मनोरंजन

‘हिरोची झाली एन्ट्री’ म्हणत उर्मिला निंबाळकरने शेअर केली खुशखबर

Trupti ParadkarTrupti Paradkar  |  Aug 5, 2021
‘हिरोची झाली एन्ट्री’ म्हणत उर्मिला निंबाळकरने शेअर केली खुशखबर

अभिनेत्री उर्मिला निंबाळकरने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. गेले नऊ महिने उर्मिला तिच्या युट्यूब चॅनेलवरून आणि सोशल मीडियावरून तिच्या गरोदरपणाचा संपूर्ण प्रवास चाहत्यांसोबत शेअर करत होती. काही दिवसांपूर्वीच तिने तिच्या डोहाळ जेवणाचा खास व्लॉग शेअर केला होता. उर्मिलाचे डोहाळजेवण अगदी थाटामाटात आणि राजेशाही पद्धतीने पार पडले. त्यानंतर तीन ऑगस्टला तिने डोहाळ जेवणातील एक फोटो शेअर करत कोणत्याही क्षणी … आनंद, परमानंद, गोविंद अशी कंमेट करत तिच्या बाळाच्या आगमनाची जणू वर्दीच दिली होती. आताही तिने एका हटके पद्धतीने तिला मुलगा झाला हे चाहत्यांसोबत शेअर केलं आहे.

हृता दुर्गुळे परत येतेय, नवी मालिका नवा लुक

उर्मिलाने अशी शेअर केली खुशखबर

उर्मिला निंबाळकर आणि सुकिर्त गुमास्ते यांना तीन ऑगस्टला पूत्ररत्नाचा लाभ झाला. त्यानंतर गुरूवारी म्हणजे पाच ऑगस्टला उर्मिलाने सोशल मीडियावर ही पोस्ट सोशल मीडियावर अपलोड केली. ज्यामध्ये तिने शेअर केलं आहे की, “वडिलांवर, भावावर Vaibhav Nimbalkar, दिरावर, सासऱ्यावर आणि सर्वात जास्त चुकलं म्हणजे, नवऱ्यावर sukirt gumaste अति प्रेम असलं की, रंगभुमीपेक्षा जास्त नाट्य निर्मिती खऱ्या आयुष्यात होऊन हिरो ची एन्ट्री होते. माझ्या आयुष्यात 3 ऑगस्टला सकाळीच हिरोची एन्ट्री झालीय” अशा हटके आणि भावूक शब्दात उर्मिलाने तिला मुलगा झाल्याचं चाहत्यांना सांगितलं आहे. या पोस्टमध्ये  तिने #blessedwithbabyboy #BabyBoy #newmomlife असे हॅशटॅग वापरले आहेत. या पोस्ट आधीच्या दोन पोस्टमधून ती बाळाच्या आगमनासाठी सज्ज झाल्याचा अंदाज येत होता. मात्र आता तिच्या घरी खऱ्या खु्ऱ्या आनंदरूपी गोविंदाचं आगमन झाल्याने उर्मिलाचे चाहते आनंदी झाले आहे. बाळाच्या आगमनाने उर्मिलाच्या माहेरी आणि सासरीही उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. लवकरच उर्मिलाच्या या नव्या रिअल लाईफ हिरोचं दर्शनही सोशल मीडियाच्या माध्यमातून होण्याची शक्यता आहे.

सिटी ऑफ ड्रिम्स’मध्ये या अभिनेत्याची होणार सरप्राईज एन्ट्री

बाळंतपणाच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत उर्मिलाने केलं काम 

उर्मिला निंबाळकरने दिया और बाती हम, दुहेरी, बनमस्का, एक तारा, कांदे पोहे, मी सिंधूताई सपकाळ अशा हिंदी आणि मराठी मालिका आणि चित्रपटांमधून अभिनय केलेला आहे. गेले काही वर्ष उर्मिला अभिनयापासून दूर असली तरी  ती तिच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून दर शुक्रवारी चाहत्यांच्या संपर्कात असते. शिवाय तिचे सोशल मीडियावर खूप फॉलोव्हर्स आहेत. ज्यामुळे तिच्या आयुष्यातील खाजगी आणि प्रोफेशनल गोष्टी ती नेहमीच चाहत्यांसोबत शेअर करत असते. उर्मिलाच्या गरोदरपणातील नऊ महिन्यांचा सुंदर प्रवास अनेकांना थक्क करणारा होता. शिवाय ती या नऊ महिन्यामध्ये तिच्या युट्यूब  चॅनेलसाठी सतत कार्यरत होती. बऱ्याचदा तिला यासाठी ट्रोल करण्यात आलं मात्र अशा लोकांकडे  दुर्लक्ष करत ती तिचे काम करत राहिली. आता उर्मिलाचे चाहते तिच्या बाळाची पहिली झलक पाहण्यासाठी नक्कीच आतूर झाले आहेत. सध्या बाळ आणि बाळाची आई आराम करत असती तरी काही दिवसांमध्ये लगेच पुन्हा उर्मिला खऱ्या आयुष्यातील एका वेगळ्या नव्या भूमिकेत दिसणार आहे. 

‘अधांतरी’ लवकरच भेटीला, सिद्धार्थ चांदेकर, पर्ण पेठे, विराजस कुलकर्णी, आरोह वेलणकर करणार ‘हंगामा’

Read More From मनोरंजन