सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला आता महिन्याहून अधिक काळ उलटून गेला आहे. पण अजूनही त्याच्या आत्महत्येवर अद्यापही अनेकांना विश्वास बसत नाही.त्यामुळे त्याच्या या आत्महत्येची चौकशी व्हावी अशी मागणी त्याच्या कुटुंबियांनी आणि त्याच्या फॅन्सनीही केली होती. त्यानुसार पोलिसांनी आता चौकशीला वेग आणला आहे. सुशांत सिंहच्या आत्महत्येप्रकरणी या आधी त्याच्या कुटुंबियांची आणि त्याच्या जवळच्या व्यक्तिंची चौकशी करण्यात आली आहे. पण आता या प्रकरणी अधिक लोकांची चौकशी करण्यात येणार आहे असे कळत आहे. आता यामध्ये करण जोहरच्या नावाचाही समावेश आहे. करण जोहर याचीही चौकशी होणार असल्याचे कळत आहे. त्यामुळे आता करण जोहर काय सांगणार याकडे अनेकांचे लक्ष आहे.
खळबळजनक कृत्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या पूनम पांडेने केला साखरपुडा
अनेकांच्या मागणीमुळे होणार चौकशी
सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येसाठी इंडस्ट्रीतल्या अनेक बड्या असामींना जबाबदार ठरवण्यात आले आहे. यामध्ये अनेक चित्रपट निर्माते, दिग्दर्शक यांचा समावेश आहे. निर्माते महेश भट यांचीही यासंदर्भात चौकशी करण्यात आली आहे. पण यामध्ये सतत लोकांनी मागणी केलेले नाव होते ते म्हणजे करण जोहर. नेपोटिझमसाठी जबाबदार असलेला करण जोहर सुशांतच्या आत्महत्येसाठी जबाबदार असल्याचे अनेकांचे म्हणणे होते. करणच्या चित्रपटातून सुशांतला बाहेरचा मार्ग दाखवण्यात आल्याचेही काहींनी म्हटले होते. त्यामुळे तो तणावाखाली होते. शिवाय त्याच्याशी इंडस्ट्रीमध्ये नेहमीच दुजाभाव केला जात होता. या सगळ्या गोष्टी पोलिसांच्याही कानी आल्या आहेत. सतत करण जोहरचे नाव आल्यामुळे त्याचीही या संदर्भात चौकशी करण्यात येणार आहे, असे कळत आहे.
चौकशीत महेश भट् यांनी दिली माहिती
नेपोटिझमसाठी आणखी काही नावे पुढे येत आहेत. त्यामध्ये आणखी एक नाव आहे ते म्हणजे महेश भट्ट यांचे. महेश भट यांची चौकशी सोमवारी करण्यात आली (27 जुलै 2020) त्यावेळी त्यांनी सांगितले की, सुशांत सिंह आणि त्यांची भेट 2018 आणि 2020 मध्ये फक्त दोनवेळाच झाली. त्यावेळी त्यांनी एका पुस्तकाची चर्चा केली पण सडक 2 मध्ये त्याला घेण्यासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही याचा खुलासा त्यांनी केला.
पौलोमी देवी’ साकारण्यासाठी सारा खान सज्ज, संतोषी मॉं मालिकेत घेणार दमदार एन्ट्री
अनेकांनी उठवला नेपोटिझमवर आवाज
कंगना रणौत हिने या आधीही नेपोटिझमवर आवाज उठवला आहे. बॉलीवूडमध्ये चाललेल्या या स्कॅमबद्दल तिने अनेकदा बोलून दाखवले आहे. स्टार किडच्या मुलांमध्ये कोणतेही टॅलेंट नसतानाही त्यांना अनेकदा संधी दिली जाते. पण जे कलाकार खरेच चांगले आहेत. त्यांना केवळ कोणीही गॉडफादर नसल्यामुळे काम दिले जात नाही. त्यांचा आत्मविश्वास कमी करण्याचा कामही केले जाते. जे कलाकार यामध्ये तरुन जातात ते त्यातून बाहेर काढण्याचा मार्गही काढतात. पण जे कलाकार यामध्ये आत्मविश्वास गमावून बसतात . त्यांना मात्र सुशांतशिवाय काही पर्याय नसतो. सुशांत केवळ 34 वर्षांचा होता. 14 जून रोजी त्याने त्याच्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. इतका चांगला यशस्वी कलाकार आत्महत्या करु शकत नाही असा विश्वास सगळ्यांनाच होता. म्हणूनच त्याच्या आत्महत्येसंदर्भात अधिक चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.
आता करण जोहरच्या चौकशीअंती काय समोर येईल ते पाहायला हवे.
सुशांतचा ‘दिल बेचारा’ लॉकडाऊनमधला सुपर डुपर हिट चित्रपट
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade