Fitness

‘या’ गोष्टी ज्या वाढवतील तुमची प्रतिकारशक्ती आणि ठेवतील तुम्हाला एकदम फिट!

Dipali Naphade  |  Jun 23, 2019
‘या’ गोष्टी ज्या वाढवतील तुमची प्रतिकारशक्ती आणि ठेवतील तुम्हाला एकदम फिट!

बाहेर खाताना तुम्हाला जर दहावेळा विचार करावा लागत असेल की, आपल्याला ही गोष्ट पचेल की, नाही किंवा आपण आजारी तर पडणारन नाही ना? तर अर्थातच तुमची प्रतिकारशक्ती (immunity) कमी असल्यामुळे तुम्ही असा विचार करता. तुमची शरीरातील प्रतिकारशक्ती कमी असल्यास, तुम्ही नेहमी आजारी पडता अथवा तुम्हाला ठराविक पदार्थच खात येत असतात. तुमच्या आजूबाजूला अशी बरीच माणसं तुम्हाला दिसतील. पण यासाठी तुम्हाला जर व्यवस्थित फिट राहायचं असेल आणि तुमची प्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर तुम्हाला काही गोष्टींची माहिती असायला हवी. तुम्ही या गोष्टींचं नियमित सेवन केल्यास, तुमची प्रतिकारशक्ती नक्कीच वाढते. तसंच रोजच्या आयुष्यातील काहीही खाल्ल्यानंतर तुमचं आजारी पडणंदेखील कमी होतं.

1. तुळशीची पानं

Shutterstock

तुळस ही अतिशय औषधीय वनस्पती आहे. तुळशीची पानं चहाच्या पाण्यात घातली अथवा नेहमीच्या पिण्याच्या पाण्यात उकळून घेतली अथवा सकाळी उठल्यानंतर काहीही न खात पिता तुळशीची पानं खाल्ल्यास तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते.

2. बदाम

Shutterstock

रोज रात्री 5-6 बदाम पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी त्याची सालं काढून हे बदाम खावेत. यामुळे तुमची स्मरणशक्ती चांगली होण्यास मदत होते. तसंच तुमच्या स्मरणशक्तीसह प्रतिकारशक्ती वाढवण्यासही बदामाची मदत होते. बदाम हे तुमच्या आरोग्यासही तितकेच उपायकारक आहेत.

3. लसूण

Shutterstock

खाण्यात लसूण स्वाद वाढवते हे तर सर्वांनाच माहीत आहे. पण याचे अनेकही फायदे आहेत. लसूण खाण्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते. सकाळी काहीही न खाता पाण्यासह लसणीच्या काही पाकळ्या खाल्ल्यास, तुमच्या आरोग्यासाठी उपायकारक ठरू शकतात. तुमच्या वयानुसार तुम्ही लसणीच्या पाकळ्या खाव्यात. कोणत्याही गोष्टीची अतिशयोक्ती करू नये त्यामुळे आपल्या वयाप्रमाणेच या लसणीच्या पाकळ्या खायला हव्यात. तसंच उन्हाळ्यात रिकाम्या पोटी लसूण खाणं नक्की टाळा. कारण याचा तुम्हाला त्रासही होऊ शकतो.

4. झोप

Shutterstock

हेल्दी डाएट करूनही जर तुम्ही सतत आजारी पडत असाल तर नक्कीच तुमची प्रतिकारशक्ती कमी आहे. पण त्याचबरोबर याचं प्रमुख कारण म्हणजे तुमची झोप पूर्ण न होणं. त्यामुळे तुम्ही दिवसभरात किमान 7 ते 8 तास नक्की झोप घ्यायला हवी.

5. ऊन

Vitamin-D तुमच्या शरीरातील कोणताही व्हायरस आणि इन्फेक्शन सुरु होण्यापासून रोखू शकतं. सकाळी तुम्ही उठल्यानंतर विटामिन डी मिळविण्यासाठी उन्हात थोडा वेळ बसा. सकाळी 6 ते 7.30 पर्यंत जी सूर्यकिरणं येतात त्यामध्ये तुम्ही व्यायाम करा, धावा आणि गेम्स खेळा. यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढायला मदत होते.

6. दही

Shutterstock

तुम्हाला दही आवडतं ना? दही प्रत्येकाच्या घरात असतं. आपल्या रोजच्या डाएटमध्ये दही सामील करून घ्या. तुम्हाला जर नुसतं दही आवडत नसेल तर त्यामध्ये फ्रूट रायता अथवा दुसऱ्या कोणत्याही स्वरूपात दही खाऊन घ्या आणि आपल्या डाएटमध्ये सामील करून घ्या.

7. ओट्स

Shutterstock

ओट्समध्ये फायबर असतात, जे आपल्या पचनशक्तीसाठी चांगलं असतं. रोज ओट्स खाण्यामुळे प्रतिकारशक्ती चांगली होते. तुम्ही वेगळ्या नाश्त्यामध्ये अथवा स्नॅक्समधून ओट्स वापरू शकता. ओट्स हे वजन कमी करण्यासाठीदेखील उपयोगी आहेत. ओट्स ही अशी वस्तू आहे की, त्यामुळे तुमच्या वजनावर तुम्ही नियंत्रण आणू शकता. त्यामुळे एक हेल्दी खाण्यामध्ये याचा समावेश होतो.

8. विटामिन-सी

Shutterstock

आवळा, लिंबू आणि संत्र्यामध्ये भरपूर प्रमाणात Vitamin-C असतं. विटामिन सी मधून तुमची प्रतिकारशक्ती वाढते. विटामिन सी transistor disease पासून लढण्याची ताकद देते. विटामिन सी बद्दल नेहमीच आपण ऐकत आलो आहोत. त्यामुळे याचा उपयोग काय हे आपल्याला सगळ्यांनाच माहीत असतं. पण त्याचा उपयोग कसा करायला हवा प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हे तुम्ही जाणून घ्यायला हवं.

9. जस्ट-टी

Shutterstock

ग्रीन-टी आणि ब्लॅक-टी दोन्ही तुमची प्रतिकारशक्ती वाढवते. पण तुम्हाला या दोन्ही गोष्टी प्यायला आवडत असतील तर दिवसभरात तुम्ही साधारणतः 2-3 वेळा ग्रीन टी अथवा ब्लॅक टी पिऊ शकता. ग्रीन टी आणि ब्लॅक टी जास्त प्रमाणात पिणं योग्य नाही.

हेदेखील वाचा – 

सुंदर दिसायचं असेल तर नियमित प्या ‘ग्रीन टी’

वजन कमी करण्याबरोबरच इतर गोष्टीतही फायदेशीर आहे हर्बल टी

Green Tea : मनाला शांत आणि शरीराला निरोगी ठेवणाऱ्या ‘ग्रीन टी’चे फायदे

रोज ‘10’ टीप्स करा फॉलो आणि करा वजन कमी

Read More From Fitness