सॅनिटरी पॅड दर महिन्याला लागणारा महिलांसाठीचा प्रकार आहे. आपल्या कम्फर्टनुसार आपण सॅनिटरी पॅड निवडत असतो. पण खूप जणांची त्वचा ही फारच संवेदनशील प्रकारातील असते. त्यांना अगदी कोणतेही चांगले सॅनिटरी पॅड वापरले तरी देखील त्रास होण्याची दाट शक्यता असते. अशावेळी कधी एकदा सॅनिटरी पॅड बदलतो असे होऊन जाते. इतकेच नाही तर ज्यांना दिवसभर सॅनिटरी पॅड बदलता येत नाही. अशांना तर साधारण सॅनिटरी पॅड नकोसे होऊन जाते. सॅनिटरी पॅडला पर्याय नाही अशातला भाग नाही कारण टॅम्फॉन (Tampons), मेन्स्टुरल कप (Menstural Cup) असे पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. पण ते सगळ्यांनाच आवडतील असे नाही. म्हणूनच त्याला पर्यायांती पिरेड्स पँटी असा पर्याय सध्या बाजारात दिसू लागला आहे. जाणून घेऊया यांच्याविषयी अधिक
पिरेड्स पँटी आहेत तरी काय?
ज्याप्रमाणे लहान मुलांना डायपर वापरले जाते अगदी तशाच असतात या पिरेड्स पँटी. या पँटी अगदी डायपर सारख्या असतात. त्याच्यावर तुम्हाला सॅनिटरी पॅड लावायची काहीही गरज नसते. त्यामुळे लीकची शक्यता अजिबात नाही. जशी रेग्युलर पँटी तुम्ही घालता त्याचप्रमाणे तुम्हाला या पँटी घालायच्या असतात. ज्या तुमच्या कोणत्याही कपड्यांची स्टाईल घालवत नाहीत. त्यामुळेच तुम्ही हा पर्याय अगदी हमखास निवडू शकता.
पिरेड्स पँटी घालण्याचे फायदे
तुम्ही पिरेड्स पँटी का निवडायला हवी असा विचार करत असाल तर त्याचे फायदे तुम्हाला नक्कीच आवडतील .
- पिरेड्स पँटीमध्ये तुम्हाला दुसरे काहीही घालायची गरज नसते. या फुल कव्हरेजच्या पँटी असतात. त्यामुळे लिकेजची शक्यता तशी काही नसते.
- पिरेड्स पँटीमध्ये वापरले जाणारे इलास्टिक हे खूपच सॉफ्ट असते ज्यामुळे तते तुम्हाला फारसे लागत नाही.
- या पँटी घातल्यानंतर तुम्हाला काहीही वेगळे घालण्याची गरज नसते.
- ज्या प्रमाणे तुम्ही पँटीची साईज निवडता अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला पिरेड्सच्या पँटीचीही साईज निवडायची असते. त्यामुळे त्याची फिटिंग चांगली बसण्यास मदत मिळते.
- पिरेड पँटीमध्ये फ्लो रोखण्याची क्षमताही अधिक असते जिचा फायदा आपल्याला नक्की होण्यास मदत मिळते.
अशी घ्या काळजी
पिरेड पँटी ही कितीही चांगली आणि कम्फर्टेबल असली तरी देखील तुम्ही काही गोष्टींची काळजी ही घ्यायलाच हवी याचे कारण असे की, स्वच्छतेच्या बाबतीत तुम्ही कोणतीही हयगय करुन चालत नाही. तुम्ही योग्य वेळी या पँटी बदलायला हव्यात. इतकेच नाही तर त्या डिस्पोज करतानाही दिलेल्या सूचनेनुसार करणे फारच जास्त गरजेचे असते.
यंदा तुम्ही पिरेड्समध्ये रॅशेश येऊ नये असे वाटत असेल तर या पँटी नक्की वापरा
Read More From Uncategorized
चार वर्षांनंतर ‘पठाण’मधून परत येण्यासाठी शाहरूखने घेतली मेहनत, ट्रेनरने केला खुलासा
Trupti Paradkar