जगात न उलगडलेलं नातं म्हणजे सासू-सुनांचं. म्हणजे अगदी सगळ्यांच्या जन्मापूर्वीही या नात्याची व्याख्या सख्या मैत्रिणी किंवा सख्या वैरी अशी हमखास करुन ठेवली असणार असे वाटते. काळ कितीही बदलला तरी काही सासू-सुनांचे मात्र काही केल्या पटत नाही. या दोघी एकमेकांना समोरासमोर पाहून घेत नाहीत. सासु-सुनेच्या नात्यामध्ये दुरावा नेमका येतो तरी कसा हा फारच शोधाचा विषय आहे. आज असाच एक प्रसंग घडला की, एक मैत्रीण आपल्या सासूची तक्रार दुसरीकडे करत होती. तिच्या बोलण्यावरुन त्यांचे फारसे काही पटत नाही हे लक्षात आले होते माझ्या. पण मग या नात्यात दुरावा येणाऱ्या गोष्टी तरी काय आहेत हे जाणून घेतल्यानंतर काही गोष्टी समोर आल्या आणि मग कळले अरेच्चा! या इतक्या साध्या गोष्टींवरुन या दोघांमध्ये वाद होतात तर. आता तुम्हालाही हा दुरावा मिटवायची गरज असेल तर हे तुम्हाला माहीत हवे.
लॉकडाऊनमध्ये सासू-सुनेतील वाद टाळण्यासाठी करून पाहा हे उपाय
मुलगा फक्त तुमचाच
सासू-सुनेच्या नात्यात दुरावा आणणारी पहिली गोष्ट म्हणजे तिचा पोटचा गोळा.. अर्थात तिचा मुलगा. खूप महिलांना त्यांच्या मुलाचे लग्न झाले की, तो बायकोचा बैल होईल आणि माझ्याकडे दुर्लक्ष करेल अशी भीती असते. म्हणून त्या आपल्या मुलाला सुनेपासून लांब करण्याचा प्रयत्न करतात. आता तुम्ही म्हणाल हे शक्य नाही. पण तुम्ही सासू असाल तर तुमच्यासाठी ही गोष्ट फार महत्वाची आहे. तुम्ही तुमच्या मुलाला जन्म दिला त्याला शिकवले त्याला मोठे केले ही गोष्ट खरी असली तरी मुलाचे लग्न व्हावे हा तुमचाच हट्ट असतो की नाही. मग मुलाने एखाद्या मुलीची बायको म्हणून निवड केल्यानंतर सगळ्या गोष्टी का बदलतात. लव्ह मॅरेज असू दे किंवा अरेंज मॅरेज याचा काहीही संबंध येत नाही. सासूंनी ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी की मुलगा फक्त तुमचाच आहे आणि त्याची तुमच्यावरील माया तशीच कायम राहणार आहे. पण त्याचे लग्न झाले आहे आणि त्याला त्याच्या बायकोसोबत वेळ घालवण्याचा पूर्ण अधिकार आहे.
तुम्हालाही व्हायचे आहे का ‘परफेक्ट ‘सून, मग वाचा (How To Be Perfect Daughter-In-Law)
आईपासून मुलाला तोडण्याची चुकी पडू शकते भारी
खूप मुलींना त्यांचा राजाराणीचा संसार हवा असतो. सगळे कसे आपल्यासारखे हवे असते. घराच्या रंगाच्या निवडीपासून ते नवऱ्याच्या सगळ्या गोष्टी तिला तिच्या मनाप्रमाणे हव्या असतात. असे करताना तुमच्याकडून अनेकदा घरी असणाऱ्या सासूचे मन दुखावले जाते. तुमच्याकडून अनावधानाने ही गोष्ट झाली तर ठीक आहे. पण जर सासू तुमच्याशी काहीतरी वागली म्हणून तुम्ही जर आईबद्दल मुलाला काही सांगत असाल तर ही गोष्ट खूपच चुकीची आहे. दोन बायकांमध्ये घडणाऱ्या गोष्टीत कधीकधी पुरुषांना न घेणेच योग्य असते. कारण त्यामुळेच अधिक भांडण वाढतात. आईला आपला मुलगा अचानक कोणा दुसऱ्या व्यक्तिचे ऐकायला लागणे अजिबात रुचत नाही. तुम्ही आई झाल्यावर याचा अनुभव तुम्हाला येईल. तो अनुभव तुम्हाला येईपर्यंत तुम्ही तुमचे सासूसोबत असलेले नाते अजिबात खराब करु नका.
घस सांभाळण्यासाठी सासू-सुना या घरातील पुरुषांपेक्षाही अधिक समर्थ असतात म्हणूनच या गोष्टी लक्षात घेत एकमेकांमधील नको त्या कारणामुळे आलेला दुरावा मिटवा आणि आनंदी राहा.
नाते दृढ करणाऱ्या या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला माहीत हव्यात