मोठ्या कलाकारांना चित्रपटापेक्षाही हल्ली काम करायला आवडतं ते वेबसीरिजमध्ये. कशाचेही बंधन नसलेल्या या माध्यमावर अनेक विषय प्रक्षोभक पद्धतीने मांडता येतात. वेबसीरिजच्या बाबतीत अशी अनेक उदाहरणे देता येतील.नुकतीच आलेली सैफ अली खान स्टारर ‘तांडव’ ही सीरिज आल्या आल्याच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. यामध्ये दाखवण्यात आलेल्या काही गोष्टी काही समाज घटकांना पटलेल्या नसून तो भाग काढून टाकावा अशी जोरदार मागणी होऊ लागली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी नुकतीच या मालिकेचे दिग्दर्शन अली अब्बास जाफर याला एक नोटीसही पाठवली आहे. दरम्यान, या सीरिजची लोकप्रियता या कॉन्ट्राव्हर्सीमुळे इतकी वाढली आहे की, सगळीकडे याची जास्त चर्चा होत आहे. शिवाय कमाईही कमालीची झाली असेच दिसत आहे.
दिवंगत अभिनेता सुशांतला फॅन्सनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
अली अब्बास जफारने मागितली माफी
तांडव रिलीज झाल्यापासूनच वेगवेगळ्या वादांना सुरुवात झाली आहे. यामध्ये दाखवण्यात आलेल्या काही गोष्टींमुळे काही समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोप या सीरिजवर करण्यात आला होता. सीरिजला मिळणारा लोकांचा प्रतिसाद पाहता ही सीरिज बंद पडावी असे कोणालाही वाटणार नाही. म्हणूनच अली अब्बास जाफर याने यासंदर्भात माफी देखील मागितली. कोणत्याही जाती किंवा धर्माविषयी अपमानास्पद काही दाखवण्याचा आमचा उद्देष्य नसल्याचे सांगत या सीरिजमधील विवादित सीन काढून टाकण्यात येईल असे देखील त्याने सांगितले होते.
मानसी नाईकच्या लग्नानंतर सुरू झाली आता सिद्धार्थ-मितालीच्या लग्नाची लगबग
जेएनयूशी असा जोडला गेला वाद
‘तांडव’मध्ये वाद असण्याचे कारण म्हणजे या सीरिजमध्ये हिंदू देवतांचा अपमान करण्यात आला आहे. या सीरिजमधील एका सीनमध्ये अभिनेता भगवान शंकराचे रुप धारण करुन येतो. अचानक स्टेजवर कोणीतरी येतो आणि त्याच्या तोंडून शिवी हासडली जाते. हा साक्षात हिंदू देवांचा अपमान आहे. देवाच्या तोडंडी मुद्दाम घातल्याचा राग अनेकांना आहे. हे सगळे प्रकरण JNUशी जोडण्यात आले आहे. त्यामुळे हिंदू संघटना या फारच नाराज झाल्या आहेत. त्यांनी हा सीन काढून टाकण्याची मागणी केली आहे. शिवाय याचा राग या गोष्टीसाठी अधिक आहे की, ज्याने या शंकराची भूमिका केली आहे तो अभिनेता मुस्लिम बंधू आहे. त्यामुळे नाहक या अभिनेत्यालाही यामध्ये ट्रोल केले जात आहे.
अली अब्बास जाफरला पाठवली नोटीस
अली अब्बास जाफर यांच्या घरी पोलीस त्याला अटक करण्यासाठी गेले हते. पण तसे काही होऊ शकले नाही. कारण अली अब्बास जाफर यांच्या घरात त्यावेळी कोणीही नव्हते. अली अब्बास जाफर यांच्या घराबाहेर पोलिसांचा जमाव दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगला व्हायरल होत आहे. माफी मागूनही अद्याप हे प्रकरण थंड झालेले दिसत नाही. हा विवादीत सीन या सीरिजम्ये काढून टाकण्यात आला आहे. या सीनलामध्येच कट करण्यात आले आहे. कोर्टासमोर अली अब्बास जाफर यांनी आपली बाजूही मांडली आहे. देशाच्या अनेक कानाकोपऱ्यात तांडव विरोधात याचिका दाखल केली आहे. पण अली अब्बास जाफर याने कोर्टासमोर आपली बाजू मांडत कोणत्याही धार्मिक भावनांचा दुखवण्याचा हेतू नसल्याचेही स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार ते पाहावे लागेल.
दरम्यान तुम्ही अद्याप तांजव ही सीरिज पाहिली नसेल तर ती आताच बघा.
Read More From बॉलीवूड
फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावरील बायोपिक ‘सॅम बहादूर’च्या चित्रीकरणास सुरुवात
Vaidehi Raje