देव दिखाव्याला नाही श्रद्धेला पावतो, असं सांगणाऱ्या आणि असा साचा घेऊन लवकरच मालिका येत आहे. ‘वैदेही’ – शतजन्माचे आपुले नाते असं या मालिकेचे नाव असून याचे प्रोमो सध्या दिसून येत आहेत. या मालिकेत वैदेही ही रामाची निस्सीम भक्त आहे. तिच्या चांगल्या स्वभावामुळे ती दुसऱ्यांना नेहमी मदत करत असते. सालस आणि समंजस स्वभावाची वैदेही आपल्या कुटुंबासाठी, आपल्या बहिणींसाठी नेहमी खंबीर उभी राहते आणि आपल्या कुटुंबाची जबाबदारी संभाळतेय असे या मालिकेत दाखवण्यात आले आहे. वैदेहीची व्यक्तिरेखा सायली देवधर साकारते आहे. पण यामध्ये एक वेगळे वळणही आहे. वैदही आणि अंध साहील यांची प्रेमकहाणीदेखील यामध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
अधिक वाचा – ‘इंडियन आयडल’फेम सायली कांबळेचे ‘कोल्हापूर डायरीज’ द्वारे सिनेसृष्टीत पदार्पण
अंध असूनही स्वाभिमानी साहील
या मालिकेतील महत्त्वाचे पात्र म्हणजे साहील आणि तो अंध आहे, पण त्याला कोणाकडून मदत घ्यायला आवडत नाही. वैदेहीचं फुलांचं दुकान जिथे आहे त्याच देवळात साहील येत असतो. वैदेही आणि साहिल यांची आधीची ओळख आहे, असं प्रेक्षकांना पहिल्या भागात पाहायला मिळालं. आता या दोघांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात होईल का, हे पाहणं प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचं असणार आहे. साहील ही व्यक्तिरेखा अभिनेता अभिषेक रहाळकर साकारतोय. ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी त्यांनी नाशिकच्या नॅब संस्थेला भेट दिली आणि त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी जाणून घेतल्या आणि आपल्या व्यक्तिरेखेचा अभ्यास केला आहे. त्याचा अभ्यास त्याच्या भूमिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळेल. अंध व्यक्तिरेखा साकारण्यासाठी अभिषेकने घेतलेली मेहनत आणि अभ्यास या मालिकेत पाहायला मिळणार आहे. मराठी मालिका विश्वात अशी आगळीवेगळी प्रेमकहाणी प्रेक्षकांना पहिल्यांदाच बघायला मिळणार आहे. त्यामुळे ही वेगळी मालिका प्रेक्षकांच्या पसंतीला उतरणार की नाही हेदेखील आता पाहायला लागेल.
अधिक वाचा – शिल्पा शेट्टीने केली चित्रीकरणाला सुरूवात, धैर्याने आली समोर
सायली देवधर आणि अभिषेक रहाळकरची केमिस्ट्री
या मालिकेतून पहिल्यांदाच सायली देवधर (Sayali Deodhar) आणि अभिषेक रहाळकर (Abhishek Rahalkar) या जोडीची केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. नुकतीच ही मालिका सुरू झाली असून वेगळ्या विषयामुळे प्रेक्षकांना आवडू लागली आहे. सध्या मराठी मालिकांमध्ये वेगवेगळे विषय हाताळले जात असल्याचे दिसून येत आहे. विशेषतः सोनी मराठीवर वेगवेगळ्या विषयाच्या आणि धाटणीच्या मालिका पहायला मिळत असून आता वैदेही आणि अंध साहील यांची प्रेमकहाणी कशी असेल याचीही प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. नेहमीच्या प्रेमकहाणी आणि परीकथेतील कहाणीपेक्षा ही नक्कीच वेगळी प्रेमकहाणी असल्याचे प्रेक्षकांनाही जाणवत आहे. फक्त या कथेचा बाज असाच राहवा असंही नक्कीच प्रेक्षकांना वाटत असेल. आता कथा जसजशी पुढे सरकेल त्यानंतरच या कथेच आणि मालिकेत काय वेगवेगळी वळणं येतील आणि वैदेही आणि साहीलचं प्रेम कसं फुलणार आणि नक्की वैदेहीचा काय निर्णय असणार या सगळ्याबाबत प्रेक्षकांनी अंदाज बांधायलाही सुरूवात केली आहे. आता आपला अंदाज खरा ठरणार की, कथा वेगळ्या अंगाने जाणार याची नक्कीच प्रेक्षक तुलना करतील आणि तितक्याच उत्सुकतेने पाहतील असा विश्वासही कलाकारांना आहे. ही दैनंदिन मालिका असून लवकरच प्रेक्षकांच्या मनाचीही पकड घेईल अशा विश्वास दर्शविण्यात येत आहे.
अधिक वाचा – आता राखीचा नवा ड्रामा, बनली स्पायडर वुमन
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade