मनोरंजन

The Tatas – देशातील सर्वात मोठ्या उद्योगपती घराण्याची कथा लवकरच येणार OTT वर

Vaidehi Raje  |  May 24, 2022
the tatas

देशातील प्रसिद्ध घराण्यांच्या कथांमध्ये सर्वसामान्यांना खूप रस आहे. यामुळेच चित्रपट निर्मात्यांनाही या कथा आणि कथांना चित्रपटाचे स्वरूप देणे आवडते. प्रेक्षकांना पुन्हा एकदा एका मोठ्या व्यावसायिक कुटुंबाची कथा पडद्यावर पाहायला मिळणार आहे. हे व्यापारी कुटुंब म्हणजे टाटा कुटुंब होय. टाटा परिवारावर लवकरच चित्रपट बनणार आहे. याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या प्रतिष्ठित कुटुंबाची कथा प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी T-Series आणि Almighty Motion Pictures एकत्र आले आहेत.

सोशल मीडियावर शेअर केले

T-Series Films आणि Almighty Motion Pictures ने या दिग्गज व्यावसायिक घराण्याच्या कथेचे हक्क विकत घेतले आहेत. तीन पिढ्यांपासून हे कुटुंब देशाच्या उभारणीत भागीदार आहे. टी-सीरीजने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर ही माहिती शेअर केली आहे. पोस्टमध्ये चित्रपटाचे एक पोस्टर शेअर करण्यात आले आहे. त्याबरोबर असेही लिहिले आहे की, ‘T-Series आणि Almighty Motion Pictures एकत्र येऊन देशातील महान उद्योगपती कुटुंबाची कहाणी जगासमोर आणत आहेत. हॅशटॅगसोबत ‘द टाटा’ असे लिहिले आहे.

वेब सिरीजचे शूटिंग कधी सुरु होणार याची अद्याप कल्पना नाही

या कथेत टाटा कुटुंबाचा इतिहास दाखवण्यात येणार आहे.ही कथा एका वेब सिरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांना दाखवण्यात येईल. याचे शूटिंग कधी आणि कुठे सुरू होणार, याबाबत अजून तरी कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तसेच या वेबसिरीजच्या प्रदर्शनाची तारीख आणि स्टारकास्ट याबाबत देखील अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. या वेब सिरीजची कथा ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक गिरीश कुबेर यांच्या ‘द टाटाज: हाऊ अ फॅमिली बिल्ट अ बिझनेस अँड अ नेशन’ या पुस्तकावर आधारित आहे. कंपनीने काही काळापूर्वी या पुस्तकाचे हक्क विकत घेतले होते. टाटा कुटुंबाचा 200 वर्षांचा प्रवास कव्हर करणारी ही मालिका तयार होत आहे. इकॉनॉमिक टाइम्सच्या स्रोतांनुसार ही मालिका ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. याची पुष्टी करताना, ऑलमाईटी मोशन पिक्चरच्या प्रभलीन कौर संधू यांनी ईटीला सांगितले की या मालिकेचे किमान तीन सीझन असतील.

टाटा कुटुंबाने देशासाठी दिलेले योगदान 

“या वेब सिरीज मध्ये टाटा कुटुंबाने भारत देश तसेच समुदायाच्या उभारणीत कसे योगदान दिले आहे यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. मालिकेचा फोकस टाटांनी व्यवसाय साम्राज्य उभारण्यापुरता मर्यादित नसून आपल्या राष्ट्राच्या उभारणीत असलेले त्यांचे अमूल्य योगदान अधोरेखित करेल” असे संधू म्हणाले. या शोमध्ये केवळ टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांचा यशस्वी प्रवास कव्हर केला जाणार नाही, तर त्यांचे पूर्वज आणि संपूर्ण कुटुंब देखील समाविष्ट आहे, असे संधू यांनी सांगितले. वेब सीरिजच्या प्रॉडक्शन टीमने या विषयावर आधीच संशोधन सुरू केले आहे. “या मालिकेचे लेखन आधीच सुरू झाले आहे. आम्ही या मालिकेला पुस्तकात वर्णन केलेल्या गोष्टींपुरतेच मर्यादित ठेवू,” असे नाव न सांगण्याच्या अटीवर या प्रकल्पाशी संबंधित आणखी एका व्यक्तीने सांगितले.

उपलब्ध माहितीनुसार, या मालिकेचे शूटिंग सहा ते सात महिन्यांनंतर सुरू होणार आहे. रतन टाटा आणि इतर व्यक्तिरेखा कोण साकारणार यासाठी ऑडिशन घेणे, लेखन पूर्ण झाल्यावर सुरू होईल, असे वर उद्धृत केलेल्या व्यक्तीने सांगितले. ते पुढे म्हणाले, “आम्ही संपूर्ण संशोधन केल्याशिवाय इतक्या विशाल आणि समृद्ध प्रवासाला न्याय देऊ शकणार नाही. स्क्रिप्ट लिहिण्यासाठी एका टीमला आधीच काम सोपवण्यात आले आहे. शूटिंग वर्षाच्या अखेरीस सुरू होण्याची शक्यता आहे.”

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

Read More From मनोरंजन