DIY लाईफ हॅक्स

नकारात्मक विचारांनी ग्रासण्यास या गोष्टी असतात कारणीभूत

Leenal Gawade  |  Jul 22, 2022
नकारात्मक विचार

विचार हा आपल्या मनाचा खेळ आहे. आपण जे मनात ठेवतो ते आपल्या कृतीतून समोर येत असते. अनेकदा लोकं म्हणतात मला निगेटिव्ह वाईब्स येतात. त्यामुळे मी चलबिचल होतो किंवा माझी त्यामुळे प्रगती होत नाही. खूप जणांना तुम्ही असे नकारात्मक (Negative Thoughts) बोलताना अगदी हमखास पाहिले असेल. पण तुम्हाला हे माहीत आहे का? तुमचे नकारात्मक विचार हे तुमच्याच काही गोष्टींमुळे कारणीभूत असतात. आयुष्याचा काळ फक्त निगेटिव्ह विचार करण्यात घालवत असाल तर तुम्हाला तुमच्या या गोष्टी आताच सोडायला हव्यात. तरच तुम्ही तुमची प्रगती अगदी हमखास करु शकाल. 

माझ्यासोबत काय झाले माहीत आहे का?

खूप वेळा होतं असं की, आपण आपल्यासोबत एखादी व्यक्ती जर वेगळी किंवा वाईट वागली अेले तर आपण त्या गोष्टी मनात इतक्या ठेवतो की, आपल्याला त्यातून बाहेर पडता येत नाही. एखाद्या व्यक्तीने तुमच्यासोबत जे केले ते जर तुम्ही सतत आठवून त्याच विषयात रमत असाल तर ती सवय आताच सोडा. अनेकदा एखाद्या व्यक्तीने तुम्हाला त्याचा किस्सा सांगितला तरी तुमचा विषय मात्र माझ्यासोबत काय झाले माहीत आहे का? असेच करण्यासाठी पुढे पुढे जात असतो. तुमच्यावर झालेला तो प्रसंग किंवा मानसिक छळ हा तुम्ही इतका चिघळलेला असतो की,त्याचा समोरच्यालाही कंटाळा आलेला असतो. पण तुम्हाला मात्र त्यातच रमायचे असते. पण झाले ते सोडा. कारण तुम्ही त्याने काय केलं हे सांगण्यात आपला अमूल्य वेळ घालवला. पण त्या समोरच्या माणसाने मात्र तुम्हाला ते बोलून इतरांनाही बोलून प्रगती केलेली असते. मग तुम्ही तेथे का अडकलाय. याचा एकदा विचार करा. 

विचारांचा गुंता कशाला?

नकारात्मक विचार कशाला

आपलं मन हे आपल्याप्रमाणेच चालतं. एखाद्या गोष्टीने मानसिक ताण येऊन खचण्यासारखं असं काही नसतं. कोणाच्या बोलण्याने (टोचून) मनाला नक्कीच काही गोष्टी लागू शकतात. पण त्या बोलण्याने तुमच्या शरीराला कोणतीही इजा होत नाही. मग तुमचे मन तर खूप आत आहे. का एखाद्या गोष्टीचा तुमच्या मनावर इतका परिणाम व्हावा की त्यामुळे तुम्ही विचारांच्या गुंत्यात अडकून पडावे. खूप जण सतत काहीना काही विचारात असतात. त्यांना खूप प्रश्न पडतात. अशा प्रश्नांची उत्तरे मिळत नसतील तर तो विचारांचा गुंता तुम्हाला का पडायला हवा. झालं गेलं विसरुन आपला वेळ घालवण्यापेक्षा तुम्ही चांगलं वाचन करा. आयुष्यात काही वेगळं करता येईल का ते बघा. 

कामात ढवळाढवळ नको

 अनेकदा एखादी व्यक्ती आपल्याबद्दल इतकं काही बोलत असते की, आपल्याला उगाचच ती व्यक्ती आपल्याबद्दल काय बोलते? इतरांना काय सांगते हे जाणून घ्यायचे असते. पण इतर लोकं तुमच्याबद्दल काय बोलत आहेत. याची तुम्हाला कोणतीही पर्वा पडता कामा नये. कारण तुमच्याबद्दल कोणालाही काही सांगितले तरी देखील तुम्हाला त्याचा काहीही फरक पडणार नाही. तुमे कोणतेही नुकसान त्यामुळे होणार नाही. त्यामुळे ही भिती मनातूम कामढा आणि आपल्या कामाला लागा. 

तुम्हीही अशाच विचारांच्या जाळ्यात सतत गुंतून पडत असाल तर तुम्हाला काही गोष्टी या आताच सोडणे आहे गरजेचे 

Read More From DIY लाईफ हॅक्स