DIY लाईफ हॅक्स

लॅपटॉप जास्त काळ टिकण्यासाठी अशी घ्या काळजी

Trupti Paradkar  |  May 8, 2022
tips to extend the lifespan of your laptop

वर्क फ्रॉम होममुळे आजकाल आपण घरातच आपला ऑफिस डेस्क बनवला आहे. काही लोकांना ऑफिसची कामं घरात करावी लागतात म्हणून त्यांना सतत लॅपटॉपची गरज भासते. ऑनलाईन शाळा, कॉलेजमुळे विद्यार्थ्यांकडेही लॅपटॉप असतो. सहाजिकच या लॅपटॉपची काळजी घेणं आपली जबाबदारी आहे. बऱ्यादचा नव्या तंत्रज्ञानामुळे गॅझेट्समध्ये सतत अपडेट होत असतात. पण जर तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींसाठी सतत लॅपटॉप चेंज करायची सवय नसेल तर त्याची अशी निगा राखा की तो खूप वर्ष चांगल्या अवस्थेत टिकेल. 

प्रेमाने हाताळा

अनेकांना वस्तू धुसमुसळेपणाने हाताळण्याची सवय असते. पण लक्षात ठेवा लॅपटॉप असो वा एखादं इतर गॅझेट… नाजूक असल्यामुळे तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने ते हाताळलं तर ते लवकर खराब होतं. म्हणूनच तुमच्या लॅपटॉपचे आयुष्य वाढण्यासाठी तुम्ही तो नाजूक पणे हाताळायला हवा. लॅपटॉप हातातून सटकणार नाही, आपटला जाणार नाही याची काळजी घ्या. कारण एकदा लॅपटॉपची स्क्रीन खराब झाली तर तो पुन्हा पूर्वीसारखा होत नाही. चांगल्या पद्धतीने काळजी घेतली तर लॅपटॉपची हार्ड ड्राईव्हपण खूप काळ टिकते.

स्वच्छता राखा

नियमित लॅपटॉप स्वच्छ करणं तितकंच गरजेचं आहे. कारण तुमच्या लॅपटॉपच्या कीबोर्ड आणि इतर खाचखळग्यांमध्ये धुळ अडकून बसते. नीट स्वच्छ केला नाही तर लॅपटॉप ओव्हर हीट होऊन बिघडण्याची शक्यता वाढते. यासाठी एखाद्या मऊ ब्रश अथवा कापडाने लॅपटॉप स्वच्छ करा. लॅपटॉप स्वच्छ करण्यासाठी खास लिक्वीड आणि मायक्रो फायबर कापड मिळतं त्याने तो नियमित स्वच्छ करा. लॅपटॉप स्वच्छ करताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी ती ही की, लॅपटॉप वीजेसोबत जोडलेला असताना तो कधीच स्वच्छ करू नये. वीज पूरवठा बंद करून मगच तो स्वच्छ करावा. शिवाय की बोर्डच्या आतील भाग स्वच्छ करण्यासाठी इअर बड्सचा वापर करावा. टूथब्रशसारख्या कठीण ब्रशने लॅपटॉप स्वच्छ करू नये. 

हार्डवेअर अपग्रेड करा

लॅपटॉप जास्त काळ टिकण्यासाठी तो नियमित अपग्रेड करा. असं नाही केलं तर त्याचा स्पीड हळू हळू कमी कमी होत जातो. जास्त स्टोरेजसाठी लागणारी स्पेस तुमच्या लॅपटॉपचा स्पीड कमी करते. यासाठी लॅपटॉपची रॅम वाढवून घ्या. ज्यामुळे त्याचा स्पीड कमी होणार नाही.

काम झाल्यावर फॉलो करा या टिप्स

काम झाल्यावर लॅपटॉप असाच टेबलवर अथवा बेडवर ठेवू नका. कारण तुमचं लक्ष नसताना नकळत तो पडण्याची अथवा त्यावर काहीतरी आदळण्याची शक्यता असते. यासाठी काम झाल्यावर लॅपटॉप नीट चार्ज करून लॅपटॉप बॅग अथवा एखाद्या रॅकमध्ये ठेवून द्या. लॅपटॉप चार्ज करण्याची वायर अथवा त्यासोबत वापरल्या जाणाऱ्या इतर वस्तूंचीदेखील नीट काळजी घ्या. ज्यामुळे लॅपटॉप जास्त काळ टिकेल. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

Read More From DIY लाईफ हॅक्स