मनोरंजन

संगीतमय प्रेमकथा असलेल्या ‘तत्ताड’चा ट्रेलर लाँच

Harshada Shirsekar  |  Feb 4, 2020
संगीतमय प्रेमकथा असलेल्या ‘तत्ताड’चा ट्रेलर लाँच

रंजक कथानक आणि नव्या दमाचे कलाकार असलेल्या संगीतमय ‘तत्ताड’ या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. नावापासूनच वेगळेपण जपलेल्या या चित्रपटाचं कुतूहल या ट्रेलरमुळे नक्कीच वाढलं आहे. वेब स्ट्रीमिंगमध्ये आघाडीवर असलेल्या प्राइमफ्लिक्सनं हा चित्रपट प्रस्तुत केला आहे. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन राहुल गौतम ओव्हाळ यांनी केलं आहे. राकेश भोसले, सुशील देशपांडे आणि प्रितम म्हेत्रे चित्रपटाचे निर्माते आहेत. लग्नातील बँडमध्ये पिपाणी वाजवणाऱ्या एका तरुणाची प्रेमकथा या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. त्यामुळेच या कथेला संगीताचा एक विलक्षण पदर आहे. हा चित्रपट २१ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात चेतन डीके, मानसी पाठक, ज्योती सुभाष, अनिल नगरकर, राहुल बेलापूरकर, सागर पवार, प्रफुल्लकुमार कांबळे, अक्षदा काटकर, गिरीजा झाड,सुदर्शन काळे, रोहित जाधव, राजेश मोरे, शरद ढिकुले, स्वप्नील धोंगडे, प्रसाद ओझरकर,  काका शिरोळे अशी उत्तम स्टारकास्ट या चित्रपटात आहे. ट्रेलरवरून हा चित्रपट तांत्रिकदृष्ट्या सक्षम, भावनिक कथा मांडणारा आणि उत्तम संगीताचा आनंद देणार असल्याचं दिसून येत आहे. मात्र आता प्रेक्षकांना २१ फेब्रुवारीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

(वाचा : सुभाष घईंचा मराठी सिनेमा ‘विजेता’ या दिवशी झळकणार बॉक्सऑफिसवर)

वेब विश्वात सक्रीय असलेल्या प्राइम फ्लिक्सने आता चित्रपट प्रस्तुतीमध्ये पदार्पण केलं आहे. ‘तत्ताड’ या चित्रपटाची प्राइम फ्लिक्सद्वारे निर्मिती करण्यात आली आहे. 21 फेब्रुवारी 2020ला हा चित्रपट बॉक्सऑफिसवर प्रदर्शित होणार आहे. अतिशय आगळंवेगळं नाव असलेला ‘तत्ताड’ हा प्राइम फ्लिक्स प्रस्तुत करत असलेला पहिला चित्रपट ठरणार आहे. सध्या मराठी सिनेसृष्टीत विविध विषय हाताळले जात असून या चित्रपटांना प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. 13 फेब्रुवारी रोजी ‘तत्ताड’ या चित्रपटाचे टीझर पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलं होतं. 

(वाचा : फॉरेनची फॅन ! माधव देवचकेला कुवेतवरून भेटायला आली चाहती)

नवीन वर्षात हे सिनेमे येणार प्रेक्षकांच्या भेटीला

‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’
राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अभिनेते गिरीश कुलकर्णी आणि सयाजी शिंदे पहिल्यांदाच एकाच चित्रपटात काम करणार आहे. प्रसाद नामजोशी आणि सागर वंजारी दिग्दर्शित ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’ या चित्रपटात हा योग जुळून आला आहे. त्यांच्या अभिनयाची जुगलबंदी या चित्रपटात रंगणार आहे. ‘फटमार फिल्म्स एलएलपी’ या निर्मिती संस्थेकडून ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’ची निर्मिती करण्यात येत आहे. हा सिनेमा 3 एप्रिल 2020 ला बॉक्सऑफिसवर झळकणार आहे.

(वाचा : ‘थ्री इडियट्स’मधला मिलीमीटर ‘या’ मराठी सिनेमात झळकणार प्रमुख भूमिकेत)

‘चंद्रमुखी’
मराठीमध्ये ‘चंद्रमुखी’ हे नाव सर्वप्रथम वाचलं गेलं, ऐकलं गेलं ते सुप्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांच्या लेखणीतून आणि आता ‘चंद्रमुखी’ नाव मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात एका नव्या सिनेमाची घोषणा करण्यात आली आणि त्या सिनेमाचे नाव आहे ‘चंद्रमुखी’. आपल्या रपाने आणि घुंगराच्या ठेक्यांनी अनेकांना मोहीत करणारी सौंदयवती, ‘चंद्रमुखी’ हे विश्वास पाटील यांच्या कादंबरीतलं एक महत्त्वाचं पात्रं. त्यांच्या कादंबरीवर आधारित ‘चंद्रमुखी’ या मराठी सिनेमाचे टीझर पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी अभिनेते-दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी सांभाळली आहे. लेखकाचं मनोगत पडद्यावर मांडण्याचं प्रसाद ओक यांचं कौशल्य अनेकांनी त्यांच्या ‘हिरकणी’ या सिनेमात अनुभवलं आहे. ‘चंद्रमुखी’ सिनेमाचे पटकथा- संवाद चिन्मय मांडलेकर यांनी लिहिलेले आहे. ‘हिरकणी’ची लेखक-दिग्दर्शक जोडी ‘चंद्रमुखी’साठी पुन्हा एकदा एकत्र आली आहे.

हे देखील वाचा :
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

Read More From मनोरंजन