बॉलीवूड

तापसी पन्नूला करायची आहे ‘या’ क्रिकेटरची भूमिका

Aaditi Datar  |  Jul 14, 2019
तापसी पन्नूला करायची आहे ‘या’ क्रिकेटरची भूमिका

बॉलीवूड स्टार तापसी पन्नू (Taapsee Pannu) ला करायची आहे भारतीय महिला क्रिकेटर मिताली राजची भूमिका. या चित्रपटासाठी अनेक दिवसांपासून तापसीचं नाव आघाडीवर आहे आणि आता तापसीनेही हा बायोपिक करण्यात रस दाखवला आहे.

मीडियाला सांगितली मनातली गोष्ट

मिताली राज (Mithali Raj) बायोपिकबाबत तापसीला विचारला असता तिने मीडियाला सांगितलं की, जर मला हा रोल मिळाला तर मला क्रिकेट खेळायला खूपच मजा येईल. जर तुमच्यापैकी कोणी या चित्रपटाच्या निर्मात्यांना ओळखत असल्यास त्यांना प्लीज माझं नाव सुचवा. कारण मला खरंच हा सिनेमा करायचा आहे. 

काय आहे या भूमिकेबाबत आग्रही असण्याचं कारण

तापसी पन्नू (Taapsee Pannu) ही अभिनेत्री नेहमीच वेगवेगळ्या भूमिका करत असते. तिचा सेन्स ऑफ ह्यूमर आणि बिनधास्त बोलणं सोशल मीडियापासून ते इंटरव्ह्यूजमध्ये पसंत केलं जातं. पण या भूमिकेत इतका रस असण्यामागचं कारण म्हणजे तिला स्पोर्ट्सबद्दल असलेलं प्रेम आहे. या प्रेमापोटीच तिने प्रीमियर बॅडमिंटन लीगमध्ये एक टीमही खरेदी केली होती. ती चांगल बॅडमिंटन तर खेळतेच आणि त्यासोबतच ती टीमची मालकही होती. त्यानंतर आता तिची ऑनस्क्रीन क्रिकेट खेळण्याची इच्छा आहे.

आधी केली आहे खेळाडूची भूमिका

तापसी (Taapsee Pannu) स्पोर्ट्सबद्दल एवढं प्रेम आहे की, तिने आतापर्यंत अनेक स्पोर्ट्स ड्रामांना होकार दिला आणि त्या भूमिकाही साकारल्या आहेत. तिचा आगामी चित्रपट ‘सांड की आंख’ मध्ये ती शूटर दादींवरील बायोपिक करत आहे. ज्यांना शूटींगसाठी अनेक मेडल्स मिळाली आहेत. या आधी तिने दिलजीत दोसांझ स्टारर चित्रपट सूरमामध्ये हॉकी प्लेयरची भूमिका केली होती. तर ‘मनमर्जियां’ चित्रपटातही तिने हॉकी आवडणाऱ्या मुलीची भूमिका केली होती. 

तापसीचा बॉयफ्रेंड आहे बॅडमिंटनपटू Mathias Boe

आता तुम्हाला कळलं असेलच की, तापसी पन्नूला खेळांप्रती एवढं प्रेम असण्याचं कारण म्हणजे तिचा बॅडमिंटनपटू असलेला बॉयफ्रेंड मॅथिस बोए. तो डेन्मार्कचा नागरिक असून एक इंटरनेशनल बॅडमिंटनपटू आहे. तर स्वतः तापसीही स्क्वॅश खेळण्यात तरबेज आहे.

Read More From बॉलीवूड