संपूर्ण शरीरात ओठांची त्वचा ही अधिक संवेदनशील असते. मात्र आश्चर्य म्हणजे ओठांची निगा राखण्याचीच जास्त टाळाटाळ केली जाते. ओठांची योग्य काळजी न घेतल्यामुळे ओठ काळंवडात आणि ओठाकडील त्वचा राठ होऊन लवकरच फुटते. वातावरणातील बदलाचा सर्वात जास्त परिणामदेखील ओठांवरच होत असतो. म्हणूनच अती उन्हाळा अथवा अती हिवाळा असेल तर तुमचे ओठ फुटू लागतात. बऱ्याचदा फुटलेल्या ओठांमधून रक्तही निघते. अशा प्रकारे ओठांचे होणारे नुकसान टाळायचे असेल तर वेळीच ओठांची योग्य निगा राखायला हवी. नियमित लिप स्पा केल्यामुळे ओठ मऊ आणि मुलायम होतात. यासाठीच जाणून घ्या घरच्या घरी कसा करावा लिप स्पा…
लिप स्पा घरी करण्यासाठी सोप्या टिप्स (Tips to Do Lip Spa At Home)
लिप स्पा तुम्ही घरच्या घरी आणि स्वतः करू शकता. यासाठी जाणून घ्या यासाठी लागणारे साहित्य आणि लिप स्पा करण्याची सोपी पद्ध
pixels
लिप स्पासाठी लागणारे साहित्य –
- पेट्रोलिअम जेली
- मध
- मॉइस्चराईझर
- बदामाचे तेल
- व्हिटॅमिन ई कॅप्सुल
- इसेंशिअल ऑईल
- बाऊल
- वेट टिश्यू
- स्वच्छ नॅपकीन
- पीठी साखर
- लिप टिंट
लिप स्पा करण्याची स्टेप बाय स्टेप पद्धत
स्टेप १ – सर्वात आधी चेहरा आणि ओठ कोमट पाण्याने आणि चांगल्या क्लिंझरने स्वच्छ करा. त्यानंतर दूध अथवा मॉइस्चराईझर ओठांना लावा आणि ब्रशच्या मदतीने ते हलक्या हाताने चोळून घ्या. या स्टेपमध्ये ओठ आणि ओठांच्या आजूबाजूची त्वचा तुम्हाला मॉईस्चराईझरने मऊ करायची आहे.
स्टेप २ – मऊ झालेल्या त्वचेला स्वच्छ करण्यासाठी तिला स्क्रब लावायचे आहे. यासाठी तुम्ही मध, व्हिटॅमिन ई आणि बदामचे तेल, पीठी साखर एकत्र करून त्यापासून घरीच स्क्रबर तयार करू शकता. हे मिश्रण तीस मिनीटं फ्रीजरमध्ये ठेवा. त्यानंतर ते सक्युलर मोशनमध्ये ओठांवरून फिरवा. ज्यामुळे तुमच्या ओठांवरील डेड स्किन निघून जाईल. कमीत कमी दहा मिनीटे तुम्हाला ओठ स्क्रब करायचे आहेत.
स्टेप ३ – वेट टीश्यू अथवा कॉटन पॅड बर्फाट बुडवा आणि ओठ स्वच्छ करा ज्यामुळे डेड स्किन निघून जाईल आणि ओठांना थंडावा मिळेल. ओठाच्या त्वचेवरील ओपन पोअर्स पुन्हा बंद होतील.
स्टेप ४ – ओठांजवळील डेड स्किन निघाल्यावर पाण्याने पुन्हा ओठ धुवून घ्या आणि टॉवेल अथवा नॅपकिनने त्वचा स्वच्छ करा. त्यानंतर तुमच्या आवडत्या तेलाने हळुवार पणे ओठांवर मसाज करा.
स्टेप ५ – बर्फांमध्ये एखादा टीश्यू पेपर ठेवून हा थंड टीश्यू थोडावेळ ओठांवर ठेवा. आठ ते दहा मिनीटांनी काढून टाका ज्यामुळे तुमच्या ओठांना नैसर्गिक चमक मिळेल.
स्टेप ६ – तेल त्वचेत मुरण्यासाठी पुन्हा हुळूवारपणे त्वचेवर मसाज करा. ज्यामुळे तेल तुमच्या त्वचेत लॉक होईल आणि त्वचेला मऊ करेल.
स्टेप ७ – ओठ स्वच्छ करताना तेल पुर्णपणे निघून जाणार नाही याची काळजी घ्या. कारण असं झाल्यास तुमची त्वचा पुन्हा कोरडी होईल. जास्तीचे तेल फक्त टीश्यू पेपरने टिपून घ्या. सर्वात शेवटी ओठांवर तुमचे आवडते पेट्रोलियम जेली, लिप बाम अथवा लिप टिंट लावा आणि बाहेर जाण्यासाठी तयार व्हा.
फोटोसौजन्य –
अधिक वाचा –
सोप्या टिप्स फॉलो करून घरीच बनवा केसांसाठी सनस्क्रिन
या हर्बल पावडर तुमच्या ब्युटी किटमध्ये असायलाच हव्यात, मिळेल सुंदर त्वचा