बाल्कनीतील रोपे केवळ तुमचे घर स्वच्छ करत नाहीत तर संपूर्ण घराला सुंदर बनवतात. म्हणूनच बरेच लोक अंगणात तर रोपे लावतातच शिवाय घरात देखील इनडोअर प्लांट्स लावतात. ज्यांच्या घरी अंगण नसते ते बाल्कनीत किंवा टेरेसवर कुंड्यांमध्ये रोपे लावून सुंदर गार्डन तयार करतात. लोक चमेली, गुलाबाची रोपे इत्यादी फुलांची रोपे लावण्यास अधिक प्राधान्य देतात. पण ही झाडे लावल्यानंतर त्यांची नित्यनेमाने काळजी घेणे खूप गरजेचे आहे. झाडांची काळजी न घेतल्यास झाडे सुकतात किंवा त्यांना फुले येत नाहीत, विशेषत: गुलाबाच्या झाडासंदर्भात या समस्या अधिक येतात. गुलाबाला फुले येत नसतील तर लोक त्यासाठी खत, द्रव खत आणि सर्व पोषक तत्वांचा वापर करतात.
गुलाबाला फुले न येण्याची कारणे
गुलाब फुलत नसेल तर त्यामागे जास्त प्रमाणात घातलेले नायट्रोजन खत हे एक कारण असू शकते. जास्त प्रमाणात नायट्रोजन हे झाडाला पर्णसंभार वाढीस प्रोत्साहन देते. त्यामुळे झाडाला फुले येण्याऐवजी जास्त पाने येतात. तसेच कीटक, प्रकाशाचा अभाव आणि चुकीच्या वेळी रोपांची छाटणी या सर्व गोष्टींमुळे गुलाबाची झुडुपे फुलू शकत नाहीत. जास्त प्रमाणात खत वापरणे किंवा वारंवार वापरणे, पोषणमूल्ये नसलेली माती, कीटक जसे की ऍफिड्स जे विकसनशील फुलांच्या कळ्यांमधून रस काढतात ही गुलाब न फुलण्याची सर्वात सामान्य कारणे आहेत.
तसेच तुम्ही झाड अशा ठिकाणी लावले असेल जिथे खूप सावली असते तरीही गुलाब चांगला फुलणार नाही कारण गुलाबाला किमान 6 तासांच्या पूर्ण सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. सर्व झाडांना चांगली वाढ होण्यासाठी नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम (NPK) ची आवश्यकता असते. पण जर जमिनीत नायट्रोजनचे जास्त प्रमाण असेल तर त्यामुळे झाडाचा केवळ पर्णसंभार वाढतो. नायट्रोजनच्या वाढीव प्रमाणामुळे तुमच्या गुलाबाची देठ, फांद्या आणि पाने रसदार बनतात आणि तणावाचे लक्षण म्हणून गळतात. पिवळी पडलेली पाने देखील अतिरिक्त नायट्रोजनचे लक्षण आहे. म्हणूनच गुलाबाच्या झुडुपांसाठी योग्य प्रमाणात खत वापरणे खूप महत्वाचे आहे.पोषक नसलेल्या, वालुकामय जमिनीत लागवड केलेले गुलाब देखील पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे फुलू शकत नाहीत. त्यामुळे मातीत पोषक तत्वांचा समतोल योग्य राखणे महत्त्वाचे आहे. कंपोस्ट, सुकलेली पाने आणि चांगले खत हे सर्व ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आणि जमिनीत पोषक तत्वांचे योगदान देण्यासाठी उत्कृष्ट आहेत.
घरात लावलेली झाडे लवकर वाढावी यासाठी सोप्या टिप्स
गुलाबासाठी फायदेशीर खत
बाजारात अनेक प्रकारची खते उपलब्ध आहेत. पण तुम्ही कांद्याच्या सालीच्या मदतीने नैसर्गिक खत घरीच बनवू शकता. घरच्या घरी कांद्याच्या मदतीने खत बनवण्यासाठी तुम्हाला फक्त कांद्याची साल किंवा कांद्याचा रस लागेल. याशिवाय तुम्ही धान्याचे पाणीही वापरू शकता.
साहित्य- 2 वाट्या कांद्याची साले , 1 वाटी धान्याचे पाणी, 1 जार , 2 वाट्या साधे पाणी
कृती – कांद्याचे खत बनवण्यासाठी सर्वप्रथम कांद्याची साल एका बरणीत गोळा करा. नंतर एका भांड्यात कांद्याची साल आणि पाणी घालून दोन दिवस ठेवा. नंतर कांद्याची साले बारीक करून घ्या. एका भांड्यात तांदूळ, मसूर, गहू यांसारख्या धान्याचे पाणी घ्या व त्यात कांद्याच्या सालींची पेस्ट टाका. हे खत तुम्ही गुलाबाला नियमितपणे सकाळी आणि संध्याकाळी घालू शकता. खत घालण्याआधी माती थोडी खणून घ्यावी, नंतर त्यात हे खत टाकावे.
हे खत घातल्याने तुमच्या गुलाबाच्या झाडाला फुले येण्यास नक्कीच मदत होईल.
Photo Credit – istockphoto
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक