Fitness

तुम्हालाही सवय आहे का जेवताना कच्चं मीठ खाण्याची

Aaditi Datar  |  Nov 3, 2019
salt

जर जेवणात थोडं जरी मीठ (Salt) कमी पडलं तर ते जेवण बेचव लागतं आणि जास्त झालं तर जेवण जात नाही. त्यामुळे आपल्यापैकी बऱ्याच जणांना जेवताना वरून कच्चं मीठ घालून खाण्याची सवय असते. ज्यामुळे मीठं कमी असेल तर नंतर घालून खाता येईल. पण तुम्हाला माहीत आहे का, शिजवलेल्या जेवणात वरून मीठ घातल्यास अनेक त्रास होऊ शकतात. मीठ हा असा घटक आहे ज्याचं योग्य प्रमाणातच सेवन करणं आरोग्यासाठी खूप आवश्यक आहे.

Shutterstock

मीठाचं सेवन हे कमी किंवा जास्त आपल्यासाठी घातक ठरू शकतं. तज्ञांच्या मते तर शिजवलेल्या जेवणात वरून कच्चं मीठ घालून खाणं हे विषासमान आहे. चला नजर टाकूया कच्चं मीठ खाल्ल्याने काय नुकसान होतं ते –

कच्चं मीठ आरोग्यासाठी घातक

डॉक्टर्सनुसार जास्त मीठाच्या सेवनाने ब्लड प्रेशर, जाडेपणा आणि अस्थमा होण्याची शक्यता आहे. पण तुम्ही जाणून हैराण व्हाल की, कच्चं मीठ खाल्लाने हार्ट प्रोब्लेम आणि किडनीचा आजार होण्याचा धोका जास्त होतो.

हायपरटेंशन होण्याची समस्या

शिजवलेल्या जेवणात वरून मीठ घातल्यास अनेक आजार होण्याचा धोका होतो. खरंतर शिजलेल्या जेवणातील मीठात असलेलं आर्यन शरीरात सहज पचवता येतं पण कच्च्या मीठाचं सेवन शरीरावर प्रेशर पाडतं. ज्यामुळे हायपरटेंशनची समस्या निर्माण होते.

का आहे हानीकारक मीठाचं कमी सेवन

Shutterstock

ज्याप्रकारे मीठाचं अधिक सेवन शरीरासाठी हानीकारक आहे तसंच मीठाचं कमी सेवनही नुकसानदायक आहे. संतुलित प्रमाणात मीठ खाल्ल्याने शरीराचं ब्लडप्रेशर संतुलित राहतं. नाहीतर लो बीपीचा त्रास होऊ शकतो.

मीठाचं योग्य प्रमाण किती?

एका व्यक्तीने दिवसाला फक्त 2 छोटे चमचे मीठाचं सेवन केलं पाहिजे. ज्यांना ब्लडप्रेशरचा त्रास आहे त्यांनी दिवसभरात फक्त अर्धा चमचा मीठाचं सेवन करावं.

हाडं होतात ठिसूळ

शिजवलेल्या जेवणात वरून कच्चं मीठ घातल्यास मूतखडा आणि ऑस्टियोपोरोसिस (हाडं ठिसूळ होणं) सारखे धोकादायक आजार तुम्हाला होऊ शकतात. एका रिसर्चनुसार मीठामध्ये सोडीअमची मात्रा जास्त असते. सोडीअमच्या जास्त सेवनाने मूत्रामार्फत सोडीअमसोबत कॅल्शियमही शरीराबाहेर पडतं.

किडनीवर कच्च्या मीठाचा परिणाम

कच्च्या मीठाचा किडनीवरही नकारात्मक परिणाम होतो. जेव्हा शरीरात मीठाचं प्रमाण वाढतं तेव्हा शरीरात पाणी होऊ लागतं आणि ते पाणी उत्सर्जित होत नाही त्यामुळे किडनी स्टोन होऊ होण्याची शक्यता असते. यासाठी आहारात मीठाचे प्रमाण कमी करणे आणि मुतखड्यावर घरगुती उपाय करणं गरजेचं आहे.

तहान लागते कमी

Shutterstock

एका रिसर्चनुसार, मीठाचं अधिक सेवन केल्याने तहान कमी आणि भूक जास्त लागते. यामुळे कळतं की, मीठाच्या अधिक सेवनाने गंभीर परिणाम सोसावे लागतात.

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

हेही वाचा –

जीभेच्या रंगावरून ओळखा तुमच्या आरोग्य समस्या

आरोग्यदायी पंचामृत सेवनाचे फायदे

बांगड्या आहेत आरोग्यासाठी फायदेशीर, कसं ते जाणून घ्या

बदामाचा उपयोग कराल तर मिळेल सुंदर त्वचा

Read More From Fitness