बॉलीवूड

जयललितांच्या रुपात भरतनाट्यम करणार कंगना, पोस्टर झाले व्हायरल

Leenal Gawade  |  Feb 2, 2020
जयललितांच्या रुपात भरतनाट्यम करणार कंगना, पोस्टर झाले व्हायरल

जयललिता यांच्यावर ‘थलायवी’ नावाचा बायोपिक येणार आहे. या बायोपिकचे शुटींग सध्या जोरात सुरु आहे. या चित्रपटात जयललितांच्या भूमिकेत कंगना रणौत दिसणार आहे. या आधीही या चित्रपटाचे पोस्टर शेअर करण्यात आले आहे. आता जयललितांच्या तरुणातील दिवसांची आठवण करुन देणारा आणखी फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो या चित्रपटाचे पुढील पोस्टर असून यामध्ये कंगना भरतनाट्यमच्या पोझमध्ये दिसत आहे. या पोस्टरची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे. पाहा कंगनाचा हा लुक.. आणि तुम्हाला कसा वाटतो ते नक्की सांगा.

‘थ्री इंडियट्स’मधला मिलीमीटर ‘या’ मराठी सिनेमात झळकणार प्रमुख भूमिकेत

जयललिता आणि भरतनाट्यम

Instagram

जयललिता या आपल्याला राजकारणी म्हणून आपल्या सगळ्यांना माहीत आहे. पण त्यांच्यामध्ये असलेली कलेची बाजू तुम्हाला या बायोपिकमध्ये पाहायला मिळणार आहे. जयललिता या भरतनाट्यम शिकलेल्या होत्या. त्यांच्यातील ही कला सादर करण्यासाठी कंगनाने खास प्रशिक्षण घेतले आहे. यातीलच एक पोझ  या चित्रपटाच्या पोस्टरसाठी निवडण्यात आली आहे. त्यामुळेच या पोस्टरची सगळीकडे चर्चा होत आहे. शिवाय भरतनाट्यमसाठी घेतलेली मेहनतही तिच्या अनेक पोस्टमध्ये दिसून आली आहे. 

रणवीरने सहकलाकाराला केलं किस, आता वाटतेय दीपिकाची भीती

कंगनाने केलाय रिसर्च

Instagram

जयललिता या तामिळनाडूच्या मुख्यमंत्री होत्या. तामिळनाडूमध्ये त्यांचा चांगलाच दबादबा होता. राजकारणात सक्रिय असणारी महिला राजकारणी आणि त्यांचे आयुष्य वेगवेगळ्या अनुभवांनी समृद्ध होते. हा चित्रपट कंगनाने करण्याचा निर्णय घेतल्यानंतरही खूप चर्चा झाली होती. कारण कंगनाचे खासगी आयुष्यही कायम वेगवेगळ्या कारणांनी सगळ्यांसमोर आलेले आहे. पण तिला हा चित्रपट अगदी परफेक्ट करायचा आहे. थलायवीच्या फॅन्ससाठी तिला हा चित्रपट परफेक्ट करायचा आहे. त्यामुळे कंगनाने या आधीही झालेल्या मुलाखतीत या गोष्टी सांगितल्या आहेत. ती म्हणाली की,  जयललिता या माझ्यासारख्या नव्हत्या तर त्या अधिक ग्लॅमरस होत्या. त्यांची भूमिका साकारणे माझ्यासाठी एक आवाहनच होते.त्यांनाही अभिनेत्री व्हायचं नव्हतं आणि मलाही. पण तरीही आम्ही उत्तम कलाकार झालो. हा आम्हाला बांधून ठेवणारा दुवा आहे असे मला वाटते. 

पद्मश्री पुरस्काराने सन्मानित

कंगनाच्या अभिनयावर तिच्या एकूणच खासगी आयुष्यावर कितीही टिका झाली असली तरी तिने तिला सिद्ध केले आहे. नुकताच तिला मानाचा असा पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. तिच्या एकूणच कारकीर्दीसाठी तिला हा पुरस्कार देण्यात आला. या आधीही तिला मानाचे पुरस्कार देण्यात आले आहे. 

जयललिता लुकसाठी घेतली मेहनत

एखादे कॅरेक्टर करताना त्यासाठी मेहनत घ्यावी लागते. कंगनाने जयललितांसारखे दिसण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. तिने तिचा जयललितांच्या लुकमधील फोटो आधीच पोस्ट केला आहे. 2020 मध्ये हा चित्रपट रिलीज होणार आहे. 

एवढं नक्की! कंगनाचे पोस्टर बरेच काही सांगून जात आहे.

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा. या लिंकवर क्लिक करा https://www.popxo.com/shop/zodiac-collection/

Read More From बॉलीवूड