मनोरंजन

‘भारत माझा देश आहे’ मध्ये झळकणार प्रेक्षकांचा आवडता ‘लाडू’

Dipali Naphade  |  Apr 25, 2022
tuzyat-jeev-rangla-fame-ladoo-to-act-in-bharat-maza-desh-aahe-movie-in-marathi

देशभक्तीच्या भावनेने भरलेला ‘भारत माझा देश आहे’ (Bharat Maza Desh Aahe) हा चित्रपट येत्या 6 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ही कथा एका गावातील आहे, जिथल्या प्रत्येक घरातील व्यक्ती सैनिकात आहे. टिव्हीवर झळकलेल्या एका ब्रेकिंग न्यूजनंतर सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबियांची घालमेल, भीती यात पाहायला मिळणार आहे. यात मंगेश देसाई (Mangesh Desai), हेमांगी कवी (Hemangi Kavi), शशांक शेंडे (Shashank Shende), छाया कदम (Chhaya Kadam) यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटातून राजविरसिंह राजे गायकवाड आणि देवांशी सावंत हे दोन चिमुकले चेहरे प्रेक्षकांसमोर येणार आहेत. या दोघांचाही हा पहिला चित्रपट असून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी व्यक्तिरेखा या चिमुरड्यांनी साकारली आहे. यापूर्वी राजविरसिंह राजे गायकवाड मालिकेतील ‘लाडू’ या व्यक्तिरेखेमुळे घराघरांत पोहोचला. ‘भारत माझा देश आहे’च्या माध्यमातून राजविरसिंह (Rajveesingh Raje Gaikwad) चित्रपटात पदार्पण करत आहे. 

सामाजिक संदेशासह मनोरंजन करणारा चित्रपट

चित्रपटाचे दिग्दर्शक पांडुरंग जाधव म्हणतात,” या चित्रपटात या दोन्ही बालकराकारांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. या दोघांच्या माध्यमातून आम्ही सामाजिक संदेश देण्याच्या प्रयत्न करत आहोत. हा चित्रपट प्रत्येक पाल्याने आपल्या पालकांसोबत आवर्जून पाहावा असा आहे. सामाजिक संदेश देण्याबरोबरच प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा हा चित्रपट असून यात एका बकरीचीही प्रमुख भूमिका आहे. ती कशी हे चित्रपट पाहिल्यावर कळेलच.’’ एबीसी क्रिएशन प्रस्तुत डॉ. आशिष अग्रवाल निर्मित या चित्रपटाची कथा पांडुरंग जाधव यांनीच लिहिली असून या चित्रपटाला समीर सामंत यांचे गीत लाभले आहे तर अश्विन श्रीनिवास यांनी संगीत दिले आहे. तर निशांत नाथाराम धापसे यांची पटकथा, संवाद असून निलेश गावंड यांनी ‘भारत माझा देश आहे’चे संकलन केले असून छायांकन नागराज यांनी केले आहे.

यापूर्वी केले होतो मालिकेत काम 

‘तुझ्यात जीव रंगला’ (Tuzyat Jeev Rangla) या मालिकेतून घराघरामध्ये ‘लाडू’ म्हणून प्रसिद्ध झालेला हा चेहरा आता चित्रपटात दिसणार आहे. मनात भरणारा असा हा बालकलाकार सर्वांच्याच आवडता झाला होता. त्यामुळे आता चित्रपटातून राजवीरसिंह काय कमाल दाखवणार हे पाहण्यासाठी नक्कीच प्रेक्षक उत्सुक आहेत. तर त्याच्यासह अजून एक बालकलाकार असून हा चित्रपट केवळ सामाजिक संदेश देणारा नाही तर मनोरंजन करणाराही आहे असे सांगण्यात येत आहे. याशिवाय राजवीरसिंह राजे गायकवाड याला या चित्रपटातून अनेक मान्यवर अभिनेत्यांसहदेखील काम करायला मिळत आहे. त्यामुळे या चित्रपटाची वेगळीच उत्सुकताही दिसून येत आहे. या मान्यवरांसह लाडूचे काम नक्की कसे होणार आणि त्याची या चित्रपटात काय वेगळी भूमिका असणार हे लवकरच प्रेक्षकांना जवळच्या सिनेमाघरात पाहता येणार आहे हे नक्की! दरम्यान या चित्रपटाने प्रदर्शित होण्याआधीपासूनच प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण केली आहे असं म्हटलं तर नक्कीच वावगं ठरणार नाही. लाडू अर्थात राजवीरसिंहच्या चित्रपटात असण्यामुळे नक्कीच या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From मनोरंजन