Uncategorized

खुंटली असेल नखांची वाढ तर घरीच करा हे सोपे उपाय

Trupti Paradkar  |  Nov 24, 2021
Tips to Make Your Nails Grow Faster in Marathi

लांब आणि मजबूत नखं असणं हे निरोगी आरोग्याचे लक्षण आहे. सौंदर्य खुलवण्यासाठी बऱ्याचजणींना नखं वाढवण्याची हौस असते. पण जर तुमचा आहार संतुलित नसेल तर नखं लवकर ठिसूळ होतात आणि नखांची वाढही खुंटते. त्यामुळे जर तुम्हाला तुमची नखं लांब आणि मजबूत असावी असं वाटत असेल तर त्यांची योग्य निगा राखणं गरजेचं आहे. काही घरगुती उपाय करून तुम्ही तुमची नखं नैसर्गिक पद्धतीने मजबूत आणि लांब करू शकता.

नखं वाढण्यासाठी घरगुती उपाय 

नखं वाढवण्यासाठी नेल एक्सटेंशन हा पर्याय असला तरी नैसर्गिक पद्धतीने वाढलेली नखं जास्त मजबूत आणि निरोगी असतात. यासाठी अशी वाढवा तुमची नखं…

पैसे वाचवायचे असतील तर घरीच करा मेनिक्युअर – Manicure At Home In Marathi

आहार

नखं वाढवण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे पोषक आणि योग्य आहार घेणं. नखांच्या वाढीसाठी तुमच्या आहारात पुरेसे पोषक घटक असणं गरजेचं आहे. जर तुमचा आहार संतुलित नसेल तर तुमच्या नखांची वाढ खुंटते. ज्यांची नखं लवकर तुटतात अथवा लवकर वाढत नाहीत त्यांनी आहारामध्ये प्रोटिन्सचे प्रमाण वाढवणे गरजेचे आहे. प्रोटिन्समुळे नखं मजबूत आणि निरोगी राहतात. त्याचप्रमाणे नखांच्या वाढीसाठी शरीराला बायोटिनची गरज असते. हे एक असं व्हिटॅमिन आहे ज्यामुळे नखं मजबूत होतात अंडी, केळं, मशरूम, तृणधान्यामध्ये भरपूर प्रमाणात हे व्हिटॅमिन आढळते. यासाठी आहाराकडे नीट लक्ष द्या.

भरपूर पाणी प्या

शरीराची सर्व कार्य योग्य पद्धतीने होण्यासाठी शरीराला पुरेशा पाण्याची गरज असते. नखं आणि केसांच्या वाढीसाठी शरीरात पाण्याची पातळी संतुलित राखणं गरजेचं आहे. कारण जर तुमचे शरीर हायड्रेट असेल तरच तुमची नखं आणि केस मजबूत होतात. यासाठी दिवसभरात पुरेसे पाणी प्या. सतत पाणी पिण्याचा कंटाळा येत असेल तर नारळपाणी, फळांचा रस, सूप असे पदार्थ अवश्य प्या.

Tips to Make Your Nails Grow Faster in Marathi

सतत नेल रिमूव्हर वापरणे टाळा

नखं चांगली दिसावी यासाठी तुम्ही सतत निरनिराळ्या शेडच्या नेलपेंट लावत असाल तर त्या काढण्यासाठी तुम्हाला वारंवार नखांवर नेल रिमूव्हर, अॅसिटोन वापरावं लागतं. असं सतत नखांवर केमिकलयुक्त अॅसिटोन वापण्यामुळे तुमच्या नखांचे आरोग्य बिघडते. नखांची वाढ खुंटण्यामागचं हे एक महत्त्वाचं कारण असू शकतं. 

घरीच फ्रेंच मेनिक्युअर करण्यासाठी फॉलो करा या सोप्या टिप्स

नखं नियमित ट्रिम करा

नखे वेळच्या वेळी कापणे, नखांची योग्य निगा राखणे आणि नखांनी योग्य शेप देणे अत्यंत गरजेचे आहे. जर तुम्हाला नखं वाढवण्याची हौस असेल तर नखे तुटू नयेत यासाठी नखांना वेळच्या वेळी ट्रिम करा. नखे स्वच्छ करा आणि हातांना नियमित मॉइस्चराईझ करा. ज्यामुळे तुमची नखं आणि हात सुंदर आणि निरोगी राहतील. 

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी फॉलो करा ‘या’ टीप्स (Tips To Remove Calcium Deficiency In Marathi)

Read More From Uncategorized