‘फर्ज और फर्जी में सिर्फ एक मात्रा का फर्क होता है..अगर में अपने देश और भाईयों के लिए अब नहीं लड़ा तो में अपनी ही नजरों में फर्जी बनकर रह जाऊंगा.’ या आणि अशा अनेक दमदार संवादांनी ‘ऊरी’ चित्रपटाचा नुकताच प्रदर्शित झालेला ट्रेलर आपल्या मनाचा ठाव घेतो. या ट्रेलरमधील कंटेट आणि दिलेली ट्रीटमेंट तुम्हाला भारून टाकते.
काय आहे ‘ऊरी’ ची कथा?
सप्टेंबर 2016 मध्ये जम्मू-काश्मीरमधील ऊरीमध्ये दहशतवाद्यांनी भारतीय सेनेवर हल्ला केला होता. या हल्ल्यांमध्ये तब्बल 19 भारतीय जवान शहीद झाले होते. त्यानंतर बरोबर 11 दिवसाने भारतीय सैन्याच्या स्पेशल फोर्सने पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या पीओकेमध्ये सर्जिकल स्ट्राईक केली होती. या हल्ल्यात दहशतवाद्यांचे अनेक बंकर उद्ध्वस्त करण्यात आले होते.’ऊरी’ हा चित्रपट पूर्णपणे या सत्य घटनेवर आधारित आहे.
जबरदस्त संवाद
‘हिंदुस्तान, अब चुप नहीं बैठेगा, ये नया हिंदुस्तान है, ये घर में घुसेगा भी और मारेगा भी’ या ट्रेलरमध्ये पाकिस्तानला आव्हान देणारे अनेक संवाद आहेत. शांतताप्रिय देश म्हणून नेहमीच भारताची जगभरात ओळख आहे. पण या सर्जिकल स्ट्राईकने भारताने शत्रू देशाला तोडीस तोड उत्तर दिलं.
पुन्हा एकदा मन जिंकणार विकी कौशल
मेघना गुलजारच्या ‘राजी’ चित्रपटानंतर अनेकींचा हार्टथ्रोब झालेला विकी कौशल या चित्रपटात देशभक्त सैनिकाच्या भूमिकेत शत्रूंचा खात्मा करताना दिसणार आहे. विकीच्या ऊरी चित्रपटाकडून चाहत्यांना फारच अपेक्षा आहेत आणि अपेक्षांची पूर्ती नक्की होईल, याचीच झलक ट्रेलरमध्ये दिसते.
भारदस्त व्यक्तिमत्व, आपल्या सैनिकांना स्फूर्ती देणारा अधिकारी आणि शत्रूला नामोहरम करण्यासाठी आतुर असलेला भारतीय कमांडो विकीने कौशल्याने साकारलाय. या चित्रपटाचं ट्रेलर प्रदर्शित होताच त्याने आपल्या ट्वीटर आणि इन्स्टा अकाउंटवर अपडेट केलं.
फोटो सौजन्य : Instagram
आदित्य धार लिखित आणि दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेते परेश रावल हे महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. तसंच यामी गौतमसुद्धा शिस्तप्रिय ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 11 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.
Read More From बॉलीवूड
फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावरील बायोपिक ‘सॅम बहादूर’च्या चित्रीकरणास सुरुवात
Vaidehi Raje