DIY लाईफ हॅक्स

फ्रिजमध्ये ठेवत असाल या गोष्टी तर वेळीच व्हा सावध!

Dipali Naphade  |  Mar 19, 2020
फ्रिजमध्ये ठेवत असाल या गोष्टी तर वेळीच व्हा सावध!

आपण सगळेच बाजारात गेल्यानंतर बरेचदा गरज असो वा नसो बऱ्याच भाज्या आणि फळं आणतो आणि हे सगळं फ्रिजमध्ये ठेऊन देतो.  फ्रिजमध्ये जरी आपण भाज्या ठेवल्या तरी त्या दोन ते तीन दिवसात खराब होतात. आपण बरेच दिवस पदार्थ टिकून राहावे म्हणून फ्रिजमध्ये ठेवतो पण काही पदार्थ असे आहेत जे फ्रिजमध्ये  फ्रेश राहण्याऐवजी खराब होतात. पण अशा नक्की कोणत्या गोष्टी आहेत हे बऱ्याच जणांना माहीत नसते. त्यामुळे सरसकट पदार्थ फ्रिजमध्ये भरले जातात. पण या गोष्टींमुळे फ्रिजही खराब होऊ शकतो याची तुम्हाला कल्पना आहे का? त्यामुळे वेळीच सावध व्हा आणि फ्रिजमध्ये ठेवत असाल या गोष्टी तर वेळीच बंद करा. जाणून घेऊया कोणत्या वस्तू फ्रिजमध्ये न ठेवणं योग्य आहे.  

कांदा

Shutterstock

बऱ्याचदा काही जण फ्रिजमध्ये  कांदाही ठेवतात असं आपण पाहतो. पण त्यामुळे फ्रिजलादेखील कांद्याचा वास येऊ लागतो. तर दुसऱ्या  बाजूला फ्रिजमध्ये ठेवल्याने कांदाही अगदी मऊसर होऊन जातो. त्यामुळे ओल्या कांद्याचा उपयोग करणं कठीण होऊन बसतं. कांदा हा नेहमी सुक्या आणि सामान्य तापमानाच्या ठिकाणी ठेवावा. तसंच कांदा मिळतोय म्हणून जास्त प्रमाणात बाजारातून आणून फ्रिजमध्ये भरणा करून ठेवू नये. 

बटाटा

Shutterstock

बटाटा तुम्ही फ्रिजमध्ये ठेवलात तर त्याची चव आणि बाहेर असलेल्या बटाट्याची चव ही वेगळी असल्याचे तुम्हाला नक्कीच जाणवेल. तुम्ही जर कधी हे करून पाहिले नसेल तर अशी चव नक्की घेऊन पाहा. वास्तविक फ्रिजमध्ये ठेवल्याने बटाट्यातील स्टार्च हे साखरेमध्ये बदलू लागते आणि त्यामुळे बटाट्याची चव बदलते. तसंच बटाटे हे उन्हातही ठेवू नका. स्वयंपाकघरात सामान्य तापमान असलेल्या ठिकाणीच नेहमी बटाटे ठेवा. तसंच कोणत्याही प्लास्टिकच्या पिशवीत तुम्ही बटाटे ठेवू नका. बटाट्याचा साठा केल्यास, बटाटे खराब होतात. त्यामुळे फ्रिजमध्ये ठेवूनही याचा उपयोग होत नाही हे लक्षात घ्या.  

चुकूनही ‘हे’ पदार्थ पुन्हा गरम करून खाऊ नका, होतील दुष्परिणाम

सुकामेवा अर्थात ड्रायफ्रूट्स

Shutterstock

सुकामेवा अर्थात ड्रायफ्रूट्स म्हणजेच बदाम, चारोळी, पिस्ता याचा बऱ्याच जणांच्या फ्रिजमध्ये भरणा असलेला आपण पाहतो.  पण हे पदार्थ फ्रिजमध्ये ठेवू नका. सामान्य तापमानात हे पदार्थ ठेवले तरच ते अधिक स्वादिष्ट आणि सुरक्षित राहतात. त्यामुळे ही सवय वेळीच बदला. 

टॉमेटो

Shutterstock

टॉमेटो तर बाजारातून आणून धुवून सर्रास आपण फ्रिजमध्ये ठेवतो. पण टॉमेटो हा खरं तर उन्हात उगवतो. त्यामुळे टॉमेटो फ्रिजमध्ये ठेवू नका. तुम्हाला हवे तितकेच टॉमेटो  बाजारातून आणा आणि त्याचा वापर करा. फ्रिजमध्ये त्याचा साठा करून ठेवू नका. यामुळे टॉमेटो पटकन खराब होतात आणि शिवाय फ्रिजमध्ये ठेवल्याने हे अधिक मऊ होतात. 

टॉमेटो ठरतो केसांसाठी फायदेशीर, कसा ते माहीत आहे का

लिंबू, संत्र, मोसंब

Shutterstock

लिंबासारख्या  फळांमध्ये सायट्रिक अॅसिड असते. लिंबू,  संत्री, मोसंबी ही सगळी फळं फ्रिजमध्ये ठेवणं योग्य नाही. कारण फ्रिजची थंडी या फळांसाठी योग्य नाही आणि फ्रिजमध्ये ठेवल्याने याच्या सालीवर अधिक डाग पडतात. जास्त थंड तापमानात ठेवल्याने याचा स्वादही बदलतो आणि ही फळं सुकून जातात.  त्यामुळे ही फळं फ्रिजमध्ये न ठेवणंच योग्य आहे. 

लसूण

Shutterstock

लसूण फ्रिजमध्ये ठेवली तर त्याला मोड येतात आणि त्याशिवाय लसूण ओलीदेखील होते. त्यामुळे लसूणही फ्रिजमध्ये ठेवू नका. तुम्ही जर तशीच ठेवली तर फ्रिजला याचा संपूर्ण वास लागतो. सामान्य तापमानात लसूण बाहेर ठेवणे जास्त योग्य आहे.

असतील असे त्रास, तर अजिबात खाऊ नये लसूण!

कॉफी पावडर

Shutterstock

कॉफी पावडर ठेवणाऱ्यांपैकी तुम्हीही असाल तर ही तुमची सवय तुम्ही आजच बंद करा. कॉफी पावडर फ्रिजमध्ये  ठेवल्याने त्याचा सुगंध नाहीसा होतो आणि त्याचा स्ट्राँग आणि रिच फ्लेवर तसाच राहात नाही. त्यामुळे कॉफी केल्यानंतर तुम्हाला हवी तशी चव मिळत नाही. त्यामुळे कॉफी पावडर तुम्ही फ्रिजमध्ये ठेऊ नका. 

मध

Shutterstock

मध ही वर्षानुवर्षे टिकणारी गोष्ट आहे. त्यामुळे ती फ्रिजमध्ये ठेवायची गरज नाही. तुम्ही सामान्य तापमानात मध त्याच्या बाटलीचं झाकण घट्ट बंद करून ठेवलं तर तुम्हाला मध कितीही वर्ष वापरता येतो. त्यामुळे मध ही फ्रिजमध्ये ठेवण्याची गरज नाही. 

Kitchen Tips: फ्रिजची अशाप्रकारे करा साफसफाई

ऑलिव्ह ऑईल

Shutterstock

ऑलिव्ह ऑईल अजिबातच फ्रिजमध्ये ठेऊ नका. कारण तसं केल्यास, हे तेल लोण्यासारखं घट्ट होतं आणि त्याचा नंतर तुम्हाला काही उपयोग करता येत नाही. 

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

Read More From DIY लाईफ हॅक्स