काजोलची बहीण तनिषा मुखर्जीने गुपचूप लग्न केल्याची सध्या चर्चा सुरू आहे. यामागचं मुख्य कारण तिने सोशल मीडियावर शेअर केलेला फोटो आहे. तनिषाने नुकताच एक फोटो शेअर केला आहे ज्यात तिने पायात जोडवी घातलेली दिसत आहेत. तनुजाची आई महाराष्ट्रीयन आहे. महाराष्ट्रीय परंपरेनुसार लग्न झाल्यानंतर महिला सौभाग्य अलंकार म्हणून पायात जोडवी घालतात. शिवाय अनेक समाजामध्ये लग्नानंतर पायात जोडवी म्हणजेच बिछिया घालण्याची पद्धत आहे. सहाजिकच तनिषाने गुपचूप लग्न केलं आहे म्हणूनच तिने पायात जोडवी घातली असावी असा अंदाज चाहत्यांनी बांधला आणि तिच्या लग्नाची चर्चा सुरू झाली.
सिंधुताई सपकाळांच्या कार्याला सलाम, चित्रपटातूनही उलगडला होता प्रवास
तनिषाने उघड केलं तिच्या लग्नाचं सत्य
तनिषाचे पायात जोडवी घातलेले फोटो पाहून लोकांनी तिच्या लग्नाचा अंदाज लावून चर्चा करण्यास सुरूवात केली. सध्या तनिषा गोव्यात आहे. गोव्यात वेकेशनवर असल्यामुळे तिला तिच्या बद्दल सुरू असलेली चर्चा थोडी उशीरा समजली. त्यामुळे तिने पुन्हा एक पोस्ट टाकत लग्नाच्या अफवेवर सडेतोड उत्तर दिलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तनिषाने शेअर केलं आहे की, मला जोडवी घालायला खूप आवडतात.मला असं वाटतं की माझ्या पायात जोडवी छान दिसतात. त्यामुळे मी जोडवी घातलेला माझा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या व्यतिरिक्त यामागे कोणतंच कारण नाही. आता मला लोकांना माझा फॅशन सेंसपण जस्टिफाय करावा लागणार का ?
साऊथच्या ‘पुष्पा’चा महाराष्ट्रात धुमाकूळ
तनिषाला कसं करायचं आहे लग्न
तनिषा तिच्या लग्नाबाबत ठाम आहे. जरी तिने गुपचूप लग्न केलेलं नसलं तरी आयुष्यात तिचं लग्न कसं असावं याचं तिने प्लॅनिंग केलंलं आहे. तिला सध्या लग्न करण्याची मुळीच घाई नाही. यासाठीच तिने वयाच्या 39 व्या वर्षीच तिचे स्त्रीबीज फ्रीज करून ठेवले आहेत. त्यामुळे जोपर्यंत तिला योग्य जोडीदार मिळत नाही तोपर्यंत तरी तिला लग्न करण्याची घाई नाही. शिवाय तिच्या मते तिच्या ड्रीम वेडिंगचा प्लॅनही सतत बदलू शकतो. यापुढे ती शेअर करते की, ” लग्नाच्या अफवेवरून मला लोकांना मुळीच निराश करायचं नाही. मात्र जेव्हा माझं लग्न असेल तेव्हा मी सर्व जगाला ते अधिकृतपणे सांगेन. कारण मी शांत राहणाऱ्या लोकांपैकी नाही. सध्या तरी मी सिंगल आहे आणि खूप खूष आहे.”
धक्कादायक! कपिल शर्मा फेम या अभिनेत्याचा आत्महत्येचा प्रयत्न
Read More From बॉलीवूड
फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावरील बायोपिक ‘सॅम बहादूर’च्या चित्रीकरणास सुरुवात
Vaidehi Raje