बॉलीवूड

सुशांतचा ‘दिल बेचारा’ लॉकडाऊनमधील सुपर डुपर हिट चित्रपट

Leenal Gawade  |  Jul 26, 2020
सुशांतचा ‘दिल बेचारा’ लॉकडाऊनमधील सुपर डुपर हिट चित्रपट

लॉकडाऊनमध्ये इंटटेन्मेंटचे एकमेव साधन म्हणजे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म. अनेक इंग्रजी चित्रपट या माध्यमातून रिलीज होत आहेत. पण ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणाऱ्या सगळ्या चित्रपटांचे रेकॉर्ड सुशांत सिंह राजपूतच्या ‘दिल बेचारा’ या चित्रपटाने तोडले आहेत. अवघ्या काहीच तासात या चित्रपटाला इतक्या प्रेक्षकांची पसंती मिळाली की, हा चित्रपट लॉकडाऊनमधील सुपर डुपर हिट चित्रपट ठरला आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांचे डोळे चित्रपटाची स्टोरी ऐकून पाणावले तर काहींचे इतक्या खोडकर सुशांत परत दिसणार नाही म्हणून पाणावले.

सुपरस्टार होण्यासाठी या कलाकारांनी बदललं स्वतःचं नाव

ओपनिंगलाच मिळाला चांगला प्रतिसाद

Twitter

ओटीटी माध्यामातून चित्रपट रिलीज करण्याचा निर्णय घेतल्यानंतर या चित्रपटाला किती प्रतिसाद मिळेल अशी शंका होती. कारण आजही अनेकांकडे हॉटस्टार किंवा नेटफ्लिक्स नाही. पण लॉकडाऊनमुळे सगळ्यांनीच आपला जास्तीत जास्त वेळ या अॅपवर घालवला आहे. सुशांत सिंह राजपूतचा ‘दिल बेचारा’ हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर अवघ्या काही तासातच या चित्रपटाला इतका चांगला प्रतिसाद मिळाला की, हॉटस्टारही याचा भार सहन करु शकला नाही. हॉटस्टारही काही काळासाठी क्रॅश झाले. त्यामुळे ओपनिंगलाच या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. इतकेच नाही तर त्याला रेटिंगही खूप चांगले मिळाले आहे. या चित्रपटाला 10/10 इतके रेटिंग देण्यात आले. तर त्याला इतर प्लॅटफॉर्मवरही 9.6 इतके रेटिंग मिळाले. त्यामुळे हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवरील सुपर डुपर चित्रपट ठरला.

नेपोटिझम वादात ज्येष्ठ अभिनेते रणजीत यांची उडी, केला आरोप

कोटीच्या घरात गेले व्ह्युज

दिल बेचारा 24 जुलै रोजी रिलीज झाला आणि अवघ्या 18 तासात तब्बल 7.5 कोटींहून अधिक लोकांनी हा चित्रपट पाहिला आणि अजूनही हा आकडा वाढत चालला आहे. सुशांतच्या अभिनयाची तारीफ या आधीही अनेक चित्रपटांमध्ये झाली आहे. पण हा चित्रपट पाहिल्यानंतर त्याचे फॅन्स अधिकच कोसळले आहेत. कारण चित्रपटाची तारीफ ऐकण्यासाठी सुशांत मात्र इथे नसणार आहे. याचे अनेकांना वाईट वाटत आहे.सुशांत सिंह राजपूत असा अचानक आपल्यातून निघून जाईल असे कोणालाही वाटले नव्हते. पण आज तो असता तर या चित्रपटाच्या यशाला पाहून उत्साही झाला असता असे त्याच्या फॅन्सना वाटते.

आणखीही चित्रपट आहे रिलीजच्या तयारीत

लॉकडाऊनमध्ये शिथिलता आली असली तरीही अद्याप थिएटर सुरु होण्यासंदर्भात कोणत्याही सूचना मिळालेल्या नाहीत. त्यामुळे चित्रपटाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी अनेक चित्रपट निर्मात्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. या चित्रपटानंतर आता अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ या चित्रपटाची प्रतिक्षा आहे. या सोबतच अनेक मोठ्या कलाकांराचे चित्रपटही येत्या काळात रिलीज होणार आहेत. 

जर तुम्ही अजूनही सुशांतचा हा शेवटचा चित्रपट पाहिला नसेल तर पाहा. कारण हा चित्रपट तुम्हाला जगण्याची नवी प्रेरणा देईल. 

कोरिओग्राफर रेमोने बायकोसाठी लाटण्याचा वापर न करताच बनवला ‘स्वीट पराठा’

Read More From बॉलीवूड