बॉलीवूड

तापसी पन्नू ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, भारतीय चित्रपट संस्थेने जाहीर केली यादी

Trupti Paradkar  |  Jan 25, 2022
तापसी पन्नू ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, भारतीय चित्रपट संस्थेने जाहीर केली यादी

अभिनेत्री तापसी पन्नूने बॉलीवूडमध्ये आज स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं आहे. तिचा बेधडक अंदाज आणि दमदार अभिनय अनेकांचा भुरळ घालतो. सोशल मीडियावरही तापसी चांगलीच अॅक्टिव्ह असते. ती सोशल मीडियावरून तिच्या आगामी प्रोजेक्टविषयी चाहत्यांना माहिती देते. आता तापसीच्या आयुष्यात एक असा आनंदाचा क्षण आला आहे जो आवर्जून तिने चाहत्यांसोबत शेअर केला आहे. भारतीय चित्रपट संस्थेद्वारा तापसीने नाव 2021 च्या सर्वोकृष्ट अभिनेत्रीच्या यादी अग्रेसर आहे. तापसीच्या ‘हसीन दिलरुबा’ या चित्रपटातील सक्षम अभिनयासाठी तिचा गौरव करण्यात येत आहे. तापसीने ही आनंदाची बातमी सर्व चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

सोशल मीडियावर रंगलीय सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाची चर्चा

तापसीने शेअर केली पोस्ट

तापसी पन्नू नेहमीच सोशल मीडियावरून चाहत्यांच्या संपर्कात असते. सध्या तिने ट्विटरवरून एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यानुसार भारतीय चित्रपट संस्थेने 2021 च्या चित्रपटांविषयी एक सर्वेक्षण जाहीर केलं आहे. या सर्वेषणासाठी आईएफआईने देशभरातील सात चित्रपट समीक्षकांना आमंत्रित केलं होतं. त्यांनी जाहीर केलेल्या यादीत तापसी पन्नूचा ‘हसीन दिलरूबा’ हा चित्रपट दहापैकी पहिल्या नंबरवर आहे. 

तापसी पन्नूचा हसीन दिलरूबा

तापसी पन्नूची मुख्य भूमिका असलेला ‘हसीन दिलरूबा’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफार्म नेटफ्लिक्सवर 2 जुलैला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात तापसीसह अभिनेता विक्रांत मैसी आणि हर्षवर्धन राणे मुख्य भूमिकेत होते. चित्रपटाचे कथानक एक मर्डर मिस्ट्रीवर आधारित होते. मात्र या चित्रपटात एक मजेदार ट्विस्ट लव्ह स्टोरीत दाखवण्यात आला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन विनिल मैथ्यूने केले होते. या चित्रपटातील तापसीच्या भूमिकेसाठी तिचे नामांकन भारतीय चित्रपट संस्थेच्या बेस्ट चित्रपटाच्या यादीत झाले आहे. तापसी लवकरच लूप लपेटा या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे.  त्यानंतर शाबास मिठू आणि ब्लर अशा आणखी दोन चित्रपटात तापसीची मुख्य भूमिका असेल. 

पाहा रोहित आणि जुईलीच्या लग्नाचा थाट, या सेलिब्सनी लावली होती हजेरी

प्रेक्षकांसह कलाकारांनाही उत्सुकता ‘लोच्या झाला रे’ची

Read More From बॉलीवूड