अनेकदा मुलींना काय आवडतं ते मुलांना कळतं नाही. एका क्षणाला चांगल्या असतात आणि दुसऱ्या क्षणाला त्यांचे काहीतरी बिनसते, नेमकं काय होतं या मुलींना असा प्रश्न नेहमी मुलांना पडतो. पण तुम्ही याचा कधी विचार केला आहे की जोडीदार म्हणून मुलींना तुमच्याकडून काही अपेक्षा असतात. या अपेक्षा अगदी साध्या असतात. जर दोघांनी एकमेकांच्या अपेक्षांकडे लक्ष दिले तर तुमच्यात मनभेद होणार नाही. उलट एकमेकांना समजून घ्यायला अधिक मदत होईल.
स्वभाव समजून घेण्याची गरज
shutterstock
प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो. वेगवेगळ्या परिस्थितीत रिअॅक्ट होण्याची प्रत्येकाची पद्धतही फार वेगळी असते. अशावेळी मुलींना तुम्ही त्यांचा स्वभाव ओळखावा अशी अपेक्षा असते. काही वेळा काही गोष्टींमध्ये त्यांचा भडका उडत असतो अशावेळी त्यांचा स्वभाव ओळखून तुम्ही थोडासा समजूतदारपणा घेतला आणि त्यावेळात त्यांना समजून घेतले तर त्या तुमच्यावर अधिक विश्वास ठेवतात. त्यामुळे मुलींना पहिली गोष्ट जर जोडीदारामध्ये हवी असेल तर त्याचा स्वभाव समजून घेण्याचा स्वभाव
उदा. अचानक तुमची जोडीदार तुमच्यावर चिडून बोलत असेल. अशावेळी तुम्ही तिच्या चिडण्याचा कोणताही वेगळा अर्थ काढण्यापेक्षा जर तुम्ही थोडा दीर्घ श्वास घेऊन तिला नेमकं काय झालं ते विचारलं तर त्यांना नक्कीच ते आवडतं.
कायमची साथ
shutterstock
नात्यामध्ये कमिटमेंट फारच महत्वाची असते. एखादी मुलगी तुमच्यावर तेव्हाच विश्वास ठेऊ शकते जेव्हा तिला तुमची साथ कायमची जाणवते. त्यामुळे मुलगी तुम्ही नात्यात तिला किती साथ देता ते देखील पाहत असते.त्यामुळे जर तुम्ही कोणावर खरं प्रेम करत असाल तर तुम्हाला त्या व्यक्तीला याची जाणीव करुन द्या की, तुम्ही त्यांच्या पाठिशी आहात.
उदा. करिअर असो किंवा अन्य काही जर तुम्ही सोबत असल्याची जाणीव तुमच्या जोडीदाराला करुन दिली. आयुष्यातील कोणत्याही कठीण प्रसंगाला सामोरे जायला ती लगेच तयार होते.
#MyStory: Dating App च्या युगातली अनोखी प्रेम कहाणी
थोडासा वेळ
shutterstock
जर तुम्ही तुमच्या जोडीदाराला वेळ देत नसाल तर तिची चीडचीड होणे स्वाभाविक आहे. तुमच्या टाईमटेबलमधून वेळ काढून तुम्ही तुमचा वेळ तुमच्या जोडीदारासाठी राखून ठेवायला हवा. तुमचा थोडासा वेळही जोडीदाराला दिलासा देतो.
उदा. तुमची प्रेयसी किंवा जोडीदार तुम्हाला सतत भेटण्याचा हट्ट धरत असेल तर तिला तुमची खूपच गरज असल्याचे समजावे. कधीतरी तुमची एक मिठी त्यांच्यासाठी आधार असते. त्यामुळे ती तुमचा भेटण्याचा हट्ट करते कारण तिला तुमचा वेळ हवा असतो हे लक्षात असू द्या.
जेव्हा लग्नाच्या पहिल्याच रात्री…..
निस्सिम प्रेम
shutterstock
नात्यात एकमेकांवरील प्रेम हे खूप महत्वाचे असते. मोठ मोठे गिफ्टस नाही पण निस्सिम प्रेम तिच्यासाठी फार महत्वाचे असते. मोठे मोठे गिफ्टस देऊन मिळणारा आनंद हे प्रेम नसतं हे मुलींना चांगलं कळतं. त्यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदारावर निस्सिम प्रेम करा. तुमच प्रेमच तिला हवे असते.
उदा. तुम्ही तुमच्या जोडीदाराला प्रत्येक वेळी काही गिफ्टस देऊन इंप्रेस करायचा प्रयत्न करत असाल पण तरीही ती कुरबूर करत असेल याचा अर्थ तुम्ही प्रेमता कुठेतरी कमी पडता आहात. तुम्ही तुमचा चांगला वेळ गिफ्ट निवडायला घालवण्यापेक्षा प्रेमाच्या 4 गोष्टी करण्यामध्ये घालवलात तर तुमचे नाते अधिक चांगले होईल.
वागण्यातून काळजी
shutterstock
तुम्ही काळजी करता हे दाखवण्यापेक्षा तुमच्या कृतीतून काळजी दिसणे फार गरजेचे असते. जर तुम्ही प्रेम करता आणि एकमेकांची काळजी घेता तर तुम्ही दाखवणे देखील गरजेचे आहे. कधीकधी काहींना ती काळजी दाखवता येत नाही. त्याचा परिणाम असा होतो की, समोरच्याला तुम्ही त्यांची काळजी करत नाही असे वाटते. तुमच्या लेखी त्यांची किंमत कमी असल्याचे त्यांना उगाचच वाटत राहते. त्यामुळे तुम्ही तुमच्या वागण्यातून जोडीदाराबद्दल वाटणारी रास्त काळजी दाखवणे गरजेचे असते.
उदा. तुम्हाला जर तुमच्या प्रेयसीची काळजी असेल तर ती शब्दातून व्यक्त करा.तुमच्या त्या काळजीच्या चार शब्दांनी देखील समोरच्याला बरे वाटू शकते. जर तुम्हालाही तुमच्या वागण्यात काय बदल करावा असा प्रश्न पडला असेल तर तुम्ही नक्की हे नक्की करुन पाहा
पावसाळ्यात SEXचा आनंद असतो खास, जाणून घ्या महिलांचे अनुभव
आदर दाखवा
Shutterstock
आदर हा कोणत्याही नात्यात महत्वाचा असतो. प्रेमात हा आदर थोडा जास्त असणे गरजेचे असते. त्यामुळे तुम्ही काहीही करा पण एकमेकांना आदर द्यायला विसरु नका. अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून तुम्ही हा आदर एकमेकांना द्यायला हवा. आदर दिल्याने मिळतो हे तुम्हाला माहीत असेलच. त्यामुळे तुम्ही सगळ्यात आधी काही करत असाल तर एकमेकांना आदर द्यायला शिका. मुलींच्या अपेक्षांपैकी ही एक साधी अपेक्षा आहे असे म्हणायला हवे यामध्ये फार काही विचार करण्यासारखा नाही
उदा. तुम्ही एखादा निर्णय घेताना तुमच्या जोडीदाराचे विचार ग्राह्य धरले तर नक्कीच तिला आनंद होईल. त्यामुळे तिला नात्यातील तिचे महत्व पटेल.