मनोरंजन

तारक मेहता का उल्टा चष्माला तेरा वर्षे पूर्ण

Trupti Paradkar  |  Jul 6, 2021
तारक मेहता का उल्टा चष्माला तेरा वर्षे पूर्ण

टेलीव्हिजनमध्ये अनेक मालिका येतात, काही चालतात, काही लोकप्रिय होतात तर काही काळाच्या ओघात बंद पडतात. मात्र काही मालिका असतात ज्या सुरू राहतात, सुरू राहतात आणि सुरूच राहतात. त्यापैकी एक लोकप्रिय मालिका म्हणजे तारक मेहता का उल्टा चष्मा…ही मालिका गेली तेरा वर्ष प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करत आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र मनोरंजक आहे. ज्यामुळे प्रेक्षकांनी या मालिकेला आजवर डोक्यावर उचलून धरलं आहे. आता या मालिकेचे 3200 एपिसोड नुकतेच पूर्ण झाले आहेत. टेलीव्हिजन क्षेत्रात एखाद्या मालिकेने एवढा मोठा टप्पा गाठावा ही खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे. जाणून घ्या या खास प्रसंगी काय आहे निर्मात्यांचे मत

मालिकेच्या यशाबाबत काय आहे मालिकेच्या निर्मात्यांचे मत

तारक मेहता का उल्टा चष्मा मालिका गेली तेरा वर्षे प्रेक्षकांचे सातत्याने मनोरंजन करत आहे नाही म्हणायला लॉकडाऊनमध्ये मालिकेच्या चित्रीकरणात काही काळ खंड पडला होता. याबाबत मालिकेचे क्रिएटिव्ह हेड असित कुमार मोदी यांनी शेअर केलं की गेल्या तेरा वर्षात फक्त लॉकडाऊनमुळे प्रॉडक्शन टीम आणि कलाकारांना अनेक समस्यांचा सामना  करावा लागला होता. या काळात मालिकेत अनेक चढ-उतार दिसून आले. मात्र कलाकार आणि क्रूची मेहनत आहे ज्यामुळे आज आम्ही हा माईलस्टोन पार करू शकलो. तारक मेहता का उल्टा चष्माच्या सर्व चाहत्यांचे यासाठी खूप खूप धन्यवाद. लोकांचे भरभरून मिळणारे प्रेम आम्हाला मनोरंजक, विनोदी आणि सकारात्मक कंटेट निर्माण करण्यासाठी प्रेरणादायक ठरत आहे. चाहत्यांकडूनही या मालिकेचे 3200 एपिसोड पूर्ण झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला जात आहे. एका चाहत्याने तर या विशेष प्रसंगासाठी मालिकेतील कलाकारांना एक आर्टिसन गिफ्ट केलं आहे. ज्यामध्ये त्याने एका बाटलीत तारक मेहता का उल्टा चष्माच्या कलाकारांची पूर्ण स्टारकास्ट तयार केली आहे. या चाहत्याने असित कुमार मोदी यांनाही गणपती आणि हनुमानाची हाताने बनवलेली मुर्ती गिफ्ट केली आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका आता सगळ्यांचा चर्चेचा विषय ठरत आहे.

तेरा वर्षांपासून आहे गोकुळधामची जादू

तारक मेहता का उल्टा चष्मा हा शो 28 जुलै 2008 साली टेलीव्हिजनवर प्रसारित होऊ लागला. बघता बघता या मालिकेने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. या मालिकेचे खासियत आहे की मालिकेत भारतीय समाजाचे दर्शन घडवले जाते. सर्व जाती धर्माची माणसं एकाच सोसायटीमध्ये गुण्यागोविंदाने नांदताना दिसतात. ज्यामुळे गोकुळधाम सोसायटीला मिनी इंडिया म्हटलं तरी काहीच हरकत नाही.गोकुळधाममधील लोकांवर चाहत्यांचे खूप प्रेम आहे. ज्यामुळे आज या मालिकेला 3200 एपिसोड पूर्ण करण्यात यश मिळालं आहे. काही काळासाठी यातील काही पात्र न बदलण्याबाबत प्रेक्षक ठाम होते. मात्र आता लोकांकडून मिळणारा प्रसिसाद पाहता बदललेल्या पात्रांसह ही मालिका आणखी काही वर्ष नक्कीच सुरू राहिल यात शंका नाही. त्यामुळे पुढील काही वर्षात चाहत मेहताच्या लोकप्रियतेच  आणखी वाढच होताना दिसेल. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

संजय लीला भन्सालीच्या ‘हीरा मंडी’त झळकणार सोनाक्षी सिन्हा

आणखी एक स्टार किड पदार्पणाच्या मार्गावर, आहे या ज्येष्ठ अभिनेत्याचा नातू

संस्कृती बालगुडे ठरली डिजीटल इन्फ्लुएन्सर, अभिमानाची बाब

Read More From मनोरंजन