DIY लाईफ हॅक्स

डास चावण्यापासून ते दादी घालवण्यापर्यंत जाणून घ्या महत्वाच्या गोष्टी

Leenal Gawade  |  Jul 13, 2022
डास चावण्यापासून ते दादी घालवण्यापर्यंत जाणून घ्या महत्वाच्या गोष्टी

 पावसाचे दिवस सुरु झाल्यावर अनेक आजार डोकं वरं काढू लागतात. याचे कारण या दिवसात अनेक ठिकाणी पाणी साचते. या साचलेल्या पाण्यामुळे डासांची (mosquito) पैदास ही जास्त होते. त्यामुळे इतर दिवसांच्या तुलनेत तुम्हाला या दिवसात नक्कीच जास्त डास चावत असतील. या दिवसात नवीन डासांचा जन्म होतो. त्यामुळे होते असे की, डास आपल्या डोळ्याला दिसत नसले तरी ते इतके जोरात चावतात. एकतर ते डोळ्याला दिसत नाहीत आणि त्यानंतर येणारी दादी ही इतकी त्रासदायक असते की, काय करावे हे आपल्याला कळत नाही. अशावेळी आपल्याला डासच चावू नये असे अनेकांना वाटते. अशावेळी डास चावू नये असे वाटत असेल तर जाणून घ्या या महत्वाच्या गोष्टी 

डास का चावतात?

डास का चावतात किंवा ते मलाच का चावतात असा प्रश्न आपल्याला अनेकांना वडतो असा प्रश्न पडणे स्वाभाविकच आहे. कारण काही ठराविक लोकांचा डास हे जास्त चावतात. ते अगदी उभे जरी राहिले तरी देखील त्यांना डास चावू लागतात. एका संशोधनात असे दिसून आले आहे की, ज्यांचा रक्तगट हा O आहे अशांना सगळ्यात जास्त डास चावण्याची भिती असते किंवा अशांना डास हे सगळ्यात जास्त चावतात. या शिवाय संशोधनात असेही दिसून आले आहे की, डासांची दृष्टी ही फारच जास्त स्पष्ट असते. ते कोणाला चावायचे हे देखील वासावरुन ठरवतात. शिवाय गडद रंगाकडे ते अधिक जास्त आकर्षित होत असतात. त्यामुळे जर तुम्ही गडद कपडे घातले असतील तरी देखील ते जास्त चावतात. 

डास चावू नये म्हणून काय करावे

डास मलाच का चावतात

डास अनेक आजार घेऊन येत असतात. अशावेळी डासांमुळे कोणत्याही आजाराच्या आहारी आपण जाऊ नये असे वाटत असेल तर तुम्ही काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. तसे केले तर तुम्हाला डास अधिक चावणार नाहीत. 

  1. पावसाच्या दिवसात घरात धुपारती किंवा धूर करायला विसरु नका. त्यामुळे त्यांना फारसे स्पष्ट दिसत नाही. शिवाय त्याचा वासही खूप जास्त असल्यामुळे ते थोड्या काळासाठी येत नाहीत. 
  2. शक्य असेल तर तुम्ही थोडे लाईट रंगाचे कपडे घाला त्यामुळे तुम्हाला डास फारसे चावत नाहीत. 
  3. जर तुम्हाला खूप जास्त डास चावत असतील तर अशावेळी तुम्ही लिंबाचे आणि निलगिरीचे तेल एकत्र करुन ते अंगाला लावावे. त्यामुळेही डास येत नाहीत. 
  4. लसणाच्या वासानेही अनेकदा डास हे घरात फिरकच नाहीत. त्यामुळे लसूण ठेचून आजुबाजूला ठेवा. त्यामुळेही डास येणार नाहीत. शिवाय पालींचीही भिती नाही. 

डासांची दादी घालवण्यासाठी सोपे उपाय

डास चावल्यानंतर दादी आली असेल तर ती घालवण्यासाठी काही सोपे उपाय तुम्ही करु शकता. 

  1.  दादीवर बर्फ फिरवा त्यामुळे तुम्हाला आराम मिळण्यास मदत मिळेल. 
  2. एखादे क्रिम किंवा मॉश्चरायझर लावले तरी देखील तुम्हाला आराम मिळण्यास मदत मिळेल. 
  3. नारळाचे तेल लावले तरी देखील तुम्हाला दादीची जळजळ कमी होण्यास मदत मिळेल. 

आता डास का चावतात? हे जाणून घेत तुम्ही ही माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवा. 

अधिक वाचा: घरात मासे पाळायचे असतील तर हे माहीत असू द्या

Read More From DIY लाईफ हॅक्स