बॉलीवूड

कोकणातील तरूणाईवर भाष्य करणारा ‘उनाड’

Aaditi Datar  |  Jan 23, 2020
कोकणातील तरूणाईवर भाष्य करणारा ‘उनाड’

मराठी चित्रपटसृष्टीत प्रेक्षकांकडून चांगल्या विषयांना नेहमीच पसंती मिळत असते. अशाच चांगल्या आणि वेगळ्या विषयावर भाष्य करणारा सिनेमा घेऊन येत आहे निर्मात अजय अरोरा आणि आदित्य सरपोतदार यांची जोडी. उनाडमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे कोकणचा निसर्ग आणि तिथली बदलती तरूणाई. याचबाबत चित्रपटाच्या निर्माता आणि दिग्दर्शकांशी बातचित केली POPxoMarathi च्या टीमने.

‘उनाड’च्या निमित्ताने अजित अरोरा यांची मराठीत एंट्री

आपल्या भारत देशात संपूर्ण लोकसंख्येत सर्वाधिक तरूणाईचा समावेश आहे. याच तरूण वर्गाला नजरेसमोर ठेवत आदित्य आणि अजित यांनी उनाडचा विषय निवडला आहे. या विषय निवडण्यामागील कारण सांगताना निर्माता अजित अरोरा यांनी सांगितलं की, तरूणांचा विषय घेतल्यावर आईवडील आणि तरूणाई दोन्ही कनेक्ट होतात. त्यात आदित्य हे खूप चांगले दिग्दर्शक आहेत. त्यांचा प्रत्येक सिनेमा हा त्यांचं प्रतिबिंब आहे. त्यामुळे मराठीत आणि तेही आदित्यसोबत काम करणं माझ्यासाठी खूपच आनंददायी आहे. अजित अरोरा यांनी उनाड आधी 377 Ab Normal या अर्थपूर्ण वेबकंटेटची निर्मिती केली होती. त्यानंतर मराठीतला त्यांचा पहिलाच सिनेमा आहे.

आदित्यला पुन्हा एकदा कोकणची भुरळ

दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाहीच. त्यांनी मराठीत आत्तापर्यंत एक से एक सिनेमा दिले आहेत. त्यापैकी पूर्णतः तरूणाईवर केंद्रित असणारा हा पहिला सिनेमा आहे. नारबाची वाडी आणि अजून एका प्रोजेक्टच्या निमित्तानेच आदित्य यांना कोकणातील तरूण पिढीला जवळून पाहता आलं आणि मग विचार आला तो उनाड चित्रपट बनवण्याचा. याबद्दल सांगताना आदित्य म्हणाले की, मी कोकणातला आहे. कोकणातल्या तरूणाईचे विचार वेगळे आहेत. विचारसरणी वेगळी आहे. हा विषय युथ ओरिएंटेड आहे. सध्याच्या युथला काय बघायचंय ते कसा विचार करतात, हे जाणून घेण्यात मला खूप उत्सुकता आहे. रोज घडणाऱ्या घडामोडींकडे युथ कसं बघतं. या चित्रपटात मुख्यतः कोळी आणि मासेमारी व्यवसायात असणाऱ्या कुटुंबातील मुलांची कथा आहे. या तरूणाईला भविष्यात काहीतरी करायचंय पण नेमकं काय ते अजून माहीत नाही. ही मुलं किशोरवयातली आहेत.

चित्रपटाची कास्ट आहे इंटरेस्टिंग

हा सिनेमा वास्तववादी आहे. त्यामुळे आम्ही कास्टिंग करताना कोकणात जाऊन तिथल्या स्थानिक कलाकारांच्या ऑडिशन्स घेतल्या आणि वर्कशॉप्सही घेतले. तसंच यामध्ये काही मुंबईतल्या वरळी आणि इतर कोळी भागातली मुलं आहेत. या सिनेमात आम्ही नवीन आणि तरूण चेहऱ्यांना संधी दिली आहे. काही ओळखीचे आणि लोकप्रिय चेहरेही आहेत. पण या सिनेमाच्या कास्टिंगचा संपूर्ण अनुभव खूपच वेगळा होता. असं अजित अरोरा आणि आदित्य सरपोतदार यांनी सांगितलं.

‘उनाड’चं संगीत

संगीत हा प्रत्येक चित्रपटातील मुख्य भाग असतो. तसंच उनाड चित्रपटाबाबतही असल्याचं आदित्य सरपोतदार यांनी सांगितलं. ‘हा चित्रपट म्युझिकल आहे. या चित्रपटात सात गाणी आहेत. त्यामुळे संगीत हा या चित्रपटाचा खूप महत्त्वाचा भाग आहे. कोकणातील लोकसंगीत आणि तरूणाईची आवड यांचं संगम यात तुम्हाला ऐकायला मिळेल. या चित्रपटाचं संगीत दिलं आहे गुलराज सिंग यांनी. ज्यांनी पाणी या राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमाला संगीत दिलं असून बॉलीवूडमध्येही भरपूर काम केलं आहे. तसंच ते ए आर रहमान यांना असिस्टही केलं आहे.

अजित अरोरा पुन्हा मराठीत निर्मिती करणार का?

भविष्यात कोणत्याही भाषेतील चांगला विषय समोर आल्यास मला नक्कीच त्यावर सिनेमा किंवा वेबसीरिज करायला आवडेल. कारण चांगल्या विषयांना भाषेचं बंधन नसतं.

POPxoMarathi टीमकडून उनाडच्या टीमला खूप खूप शुभेच्छा.  

‘अनन्या’ आता झळकणार रुपेरी पडद्यावर, रवी जाधव करणार निर्मिती

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

 

पार्थ समथान आणि हिना खान बनले 2019 चे टॉप टेलीव्हिजन स्टार्स

Read More From बॉलीवूड