मनोरंजन

‘उरी’ने टाकले या सिनेमाला मागे, चार दिवसात केली दमदार कमाई

Leenal Gawade  |  Jan 15, 2019
‘उरी’ने टाकले या सिनेमाला मागे, चार दिवसात केली दमदार कमाई

नव्या वर्षाची सुरुवात दमदार अशा सिनेमांनी झाली आहे असे म्हणायला हवे. कारण दोन मोठे सिनेमे  नुकतेच रिलीज झाले आहेत. खरंतरं २०१९ हे वर्ष लोकसभा निवडणुकीमुळे राजकारण्यांसाठी खास असणार आहे. तर दुसरे सिनेमांसाठी कारण या वर्षात अनेक सत्य घटनांवर आधारीत अनेक  सिनेमे येणार आहेत. जे २०१९ हे वर्ष खास करणार आहेत. सध्या जानेवारीचा तिसरा आठवडा सुरु आहे. ‘उरी: द सर्जिकल स्ट्राईक’ आणि ‘द अॅक्सिडेंटल प्रायमिनिस्टर’ हे दोन सिनेमे नव्या वर्षाच्या मुहूर्तावर रिलीज झाले आहे. दोन वेगवेगळ्या विषयांवर आधारित असलेल्या या सिनेमांमध्ये चुरस रंगणार हे माहीत होतेच. पण  विकी कौशलच्या उरी या सिनेमाने यात बाजी मारली आहे. कारण अवघ्या चार दिवसात उरीने घसघशीत अशी कमाई केली आहे. त्यामुळे हा सिनेमा लवकरच १०० कोटींचा गल्ला पार करेल, अशी अपेक्षा आहेच. पण त्याने सध्या अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर या सिनेमाला मात्र मागे टाकले आहे.

पहिल्याच दिवशी घसघशीत कमाई

उरी आणि अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर या दोन्ही सिनेमांचे ट्रेलर आल्यानंतर या दोन सिनेमांमध्ये टफफाईट पाहायला मिळणार असे वाटत होते. कारण दोन्ही सिनेमे सत्य घटनांवर आधारीत होते. पण प्रेक्षकांनी उरी या सिनेमाला अधिक पसंती दिलेली पाहायला मिळाली कारण पहिल्या दिवशी या  सिनेमाने ८ कोटी २० लाखांची कमाई केली. दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी १२ कोटी ४३ लाख आणि रविवारी १५ कोटी १० लाख आणि सोमवारी १० कोटी ५१ लाखाची कमाई केली. अनेक ठिकाणी हा सिनेमा हाऊसफुल्ल होता. साधारण ५० कोटींची केली आहे. शिवाय हा आकडा वाढत जाईल,असा अंदाज देखील वर्तवला जात आहे. तर अॅक्सिडेंल प्राईम मिनिस्टर ३५ कोटी ७३ लाखाची कमाई केली आहे. जी उरीच्या तुलनेत कमी आहे.

वाचा-

विकी कौशलने मारली बाजी

विकी कौशलच्या अभिनयाची स्तुती या आधीदेखील झाली आहे. ‘राजी’ या चित्रपटात साकारलेली पाकिस्तानी पोलिसदलातील अधिकाऱ्याची भूमिका त्याच्या अभिनयामुळे साऱ्यांच्याच लक्षात राहिली. त्याच्या अभिनयामुळे आज त्याने बॉलीवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केले आहे. उरी या सिनेमात  विकीने सैन्यदलातील जवान साकारला आहे. सर्जिकल स्ट्राईक संदर्भात अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर या सिनेमातून प्रकाश टाकण्यात आला आहे.त्यामुळेच की काय विकीच्या अभिनयाची जादू बॉक्स ऑफिसवर देखील दिसत आहे. 

अनुपम खेर पडले मागे

अॅक्सिडेटंल प्राईम मिनिस्टरच्या निमित्ताने खूप दिवसांनी अनुपम खेर हिंदी सिनेमात दिसले. त्यांनी या सिनेमात माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची भूमिका साकारली आहे. हा सिनेमा अनुपम खेर यांनी नाकारला होता. पण मनमोहन सिंह पडद्यावर साकारणे हे कठीण होते. हा रोल त्यांना चॅलेंजिक वाटल्याने त्यांनी मनमोहन सिंह यांच्यासारखे चालण्याचा सराव केला. तो बऱ्यापैकी जमल्यानंतरच मग त्यांनी हा सिनेमा स्विकारला. मनमोहन सिंह पडद्यावर साकारण्यापूर्वी त्यांनी ६ महिने त्यांचा अभ्यास केला. ट्रेलरमध्ये ती मेहनत दिसून आली आहे आणि संपूर्ण सिनेमात देखील त्यांनी केलेली मेहनत फळाला आलेली आहे.  

Read More From मनोरंजन