भविष्य

आज ‘या’ राशीमध्ये उत्कर्षाचा योग आहे

Trupti Paradkar  |  Dec 23, 2018
आज ‘या’ राशीमध्ये उत्कर्षाचा योग आहे

मेष- वातावरण बदलल्यामुळे आजारी पडण्याची शक्यता आहे. आहाराबाबत काळजी घ्या. नोकरी अथवा बिझनेसमधील तणावाचा त्रास करुन घेऊ नका. वरीष्ठांकडून सहकार्य मिळेल. पार्टनरशिपमध्ये केलेल्या कामांमध्ये यश मिळेल.  

कुंभ- आजारपण येण्याची शक्यता आहे. आहाराबाबत काळजी घ्या. नोकरी अथवा बिझनेसमधील तणावाचा त्रास करुन घेऊ नका. वरीष्ठांकडून सहकार्य मिळेल. पार्टनरशिपमध्ये केलेल्या कामांमध्ये यश मिळेल.  

मीन– कौटुंबिक जीवन सुखाचे असेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. घरातील सुखसोयी वाढतील. कुंटुंबात तुमचे कौतुक होईल. नोकरी करणाऱ्या महिलांना चांगले सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यी अभ्यासात रस घेतील.   

वृषभ- विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांना यश मिळेल. शिक्षणासाठी  घरापासून दूर जावे लागेल. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या वाढतील. अडकलेली कामे मार्गी लागतील. बिझनेसमध्ये वाढ होईल.  

मिथुन- घर मिळण्यात अडचणी येतील. विरोधकांकडून नुकसान होण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यात रस घ्या. वादविवादांपासून दूर रहा. एखादी तुमच्यासाठी अहिताची गोष्ट घडू शकते. दैनंदिन कामांचा कंटाळा करू नका.  

कर्क- आरोग्याबाबत सावध रहा. लक्षपूर्तीसाठी मन उत्साहित असेल. जास्त दगदग होण्याची शक्यता आहे. मात्र त्यामुळे फायदाच होईल. जोडीदारासोबत वेळ मजेत जाईल. कुंटुंबासह धार्मिक स्थळी जाण्याचा बेत ठरेल.

सिंह- प्रियकरासोबत वाद होतील. छोट्या-छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा. आरोग्याची काळजी घ्या. नोकरी करणाऱ्यांनी वादविवादांपासून दूर रहा. मित्रांचे सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यात रस घ्याल.

कन्या- नवीन प्रोजेक्टमुळे फायदा होईल. करिअरमध्ये उत्कर्ष होण्याची शक्यता. आर्थिक बाजू मजबूत होईल. नातेसंबंध सुधारतील. एखादी गोष्ट टाळण्याने समस्या वाढतील. सामाजिक पार्टीत सहभागी होण्याची संधी मिळेल.

तुळ- आजारी भावंडाची काळजी घेण्यात दिवस जाईल. एखाद्या गोष्टीमुळे नाराज व्हाल. आत्माविश्वास कमी होईल. घरातील खर्च वाढेल. पार्ट-टाईम उद्योगासाठी वेळ काढावा लागेल. जुन्या कटकटींपासून सुटका मिळेल.

वृश्चिक- कौटुंबिक सहकार्यामुळे कठीण कामे मार्गी लागतील. आई-वडीलांचे सहकार्य मिळेल. सासरकडून लाभ मिळेल. आज तुमच्या घरात सुख पाणी भरेल. कामात प्रमोशन मिळेल. बिझनेसमध्ये राजकीय सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

धनु- विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष द्या. बिझनेसमध्ये समस्या डोकं वर काढतील. सहकार्यांकडून अथवा नातेवाईकांकडून त्रास होण्याची शक्यता आहे. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. वातावरणातील बदलांमुळे शारीरिक समस्या निर्माण होतील.

मकर- नवीन ओळखीमुळे लाभ होतील. करिअरमध्ये वरीष्ठांचे सहकार्य मिळेल. बिझनेसमधील यशामुळे आत्मविश्वास वाढेल. अडकलेले पैसे मिळणं कठीण जाईल. घरात धार्मिक समारंभांचे आयोजन कराल. जोडीदाराची साथ लाभेल.

Read More From भविष्य