DIY लाईफ हॅक्स

वापरलेल्या टी बॅग टाकून न देता असा करा पुर्नवापर

Trupti Paradkar  |  Jul 8, 2021
वापरलेल्या टी बॅग टाकून न देता असा करा पुर्नवापर

पावसाळा आणि सोबत वाफाळता चहा म्हणजे अक्षरशः स्वर्गसुखच म्हणावं लागेल. अनेकजण चहाचे चाहते असतात. त्यामुळे थंडीपावसाच्या दिवसांमध्ये दिवसभरात दोन ते तीन वेळ चहा घरात केला जातो. ऑफिसमध्ये आजकाल तयार टीबॅग्ज मिळतात. गरम पाण्यात डीप करत तुम्ही कधीही हवा तितका चहा बनवू शकता. मात्र चहा घेतल्यावर वापरलेल्या टी बॅग्ज तुम्ही सहज फेकून देता. या  टीबॅग्ज फेकून न देता तुम्ही त्याचा सहज पुर्नवापर करू शकता. जाणून घ्या  कशासाठी तुम्ही या टी बॅग्ज वापरू शकता. 

वापरलेल्या टी बॅग्ज पुन्हा वापरण्यासाठी टिप्स

आज आम्ही तुम्हाला टी बॅग्ज पुन्हा कशा वापराव्या याबाबत काही सोप्या टिप्स शेअर करत आहोत.

झाडांच्या खतासाठी –

उकळवलेल्या टी बॅग्जपासून तुम्ही तुमच्या घरातील झाडांसाठी उत्तम खत बनवू शकता. ज्यामुळे तुमच्या झाडाला कोणतेही इनफेक्शन होणार नाही. शिवाय टी बॅग्ज मातीत मिसळून जात असल्यामुळे तुमच्या झाडांचे चांगले  पोषणदेखील यामुळे होऊ शकते. तुम्ही झाडांच्या मातीत टी बॅग्जप्रमाणे उकळलेल्या चहाचे पाणी अथवा चहापावडरदेखील घालू शकता. 

बूटांचा दुर्गंध कमी करण्यासाठी –

शूज अथवा पॅक्ड फूटवेअर वापरण्यामुळे तुमच्या पायांना आणि फूटवेअरला एक प्रकारचा दुर्गंध येतो. मात्र जर तुमच्याकडे वापरलेल्या टी बॅग्ज असतील तर तुम्ही तुमच्या पायांना येणारा दुर्गंध नक्कीच कमी करू शकता. कारण टी बॅग्जमुळे तुमच्या शूजमधील घाणेरडा वास शोषून घेतला जातो. घरातील दुर्गंध घालवण्यासाठी तुम्ही फ्रीज अथवा डस्टबिनजवळही या टीबॅग्ज ठेवू शकता.

काचेच्या वस्तू स्वच्छ करण्यासाठी-

घरातील काचेच्या वस्तू, काचेचे दरवाजे आणि खिडक्या शिवाय टेबल खुर्ची स्वच्छ करणे म्हणजे एक प्रकारची डोकेदुखीच असते. कारण कितीही स्वच्छ केल्या तरी या वस्तू पुन्हा क्लिन दिसत नाहीत. यासाठीच काचेच्या वस्तू स्वच्छ करण्यासाठटी घरातील वापरलेल्या टी बॅग्ज वापरा. या टी बॅग्ज काचेवर थोड्याशा रगडल्या तरी तुमच्या घरातील काचेच्या वस्तू आणि सामान लक्क दिसू लागेल.

मेनिक्युअर आणि पेडिक्युअरसाठी –

चहाच्या बॅग्जमध्ये चहामधील घटक असतात. चहा पावडरमुळे तुमच्या शरीरावरील डेड स्किन कमी होण्यास मदत होते. मेनिक्युअर आणि पेडिक्युअर करण्यामागचा मुख्य उद्देश तुमच्या हातापायावरील त्वचा स्वच्छ करणे हाच असतो. त्यामुळे मेनिक्युअर आणि पेडिक्युअर करण्यासाठी तुम्ही वापरलेल्या टी बॅग्ज नक्कीच वापरू शकता. चहा पावडरमधील अॅंटि ऑक्सिडंट तुमच्या त्वचेवर एक नैसर्गिक चमक निर्माण करतील. 

डोळ्यांना थंडावा देण्यासाठी –

दिवसभराच्या दगदगीनंतर तुम्हाला काही वेळ घरात रिलॅक्स पडून राहवं असं नक्कीच वाटत असतं. दिवसभर धावपळ झाल्यास तुमच्या  डोळ्यांची जळजळ होते आणि डोळे लालसर होतात. अशा वेळी तुम्ही वापरलेल्या दोन टी बॅग्ज तुमच्या डोळ्यांवर ठेवून आराम करू शकता. चांगल्या परिणामासाठी टी बॅग्ज काही वेळ फ्रीजमध्ये ठेवा आणि मग डोळ्यांवर ठेवा. ज्यामुळे तुमच्या डोळ्यांना थंडावा मिळेल. 

तेलकट भांडी घासण्यासाठी –

भारतीय स्वयंपाक करताना तुम्हाला सतत चिकट, तेलकट भांड्याचा सामना करावा लागतो. अशी भांडी स्वच्छ करण्यासाठी तुम्ही वापरलेल्या टी बॅग्ज वापरू शकता. या टी बॅग्जमुळे तुमची चिकट भांडी तर स्वच्छ होतीलच शिवाय भांडी निर्जंतूकदेखील होतील. यासाठीच वापरलेल्या  टी बॅग्ज कधीच फेकून देऊ नका. 

पावसाळ्याचा दुर्गंध घालवण्यासाठी –

पावसाळ्यात घरात कुबट वास येतो. ओसलरपणा आणि बुरशीमुळे हा वास घरात पसरतो. मात्र यावर उपाय करण्यासाठी तुम्ही वापरलेल्या टी बॅग्ज एखाद्या अॅरोमा तेलात बूडवून घरात अडकवून ठेवू शकता. ज्यामुळे तुमच्या घरातील घाणेरडा वास लगेच कमी होईल. या टी बॅग्ज तुम्ही एखाद्या एअर फ्रेशनरप्रमाणे वापरू शकता. 

फोटोसौजन्य – pixels

अधिक वाचा –

वजन कमी करण्यासाठी प्या कडीपत्त्याचा रस, जाणून घ्या फायदे

ओठांशिवाय इतरही गोष्टींसाठीही होऊ शकतो व्हॅसलिन पेट्रोलियम जेलीचा वापर (Vaseline Uses In Marathi)

DIY: तुमची फेव्हरेट लिपस्टिक अचानक तुटली, तर करा तिचा असा वापर

Read More From DIY लाईफ हॅक्स