DIY लाईफ हॅक्स

मोसंबीच्या सालांचा अफलातून उपयोग, माहीत आहे का तुम्हाला

Dipali Naphade  |  Sep 5, 2021
use of citrus peel

बरेच जण लिंबाच्या अथवा मोसंबीच्या सालांचा (Mosambi Peel) काहीच उपयोग करत नाहीत आणि फेकून देतात. पण तुम्हाला माहीत आहे का? मोसंबीच्या सालांचाही खूपच चांगला उपयोग करून घेता येतो. जनावरांचे खाद्य तर हे आहेच. पण सौंदर्यासाठीही याचा उपयोग करता येतो. मोसंबीच्या सालामध्येही विटामिन सी चे अधिक प्रमाण असते. त्यामुळे तुम्ही तुमच्या सौंदर्यात भर टाकण्यासाठी याचा उपयोग करून घेऊ शकता. याशिवाय मोसंबीच्या सालांचा उपयोग तुम्ही भांड्यांच्या स्वच्छतेसाठीही करू शकता. याचा सोप्या पद्धतीने कसा वापर करून घ्यायचा ते आपण पाहूया.  

अधिक वाचा – दिवाळीमध्ये मिनिट्समध्ये भांडी स्वच्छ करायची असतील तर सोपे हॅक्स

मोसंबीच्या सालांपासून कसा तयार कराल क्लिनर?

तुम्ही लिंबाच्या सालीपासून ज्याप्रमाणे घरातील क्लिनर तयार करता तसंच तुम्हाला मोसंबीच्या सालांचाही उपयोग (Use of Mosambi Peel) करायचा आहे. तुम्हाला मोसंबीच्या सालांपासून कसे क्लिनर बनवायचे माहीत असेल तर तुम्ही आम्ही सांगतो ती पद्धत पाहून घ्या. हा क्लिअर अत्यंत नैसर्गिक असून यामध्ये कोणतेही केमिकल नसल्यामुळे तुमच्या हातालाही कोणताही त्रास अथवा समस्या होत नाही. तसंच भांड्यांनाही कोणतेही नुकसान पोहचत नाही. 

साहित्य 

बनविण्याची पद्धत 

या मिश्रणाचा उपयोग तुम्ही बाथरूमची अथवा बेडरूमच्या आरशांची स्वच्छता करण्याासाठी वापरू शकता. तसंच तुमच्या घरातील भांड्यांना जर दुर्गंध येत असेल तर तुम्ही हे क्लिनर नक्की वापरा. यामुळे भांड्यांना सुगंध राहतो. तसंच हा क्लिनरचा वापर तुम्ही झाडांवर लागलेली कीड दूर करण्यासाठीही वापरू शकता. 

अधिक वाचा – किचनमधली लाकडी भांडी अशी करा स्वच्छ, वापरा या सोप्या टिप्स

सौंदर्यासाठी करा असा वापर 

सौंदर्यासाठीही तुम्ही मोसंबीच्या सालांचा वापर अगदी सहजपणाने करू शकता. त्यासाठी तुम्ही एका भांड्यात पाणी घेऊन मोसंबीचे साल उकळून घ्या. त्यानंतर पाणी थंड झाल्यावर सालातील पाणी पिळून गाळून घ्या. हे पाणी रोज आंघोळीच्या पाण्यात थोडे थोडे मिक्स करून घ्या. या पाण्यामुळे अंगावर खाज येत असेल अथवा काळे डाग असतील तर अशा समस्या दूर होण्यास मदत मिळते. याशिवाय त्वचेवरील पुरळ येणेदेखील कमी होईल. तसंच त्वचा अधिक चमकदार दिसण्यास मदत होईल. मोसंबातील विटामिन ई मुळे त्वचेला अधिक चांगला तजेलदारपणा मिळतो आणि त्वचा अधिक सुंदर दिसण्यास फायदा मिळतो. त्यामुळे तुम्ही मोसंबीची साले फेकून देण्याची चूक करू नका. तर घरगुती गोष्टींसाठी त्याचा अशाप्रकारे वापर नक्की करून पाहा आणि आम्हाला कळवा. 

हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर शेअर आणि लाईक करायला विसरू नका. तसंच तुम्हाला कसा अनुभव आला हे आम्हाला नक्की कळवा. 

अधिक वाचा – आयुष्य अधिक सुखकर करणाऱ्या क्लिनिंग हॅक्स (Best Cleaning Hacks In Marathi)

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From DIY लाईफ हॅक्स