टेलीव्हिजनवर निरनिराळ्या धाटणीच्या मालिका सतत येत असतात. टेलिव्हिजन मालिका पाहणारा एक प्रेक्षकवर्ग असतो. ज्यांना या मालिका आणि मालिकांमधील पात्र ही आपल्या घरातील सदस्यच वाटत असतात. आजही जुन्या मालिकांच्या आठवणीत रमणारे काही चाहते नक्कीच आहेत. सध्या ‘एक घर मंतरलेलं’ या रहस्यमयी मालिकेमुळे प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन होत आहे. या मालिकेत आता एका नव्या पात्राची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे या मालिकेला आता एक नवं वळण मिळण्याची शक्यता आहे.
एका मंतरलेल्या घरात आता कोण आलं
सध्या मालिकांच्या विश्वात मनोरंजनासोबत रहस्यकथांना चांगली लोकप्रियता मिळत आहे. रात्रीस खेळ चाले, वर्तुळ, ग्रहण अशा गूढ आणि रहस्यमय मालिकांप्रमाणेच एक घर मंतरलेलं ही मालिका प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहे. एक घर मंतरलेले या मालिकेत मृत्युंजय बंगल्याचं गूढ, या रहस्याचा गार्गीच्या आयुष्याशी आलेला संबंध आणि त्यामुळे तिच्या आयुष्यात घडत असलेल्या अनाकलनीय घटना यांनी प्रेक्षकांवर जादू केलेली आहे. प्रत्येकाला आपल्या घराविषयी अपार ओढ असते. मात्र काही घरं अशीही असतात जी तुम्हाला ओढून घेतात. जेव्हा असं एखादं घर अथवा वास्तू तुमच्या संपर्कामध्ये येते तेव्हा सुरू होते एक नवी रहस्यकथा. अशीच गूढ आणि गुंतागुंत असलेल्या रहस्यांनी भरलेली या मालिकेची कहाणी आहे. या मालिकेत सुरूची आडारकर आणि सुयश टिळक महत्त्वाची भूमिका साकारत आहेत. सुरूची या मालिकेत गार्गी महाजन नावाच्या रिपोर्टरची भूमिका साकारत आहे. थरार आणि गूढ रहस्यांनी सर्वांनाच खिळवून ठेवणाऱ्या या मालिकेत आता एक नवे पात्र प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ‘मृत्युंजय’चे रहस्य अधिकच गुंतागुंतीचे होत असताना, ते रहस्य सोडवण्यासाठी गार्गीला हे पात्र मदत करणार आहे. नरहरी खंडागळे असं या मालिकेतील पात्राचं नाव आहे. नरहरी खंडागळे हे एक सरकारी अधिकारी असून ही भूमिका अभिनेता सुनिल बर्वे साकारणार आहे. सुनिल बर्वेला या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते नक्कीच उत्सुक आहेत.
नेमकं काय घडतंय या मंतरलेल्या घरात…
नरहरी खंडागळे यांनी लिहिलेला एक महत्त्वाचा मजकूर नुकताच गार्गीच्या हाती लागला आहे. त्यामुळे गार्गी नरहरी खंडागळेंचा शोध घेत आहे. सुनिल बर्वे अर्थात नरहरी खंडागळे यांच्याशी लवकरच गार्गीची भेट होणार आहे. त्यामुळे गार्गीला मृत्युंजय बंगल्याच्या रहस्याविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी ते सांगणार आहेत. बंगल्याचं गूढ रहस्य सोडवण्यासाठी या गोष्टी गार्गीला कशा मदत करणार आणि त्यातून नेमकं काय साध्य होणार हे पाहणं त्यामुळे उत्सुकता वाढवणारं आहे. कदाचित पुढील भागात खंडागळे आणि गार्गी यांच्यात घडणारं संभाषण एका नव्या रहस्याला जन्म घालू शकतं किंवा त्यातून या मुळ रहस्याच्या शोधाला एखादी नवी कलाटणी मिळू शकते. यासाठीच या पुढील भागांमधून या गोष्टींची उकल पाहण्यासाठी चाहते नक्कीच उत्सुक आहेत. मृत्युंजय बंगल्याचं रहस्य जाणून घेण्यासाठी सध्या गार्गी सध्या नवनवीन पूरावे गोळा करत आहे. त्यामुळे खंडागळेच्या मदतीने गार्गीला एखादा महत्त्वाचा दोरा हाती लागण्याची शक्यता आहे. असं झाल्यास प्रेक्षकांसमोर आणखी नवनवीन गोष्टी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे एक मंतरलेलं ही मालिका सध्या प्रेक्षकांना एका जागी खिळवून ठेवण्यात यश मिळवणार हे नक्की!
अधिक वाचा
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade