहानाचा तर तिच्या अदा या उ लाला असतात हे मानायला हवे.
घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा. https://popxo.app.link/9irZMGx6i5आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा.
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade