चाळीशी आली की अधिकतम महिलांना पांढरे केस आणि सुरकुत्या यामुळे त्रास व्हायला लागतो. पण तुम्हाला माहीत आहे का या वयात बऱ्याच महिलांना झोपेचीदेखील समस्या सतावते. चाळीशीनंतर वय वाढते तसे झोप कमी होण्याची समस्या अनेकांना असते. पण या विषयावर अनेक जण दुर्लक्ष करतात. तुमच्या शरीराला कोणत्याही वयात किमान 7-8 तास झोप ही गरजेची असते. काही सर्वेक्षणांमध्ये ही सिद्ध झाले आहे की महिला चाळीशीनंतर कमी झोपतात. तुमचीही झोप कमी झाली असेल तर तुम्ही काही सोप्या टिप्स वापरून ही समस्या दूर करू शकता. तुम्हालाही नियमित कमी झोपेचा त्रास असेल तर तुम्ही हा लेख नक्की वाचा. चाळिशीनंतर झोप न येण्याचे कारण हे मानसिक आणि शारीरिक बदल दोन्ही असू शकतात. झोपेसंबंधी तक्रार असेल तर औषध आणि ताणतणाव हेदेखील कारणीभूत ठरते. पण तुम्ही तुमच्या काही सवयी बदलून यामध्ये नक्कीच बदल घडवून आणू शकता.
कॅफीनचे सेवन कमी करा
काही जणांना सतत चहा आणि कॉफी प्यायची सवय असते. पण जसजसे तुमचे वय वाढते तशी कॅफीनची संवेदनशीलता वाढते. तुम्ही जर कायम कॉफी पित आला असाल तर कॉफी सोडून देणे नक्कीच तुमच्यासाठी अतिशय त्रासदायक ठरू शकते. पण तुम्ही न सोडता त्याचे अगदी योग्य प्रमाणात सेवन करणे यासाठी चांगले ठरू शकते. दिवसभर तुम्ही जास्त कॉफी पित असाल तर तुम्ही त्याचे प्रमाण कमी करा. कारण अति कॅफीनमुळे झोप कमी होते.
औषधे बदला
तुम्ही एखाद्या प्रिस्क्रिप्शनच्या औषधांचे सेवन करत असाल तर तुम्हाला त्याच्या दुष्परिणामामुळेही झोपेची कमतरता भासू शकते. काही औषधे रात्री चिंता, घाम येणे आणि झोप न येणे अशा समस्यांना आमंत्रण देत असतात. त्यामुळे व्यवस्थित झोप लागण्यासाठी तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे बदलून घ्या. तुम्हाला झोपेची समस्या येत असेल तर तुम्ही वेळीच डॉक्टरांशी बोलून यामध्ये बदल करा.
थेरेपिस्टचा सल्ला घ्या
तुम्हाला सतत गोष्टींचा ताण घेण्याची सवय आहे का? तुम्ही नेहमी तणावग्रस्त राहाता का? असे असेल तर तुम्ही थेरेपिस्टचा सल्ला घेणे आवश्यक आहे. चिंता वाटत राहत असेल तर त्याचा झोपेशी खूपच संबंध असतो. विचारांमुळे झोप लागत नाही. पण थेरेपिस्टच्या मदतीने तुम्ही यावर मात करू शकता. यासाठी कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी (सीबीटी) तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकते.
कोमट पाण्याने आंघोळ करा
चांगली झोप येण्यासाठी तुम्ही कोमट पाण्याने आंघोळ करा. तुम्हाला हवं तर एसेन्शियल ऑईल यात मिसळा. जेव्हा तुम्ही आंघोळ करून बाहेर येता तेव्हा शरीराचे तापमान कमी होते आणि तुम्हाला थकवा जाणवतो. त्यामुळे असे केल्यास, तुम्हाला आराम करण्यासाठी आणि झोप येण्यासाठीही फायदा मिळतो. कोमट पाण्याने तुमच्या शरीराचे तापमान योग्य राहाते आणि दिवसभराचा थकवा जाणवून पटकन झोप येते.
अरोमाथेरपीचा करा वापर
अतिशय शांतता प्रदान करणारी अशी अरोमाथेरपी तुम्हाला यामध्ये कामी येतो. लव्हेंडर, वेटिवर आणि कॅमोमाईल अशा एसेन्शियल ऑईलने झोप वाढविण्यास मदत मिळते. सुगंधी शरीर आणि मनाला शांतता देण्यासाठी याचा उपयोग करून घेता येतो. या तेलांमुळे तुम्हाला बेचैनी, रात्री झोप न येणे आणि कोणत्याही प्रकारचा ताण कमी करण्यासाठी फायदा होतो. अरोमाथेरपीमध्ये एसेन्शियल ऑईलचा उपयोग करण्यासाठी इलेक्ट्रिकल डिफ्युजर अथवा वॅक्स वॉर्मरचादेखील समावेश करून घ्या.
स्वतःला शांत करा
लाईट बंद करण्यापूर्वी तुम्ही सर्वात पहिले स्वतःला अर्थात स्वतःच्या मनाला शांत करा. झोपण्यापूर्वी किमान एक तास आधी तुम्ही टीव्ही, मोबाईल अथवा लॅपटॉप या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर न केल्यास उत्तम. तुम्हाला स्वतःला शांत करण्यासाठी तुम्ही चांगले पुस्तक वाचा अथवा गाणी ऐका. यामुळे तुम्हाला शांत झोप लागते.
योग आणि व्यायाम करा
वाढत्या वयानुसार महिलांना योगाचा खूपच आधार आणि फायदा मिळतो. योग आणि नियमित व्यायाम करून तुमच्या मनाच्या शांततेत आणि शरीरामध्येही खूपच बदल होतो. तणाव आणि चिंतेपासून दूर राहण्यासाठी तुम्ही याचा अवलंब करावा. सुरूवात अतिशय साध्या आणि शरीराला त्रासदायक नसणाऱ्या योगाने करावा. चालणे, धावणे, पोहणे यासारखे व्यायाम शरीराला थकवा देतात. त्यामुळे नियमित याचा फायदा करून घ्यावा. चांगली झोप हवी असेल तर शरीर थकणे गरजेचे आहे.
चाळिशीनंतर झोपेचा त्रास होतोच असं नाही. पण हल्ली तसं दिसून येतं. त्यामुळे जर तुम्हालाही असे त्रास जाणवत असतील तर तुम्ही वेळीच याकडे लक्ष द्या.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक