DIY लाईफ हॅक्स

झोपेतून डोळे उघडल्यावर तुम्ही काय करता

Leenal Gawade  |  Dec 13, 2021
सकाळचं रुटीन असावं असं

 सकाळी उठल्या उठल्या तुम्ही काय करता ? हा प्रश्न विचारला तर तुम्ही काय उत्तर द्याल. कारण हल्ली सगळ्यांचे उत्तर हे साधारणपणे एकच असेल. कारण सकाळी उठल्यानंतर सगळेच आपला मोबाईल घेऊन बसतात. रात्री साधारण 9 तास फोन दूर ठेवल्यानंतर रात्रभरात काय काय नोटीफिकेशन आले हे पाहण्यासाठी सगळेेच सगळ्यात आधी फोन घेऊन बसतात.  तुमच्यासाठी फोन किती घातकी आहे हे सांगायला नको. पण तुम्ही झोपेतून उठल्यानंतर काही गोष्टी केल्या तर नक्कीच तुमचे आरोग्य चांगले होण्यास तुम्हाला मदत मिळेल. जाणून घेऊया सकाळी उठल्यावर तुम्ही काय करायला हवे ते

उठल्या उठल्या आभार माना

उठल्या उठल्या तुम्हाला सगळ्यात आधी जर काही करायचे असेल तर तुम्ही तुम्हाला मिळालेल्या या आयुष्याचे आभार मानायला हवे. तुमचा दिवस चांगला जाईल किंवा चांगला जावा यासाठी तुम्ही काही प्लॅनिंग करायला हवे. सकाळी मोबाईल हातात घेण्यापेक्षा तुम्ही जर या काही गोष्टींचा विचार केला तर तुमचे काम पटपट व्हायला मदत मिळते. त्यामुळे तुम्ही उठल्या उठल्या कामांचे नियोजन करायल घ्या. त्यामुळे तुमचा वेळ वाया जाणार नाही आणि तुम्हाला आलेली सुस्ती कमी होण्यासही मदत मिळेल. 

एक ग्लास गरम पाणी

बेडमधून बाहेर आल्यानंतर आणि ब्रश करुन झाल्यानंतर तुम्ही गरम गरम पाणी प्या. गरम किंवा कोमट पाण्याचे सेवन केल्यामुळे थंडावलेल्या तुमच्या शरीराला एक ग्लास गरम पाणी प्यायल्यामुळे पोटाचे आरोग्य चांगले होण्यास मदत मिळते. गरम पाणी प्यायल्यामुळे तुम्ही सकाळी जी क्रिया करायला हवी ती पटकन होण्यास मदत मिळते. गरम पाणी प्यायल्यामुळे पोट साफ होण्यास मदत मिळते. त्यामुळे तुम्ही ब्रश वगैरे करुन झाल्यानंतर तुम्ही गरम पाणी प्या. त्यामुळे शौचास होण्यास मदत मिळते.

आवळा-ॲलोवेरा रस घेण्याचे फायदे, करतील आश्चर्यचकित

सूर्यनमस्कार घाला

सूर्यनमस्कार

सूर्यनमस्कार हा सर्वांगासाठी उत्तम असा व्यायाम आहे.  त्यामुळे तुम्ही सकाळी उठल्या उठल्या व्यायाम करायचा विचार करत असाल तर तुम्ही सूर्यनमस्कार घाला. एकावेळी तुम्ही किमान 10 तरी सूर्यनमस्कार घाला. त्यामुळे तुमचे शरीर उत्तम राहण्यास मदत मिळते. सूर्यनमस्कार हे संपूर्ण शरीरासाठी चांगले असते. सूर्यनमस्कार केल्यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते

आंघोळ करा

खूप जण फोन किंवा इतर कोणत्याही गोष्टींच्या नादात खूप जण आंघोळ करायचे विसरुन जातात.शरीराची स्वच्छता ही खूप महत्वाची असते. त्यामुळे दिवस असाच पारोसा घालवण्यापेक्षा तुम्ही योग्यवेळी आंघोळ करा. त्यामुळे तुमची इतर काही काम असतील तर ती पटकन होण्यास मदत मिळते. 

आता सकाळी उठल्यानंतर तुम्ही अगदी हमखास या काही गोष्टी करायला घ्या.

कडधान्य शिजत नसतील तर वापरा या सोप्या ट्रिक्स

Read More From DIY लाईफ हॅक्स