मनोरंजन

वांद्र्यात अशा अवतारात दिसली उर्फी जावेद

Leenal Gawade  |  Jun 3, 2022
urfi_javed_fb

उर्फी कधी काय करेल कोणालाही सांगता येत नाही. तिच्या वेगवेगळ्या फॅशन या रोजच्या चर्चेच्या विषय असतात. ती कुठे आणि कशी जाते? यासाठी पापाराझी तिच्या मागे असतात. कधी साखळी, कधी पिना, कधी प्लास्टिक, कधी काचा असे काहीही ती परिधान करुन येत असते. नुकतीच ती वांद्र्यात एका रेस्ट्रॉरंटच्या बाहेर स्पॉट झाली. यावेळी तिने जे कपडे घातले ते पाहून सगळ्यांनाच डोक्यावर हात मारण्याची वेळ आली. उर्फी जावेदने (Urfi Javed )घातलेला हा ड्रेस कितीही स्टायलिश असला तरी देखील तो वल्गर असल्याच्या कमेंट अनेकांनी तिला दिल्या आहेत. इतकेच नाही तर हे पोस्ट करणाऱ्यांनाही पोस्ट करु नका असे सांगितले आहे. जाणून घेऊया उर्फीच्या या नव्या स्टाईलबद्दल

उर्फी आणि तिचा नवा अवतार

उर्फीचा हा नवा अवतार तिने तयार केलेला नसून तो लुक एका डिझायनरने तिच्यासाठी केलेला आहे. यात उर्फीने रिंग हाताता पकडलेले हात स्तनांच्या ठिकाणी परिधान केले आहेत. त्याखाली त्याला जोडणारा काळ्या रंगाचा बॉडी हगिंग ड्रेस आहे. ज्यात ती कदाचित खूपच कम्फर्टेबल असेल पण तिच्या आजुबाजूची लोक काही दिसत नाही. उर्फीने तिचा हा लुक तिच्या इन्स्टाग्रामवरही शेअर केला आहे. त्यात तिला जितक्या वाईट कमेंट नाहीत तितक्या वाईट कमेंट तिला एका कार्यक्रमादरम्यान गेले आहेत तिकडे करण्यात आल्या आहेत. पण उर्फीला कधीच त्या कमेंट्सचा फरक पडत नाही हे तिच्या बिनधास्त वागण्यावरुन दिसून येते. 

उंदराला घाबरली उर्फी

आणखी एका खासगी पेजने तिचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात तिला अचानक उंदीर दिसतो आणि त्या उंदराला पाहून पॅप्ससोबत मस्ती करताना दिसत आहे. मला उंदराची भीती वाटते. माझ्या अंगावर तुम्ही टाकलात तर याद राखा असे म्हणत ती तिथे मस्ती करताना दिसत आहे. ही केलेली मस्तीही अनेकांना रुचली नसावी. कारण यावरुनही तिला अनेकांनी वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत.

उर्फी आणि एअरपोर्ट

मध्यंतरीच्या काळात उर्फी एअरपोर्ट जाण्यावरुन बरीच ट्रोल झाली होती. ती केवळ एअरपोर्टवर फोटो काढायला जाते असा दावा अनेकांनी केला होता. त्यामध्ये कॅश्मिरा शहा देखील होती. तिने तू एअरपोर्टवर फक्त रिकाम्या बॅगा घेऊन फिरतेस असं दिसते असे म्हटले होते. त्यावर उर्फीने तिला असे काही उत्तर दिले की,त्या दोघांची कॅटफाईट सुरु झाली होती. पण नेहमीच एअरपोर्टवर फिरकणारी उर्फी तिथे खरंच करते काय? असा प्रश्न उपस्थित झाला होता.

कार्यक्रमातून दिले हाकलून

काही दिवसांपूर्वी उर्फी एका कार्यक्रमासाठी गेली होती. तिथे तिला बोलावण्यात आले होते. पण तिच्या मागे फोटोग्राफर्सचा गराडा पाहून तेथील सिक्युरीटी गार्डने तिला बाजूला जाण्यास सांगितले. त्यावर रागावलेली उर्फी पापाराझींना घेऊन त्या कार्यक्रमाच्या गेटबाहेर गेली. तिने पापाराझींची माफी मागितली. त्यानंतर बरेच काही घडले. पण तेही प्रकरण नंतर तसे थंडच झाले. 

आता उर्फीच्या या नव्या लुकबद्दल तुम्हाला काय वाटते आम्हाला नक्की कळवा.

Read More From मनोरंजन