बॉलीवूड

उर्वशी रौतेला आगामी चित्रपटासाठी शिकत आहे मार्शल आर्ट

Trupti Paradkar  |  Sep 20, 2021
उर्वशी रौतेला आगामी चित्रपटासाठी शिकत आहे मार्शल आर्ट

उर्वशी रौतेला आणि तिचे बोल्ड लुक नेहमीच चर्चेत असतात. निरनिराळे लुक्स आणि फॅशन सेंससाठी ती चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. उर्वशी सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहे. तिचे सौंदर्य आणि फिटनेस चाहत्यांना नेहमीच घायाळ करतात. ज्यामुळे तिचे ग्लॅमरस, हॉट लुक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. सध्या ती एका बिग बजेट चित्रपटाच्या तयारीमध्ये व्यस्त आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उर्वशी सध्या या चित्रपटातील भूमिकेसाठी मार्शल आर्टचं रितसर ट्रेनिंग घेत आहे. 

लवकरच आई होणार आहे काजल अग्रवाल, चित्रपटाचे शूटिंग केले बंद

उर्वशीने घेतले मार्शल आर्टचे धडे

अभिनेत्री उर्वशी रौतेलाने एका मुलाखतीत शेअर केलं आहे की, तिचा आगामी चित्रपट हा एक अॅक्शनपट असणार आहे. या बिगबजेट चित्रपटासाठी तिला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. भूमिकेत समरस होण्यासाठी तिला अॅक्शनच्या काही स्पेशल मूव्ह्ज आणि कौशल्य शिकावे लागणार आहेत. तिच्या मते ती यासाठी मार्शल आर्टचे विविध प्रकार सध्या शिकत आहे. तिच्यासाठी हा अनुभव नव्याने शाळेत जाण्याप्रमाणे आहे. कारण मार्शल आर्ट शिकणं ही एक खूपच रोमांचक गोष्ट आहे. तुम्ही जेव्हा नव्याने एखादा डान्सचा प्रकार शिकता तेव्हा तुम्हाला जशी मौज येते तशीच यातही आहे. मार्शल आर्ट शिकल्यावर खूप कुल वाटतं. फ्लिप्स करणे, किक्स मारणे आणि यासोबतच मार्शल आर्टच्या छोटी छोटी कौशल आत्मसात करणं हा एक अद्भूत अनुभव आहे असं उर्वशीला वाटतंय. उर्वशीने या चित्रपटाबद्दल अधिक खुलासा न केल्यामुळे  या चित्रपटाचे नाव आणि इतर माहिती अजुनही गुलदस्त्यातच आहे. 

विशाल भारद्वाजच्या ‘खुफिया’मध्ये तब्बू आणि अली फजलची जोडी

आता बॉलीवूड अभिनेत्रींमध्येही वाढतेय अॅक्शनची क्रेझ

एक काळ असा होता जेव्हा फक्त हॉलीवूड चित्रपटांमध्येच अभिनेत्री अॅक्शन मूव्हज करताना दिसत असत. मात्र आता काळ बदलला आहे. आता बॉलीवूडमध्येही एखाद्या हिरोप्रमाणे हिरोईनही अॅक्शन नक्कीच करू शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अभिनेत्री दीपिका पादुकोणही तिच्या आगामी पठाण चित्रपटात अॅक्शन सीन्स देणार आहे. सलमानच्या अनेक चित्रपटात कतरिना कैफने यापूर्वी अॅक्शन सीन्स दिले आहेत. आगामी  टायगर 3 मध्ये ती याच अवतारात दिसणार आहे. ज्यामुळे सध्या या सर्व अभिनेत्री स्वतःचा फिटनेस वाढवण्यासाठी जीममध्ये मेहनत घेताना दिसत आहेत. थोडक्यात पुढील वर्षी चित्रपटगृहात हिरोपेक्षा हिरॉईन्सचे अॅक्शन सीन्स पाहण्यासाठी प्रेक्षकांची जास्त गर्दी होण्याची शक्यता आहे. 

मराठी बिग बॉस 3 ची दिमाखदार सुरुवात, हे कलाकार आहेत स्पर्धक

Read More From बॉलीवूड