ऑनलाईन मैत्री आणि भेटीगाठी हे काही आता तसं तर नवीन राहिलेले नाही. पण अशा अनोळखी माणसांशी ऑनलाईन ओळख करून घेणं, त्यांना भेटणं आणि त्यांच्याशी नातं जोडणं हे तसं तर फारच जोखमीचं आहेत. अशा अनेक सोशल साईट्स आहेत जिथे एकमेकांशी मैत्री करणं, त्यानंतर एकमेकांशी चॅटिंग करणं आणि एकमेकांना भेटणं या सगळ्या गोष्टी होतात आणि मग यानंतर भेटण्याची प्रक्रिया सुरू होते. पण तुम्ही जर या ऑनलाईन नात्यात गुंतत असाल तर तुम्ही वेळीच सावध राहायला पाहिजे. तुम्हाला याचे फायदे आणि तोटे या दोन्ही बाजू माहीत असायला हव्यात. नक्की आपण ऑनलाईन मैत्री करताना काय तपासायला पाहिजे आणि कुठे थांबायला पाहिजे हे तुम्हाला कळायला हवे. नात्यात गुंतण्याच्या आधी तुम्ही या महत्त्वाच्या गोष्टींची माहिती ठेवायला हवी.
वेगवेगळे गुन्हे
ऑनलाईन डेटिंग अॅप्स आणि वेबसाईट्सचा वापर करताना बरेच सायबर गुन्हे होताना दिसून येतात. यामध्ये फेक प्रोफाईल, सायबर शोषण, सायबर बुलिंग, सायबर डिफेमेशन, सायबर स्टॉकिंग (ऑनलाईन माध्यमातून तुमचा पिछ्चा करणे) असे अनेक अपराध आहेत. त्यामुळे यापासून सावधान राहणं गरेजचं आहे. उगीच वाहवत जाण्यात अर्थ नाही.
बदला घेण्यासाठीही केला जातो उपयोग
Shutterstock
ऑनलाईन डेटिंग अॅप्लिकेशनद्वारे अनेक अपराध होताना दिसतात. हल्ली तर हे प्रमाण जास्त वाढलं आहे. अनेक तरूण आणि तरूणी याचा फायदा घेताना दिसतात. पण यामुळे काही जण बदला घेण्यासाठीही त्याचा उपयोग करून घेतात. ब्लॅकमेल करणे, फोटो सेव्ह करणे आणि अन्य गोष्टींचा यासाठी उपयोग करण्यात येतो.
My Story : सगळ्यांमध्ये असूनही मला एकटं वाटतं कारण
वित्तीय धोका
Shutterstock
या ऑनलाईच्या जगात तुम्ही एकमेकांच्या नात्यात असण्याचा विचार करत असाल, तर भावनिक गुंतागुंत होऊन तुमचे प्रोफाईल वापरून अनेक फेक प्रोफाईल बनवता येतात आणि त्याच्या सहायाने वित्तीय धोका होऊ शकतो. अर्थात तुम्हाला पैशाचा गंडा घातला जाऊ शकतो. विश्वास ठेऊन अनेक लोक अशा तऱ्हेने पैशांच्या बाबतीत फसले जातात. तसंच समोरचा व्यक्ती तुम्हाला भावनिक गुंतवून ब्लॅकमेक करून सतत पैसे मागू शकतो. त्यामुळे अशा नात्यात गुंतत असताना 10 वेळा विचार करा.
ऑनलाईन जेवण मागवताय, मग नक्की घ्या या गोष्टींची काळजी
खरे कसे ओळखावे
समोरच्या व्यक्तीचा फोटो मागा. त्याच्याविषयी तुम्ही इंटरनेटवर अधिक माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करा. तसंच त्याच्या कुटुंबाचे प्रोफाईलही तपासा. त्यांचे फोटो आणि इतर त्याने सांगितलेली माहिती बरोबर आहे का ते तपासून घ्या. हे सर्व तुम्ही योग्य तऱ्हेने तपासले तरच तुम्हाला समोरचा व्यक्ती खरे बोलत आहे की नाही याची माहिती कळू शकते. समोरचा व्यक्ती जर आपल्या नातेवाईकांबद्दल खोटे सांगत असेल तर तुम्हाला पटकन कळू शकते.
#MyStory: त्याची ऑनलाईन प्रोफाईल इतकी Hot होती की…
या समस्यांपासून सावधान राहण्यासाठी वापरा वेगवेगळ्या पद्धती
- प्रोफाईल हाईड हा पर्याय निवडा आणि जास्त फोटो अपलोड करू नका
- कोणत्याही अनोळखी व्यक्तीशी जास्त जवळीक साधू नका. चर्चा करू नका. जितकी माहिती देणं गरेजचं वाटतं तितकीच द्या
- ऑनलाईट डेटिंग अॅप्लिकेशनवर आपली वैयक्तिक माहिती जास्त देऊ नका
- ऑनलाईन डेटिंग अॅप डाऊनलोड करताना तुमचा फोन जर कोणती परवानगी मागत असेल तर विचारपूर्वक तसे करा.
- बरेचदा फोन गॅलरी, कॅमेरा, माईक, रेकॉर्डर अन्य फिचरची परवानगी अॅप्लिकेशन वापरताना मागितली जाते. यामुळे हॅक होण्याची शक्यता असते. त्यामुळे काळजी घेऊन मगच माहिती अपलोड करा.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक