DIY लाईफ हॅक्स

पांढऱ्या कपड्यांचा रंग पिवळसर पडला असेल तर या टिप्स वापरा 

Vaidehi Raje  |  Jul 22, 2022
White Clothes Washing Tips

जीवनात प्रत्येक रंगाचे वेगवेगळे महत्त्व आहे. जेव्हा मन प्रसन्न असते तेव्हा आपल्याला हे जग रंगेबेरंगी वाटते आणि दुःखी असताना मात्र जग भेसूर वाटू लागते. पांढरा रंगही याला अपवाद नाही. पांढरा रंग हा शुद्धतेशी व पावित्र्याशी जोडला गेला आहे. तसेच पांढऱ्या शुभ्र रंगाचे कपडे क्लासी दिसतात. पण याचा एक तोटा देखील आहे की पांढरे कपडे फार लवकर मळतात.  आणि ते एक दिवस किंवा काही तासांपेक्षा जास्त काळ घालता येत नाही. कालांतराने पांढऱ्या कपड्यांची चमक आणि शुभ्रपणा कुठेतरी हरवायला लागतो. अशा परिस्थितीत आपण त्यांना फेकून देतो किंवा घरातील कामासाठी वापरतो. जर तुम्हालाही अशीच समस्या असेल तर आज आम्ही तुम्हाला अशाच काही युक्त्या सांगत आहोत, ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमचे पांढरे कपडे चमकदार ठेवू शकता आणि त्यावर आलेला पिवळेपणा दूर करू शकता.

असे धुवावेत पांढरे कपडे 

पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पांढरे कपडे कधीही रंगीत कपड्यांबरोबर एकत्र भिजवू किंवा धुवू नयेत. त्यामुळे एकाचा रंग दुसऱ्या कपड्याला लागतो त्यामुळे पांढरा ड्रेस किंवा शर्ट खराब होतो. आणि मग कपड्यावरील डाग कसे काढावे हा प्रश्न पडतो. पांढऱ्या कपड्यांचा पिवळसरपणा दूर करण्यासाठी त्यांना लिंबू घातलेल्या पाण्यात रात्रभर भिजवा. याशिवाय, त्यांची चमक परत आणण्यासाठी तुम्ही व्हिनेगर देखील वापरू शकता. या दोन्ही गोष्टी तुमच्या कपड्यांचे वैभव परत आणण्याचे काम करतील.याशिवाय जास्त डिटर्जंट घालून पांढरे कपडे भिजवू नका. त्यामुळे त्यांचे नुकसान होण्याची शक्यता अधिक वाढते. अधिक डिटर्जंट वापरल्याने लोकांना वाटते की कपडे अधिक स्वच्छ आणि पांढरेशुभ्र दिसतील. पण हा गैरसमज आहे.

White Clothes Washing Tips

जर तुमच्या कपड्यांवर हट्टी डाग पडले असतील तर बेकिंग सोडा ते दूर करू शकतो. तुम्हाला फक्त डाग पडलेल्या भागावर बेकिंग सोडा लावायचा आहे आणि ब्रशने घासायचा आहे. बेकिंग सोडा कपड्यावर लावून काही वेळ ठेवा आणि नंतर कोमट पाण्याने कपडे धुवा. यामुळे डाग हलका होईल. तसेच मीठ वापरून देखील डाग काढता येतात. डागाच्या ठिकाणी फक्त एक छोटा चमचा मीठ टाका, नंतर अर्धे लिंबू चिरून त्या जागी चोळा. असे केल्याने हट्टी डाग नाहीसे होतात.

हायड्रोजन पेरोक्साईडचा वापर करा 

हायड्रोजन पेरोक्साईडच्या वापराने डाग काढले जाऊ शकतात. डाग दूर करण्यासाठी हा सर्वोत्तम उपाय मानला जातो. यासाठी, हायड्रोजन पेरॉक्साइड गरम पाण्यात टाका आणि ते पाणी डाग असलेल्या भागावर टाका. हे काही वेळ ठेवून ब्रशने घासल्यास डाग निघून जातो. हट्टी डाग घालवण्यासाठी हा सोपा घरगुती उपाय आहे. 

लिंबू आहे फायदेशीर 

लिंबाचा वापर फक्त खाण्यापिण्यातच केला जात नाही तर लिंबाच्या मदतीने तुम्ही अनेक प्रकारच्या समस्यांपासून सुटका मिळवू शकता. एवढेच नाही तर फक्त एका लिंबाच्या मदतीने तुम्ही तुमच्या कपड्यांचा पिवळसरपणा दूर करू शकता. यासाठी एका भांड्यात पाणी उकळून घ्या, त्यात लिंबाचा रस घाला आणि पुन्हा दोन ते तीन मिनिटे गॅसवर ठेवा. तुमचे कपडे त्या गरम पाण्यात तासभर भिजवा किंवा तुम्ही तुमच्या नेहमीच्या डिटर्जंटमध्ये लिंबाचा रस देखील घालू शकता.

White Clothes Washing Tips

बेकिंग सोडा

बेकिंग सोडा तुमचे कपडे कायम नवीन राहावेत यासाठी देखील उपयुक्त आहे. यासाठी तुम्ही 4:1 च्या प्रमाणात पाणी आणि बेकिंग सोडा मिसळा आणि त्यात तुमचे पिवळे कपडे भिजवा. सुमारे एक तास कपडे भिजू द्या. काही वेळाने कपडे साध्या पाण्याने धुवा. असे केल्याने तुमच्या निस्तेज पांढऱ्या कपड्यांची चमक परत येईल.

अशाप्रकारे तुम्ही पांढरे कपडे पुन्हा नव्यासारखे चमकदार बनवू शकता. 

Photo Credit – istockphoto

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

Read More From DIY लाईफ हॅक्स