Hair Removal

वॅक्सिंगच्या कटकटीपासून वाचायचे असेल तर फुलबॉडी लेझर आहे उत्तम

Leenal Gawade  |  Sep 13, 2020
वॅक्सिंगच्या कटकटीपासून वाचायचे असेल तर फुलबॉडी लेझर आहे उत्तम

लॉकडाऊनमध्ये काही महिने काढल्यानंतर सगळं बंद झाल्यानंतर आयुष्यात काय त्रास होऊ शकतात, याची जाणीव अनेकांना आतापर्यंत झाली आहे. विशेषत: सौंदर्याच्या बाबतीत ज्या महिलांना वेळच्या वेळी जाऊन सगळ्या गोष्टी करण्याचा ज्यांना सवय होती. त्यांनी लॉकडाऊमध्ये शिथिलता आल्यावर आणि पार्लर /सलोन सुरु झाल्यानंतर घाबरत का असेना सगळ्यात पहिली हजेरी तिथे लावली. आयब्रोज, अंडरआर्म्स, पाय, हात असे सगळे वॅक्स इतक्या महिन्यांनी केल्यानंतर काहींना हायसं वाटलं असेल. पण पुन्हा साधारण महिन्याभरानंतर पार्लरमध्ये आपल्याला पुन्हा एकदा हजेरी लावावी लागणार. वॅक्स करुन त्वचा छान गुळगुळीत होत असली तरी त्यामुळे त्वचा वयाआधीच सैल होण्याची शक्यता असते. शिवाय ज्यांना बिकिनी वॅक्स करण्याची सवय असते त्यांच्यासाठी तर वॅक्स करणे हे फारच त्रासदायक असते. वॅक्सिंगची ही कटकट सहन केल्यानंतर ज्यावेळी मी लेझर ट्रिटमेंटकडे वळले त्यावेळी भविष्यातील वॅक्सिंगसाठी होणाऱ्या खर्चापेक्षाही हा खर्च परवडणाऱ्या सारखा आणि त्वचेला फायदेशीर असल्याचे लक्षात आले. त्यामुळेच मी तुमच्यासोबत या संदर्भातील महत्वाची माहिती शेअर करत आहे. 

हेअर टाईप बघून निवडा हेअर मास्क, मिळवा बाऊन्सी आणि चमकदार केस

फुलबॉडी वॅक्सचा अंदाजित खर्च vs लेझर ट्रिटमेंट

काय आहे जास्त फायदेशीर

फुलबाॅडी वॅक्स करण्याचे क्वचितच प्रसंग सगळ्या महिलांवर येत असतील. काही खास कार्यक्रम असेल किंवा लग्न यावेळीच असे वॅक्स केले जाते. ( ज्यामध्ये बिकिनी आणि पाठ) यांचा समावेश असतो. या वॅक्सचा कमीत कमी खर्च हा 3 ते 4 हजार रुपये आहे. साधारण महिना संपला की, केसांची वाढ होऊ लागते. तर लेझरच्या 10 +2 सेशनचा खर्च हा साधारण 50 ते 60 हजार रुपयांचा आहे. आता आकडा पाहून घाबरुन जाऊ नका. कारण तुमच्या केसांची वाढ कितीही दाट असली तरी लेझरच्या मदतीने ही वाढ कालांतराने पातळ होते. तुमचे त्वचेवरील नको असलेले केस प्रत्येक सेशननुसार कमी होऊ लागतात. वॅक्समध्ये महिन्याच्या शेवटी तुमच्या शरीरावर असलेले केस पूर्ववत होतात. ते कमी होत नाही. तर लेझरच्या 5 ते 6 सेशननंतर नको असलेले केस कमी होऊ लागतात. वॅक्समध्ये तुम्हाला प्रत्येक भागाचे वेगळे दर द्यावे लागतात. त्यामध्ये बिकिनी हा भाग सगळ्यात जास्त महाग असतो. तर लेझरच्या या दरामध्ये तुमचा बिकिनीचा भागही केला जातो. तुम्हाला लेझरचा आकडा मोठा वाटत असला तरी त्याचा परीणाम हा दीर्घ काळासाठी राहणारा आहे. त्यामुळे तो फायदेशीरच आहे. तुम्हाला ही रक्कम काही ठिकाणी एकत्र भरावी लागत नाही. तर ती तुम्ही EMI वरही भरु शकता. 

जाणून घ्या डॅन्ड्रफ आणि ड्राय स्काल्प यातला फरक कसा ओळखावा

असे केले जाते फुलबॉडी लेझर

Instagram

आता तुम्हीही पैसे वाचवून एकदाच काहीतरी चांगलं करण्याचा विचार करत असाल तर लेझर आहे तुमच्यासाठी बेस्ट 

तुमच्या त्वचेसाठी बेस्ट आहेत या बीबी क्रीम

Read More From Hair Removal