नातीगोती

Valentines Day: व्हॅलेंटाईन डेला तुमच्या प्रियकराला द्या ‘हे’ स्पेशल गिफ्ट (Valentines Gift For Boyfriend In Marathi)

Trupti Paradkar  |  Feb 6, 2019
Valentines Day: व्हॅलेंटाईन डेला तुमच्या प्रियकराला द्या ‘हे’ स्पेशल गिफ्ट (Valentines Gift For Boyfriend In Marathi)

व्हॅलेंटाईन डे जवळ आलाय त्यामुळे प्रेमात पडलेल्या सर्वांचीच आपापल्या प्रिय व्यक्तीला स्पेशल गिफ्ट देण्याची तयारी सुरू आहे. प्रेयसीला देण्यासाठी अनेक गिफ्ट आयडीयाज मुलांना मिळू शकतात. मात्र प्रियकराला काय गिफ्ट द्यावं असा प्रश्न मुलींना नेहमीच पडत असतो. आम्ही तुम्हाला अशा काही भेटवस्तू सूचवत आहोत ज्या दिल्याने तुम्हाला आनंद होईलच शिवाय त्याला या भेटवस्तू नक्कीच आवडतील. पूर्वी प्रिय व्यक्तीला फक्त हार्ट शेपमधील ग्रिटींग कार्ड्स, लाल रंगाची फुलं अथवा बुके दिले जायचे. पण आजच्या आधूनिक जगात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्ही तुमच्या प्रियकराला नक्कीच देऊ शकता. त्यामुळे या व्हॅलेंटाईन डेला अशी भेटवस्तू प्रियकराला द्या जी त्याच्या उपयोगीही पडेल. आम्ही तुम्हाला गिफ्ट देण्यासाठी काही आयडीयाज देत आहोत ज्या तुम्हाला नक्कीच आवडतील. त्यामुळे या गिफ्ट्सपैकी त्याच्या आवडीनुसार आणि तुमच्या बजेटनुसार एखादं गिफ्ट विकत घ्या आणि त्याला द्या आणि तुमचा व्हॅलेंटाईन डे स्पेशल करा.

लव्ह स्टोरी मेमरीज

रेकॉर्डेड लव्हमेसेज

बिअर्ड ऑईल अथवा ग्रुमिंग सेट

सेक्स फॅंटसी गिफ्ट

बॉयफ्रेन्डला द्या हे युनिक आणि क्रिएटिव्ह गिफ्ट्स (Valentine’s Day Gift Ideas For Boyfriend) 

या व्हॅलेटाईन्स डेला तुम्ही विचारपूर्वक तुमच्या प्रिय व्यक्तीसाठी काही क्रिएटिव्ह गिफ्ट्स घेऊ शकता.

1. लव्ह स्टोरी मेमरीज (Love Story Memories)

तुम्ही काय गिफ्ट देता यापेक्षा गिफ्ट देण्यामागे तुमच्या काय भावना आहेत हे खूप महत्त्वाचं असतं. या व्हॅलेंटाईन डेला त्याला काहीतरी हटके गिफ्ट देण्याची तुमची ईच्छा असेल तर या गिफ्टचा अवश्य विचार करा. तुमच्या पहिल्या भेटीपासूनपासून आत्तापर्यंतच्या सर्व क्षणांची एक लव्हस्टोरी तयार करा. ही लव्हस्टोरी तुम्ही एका रोमॅंटिक कव्हर असलेल्या डायरीमध्ये स्व-अक्षराने लिहा आणि सोबत त्या क्षणांचे फोटो जोडून त्याला गिफ्ट करा. या लव्ह स्टोरी डायरीमुळे तुमच्या नात्यातील जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळेल. शिवाय तुमची लव्ह स्टोरी त्याच्याजवळ आयुष्यभर राहील. 

2. पुस्तक (Books)

पुस्तकवेड्या प्रियकरासाठी एखादं त्याच्या आवडीचं पुस्तक गिफ्ट देणंच उत्तम ठरेल. अनेकांना पुस्तकांच्या दुकानात गेल्यावर तासनतास पुस्तकांसोबत वेळ घालवायला आवडतं. आजच्या आधूनिक जगात अनेक जण इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सवर पुस्तकं वाचतात. तुमचा प्रियकरही असाच वाचनासाठी वेडा असेल तर त्याला एखादं त्याच्या आवडीचं अथवा बऱ्याच दिवसांपासून तो शोधत असलेलं एखादं पुस्तक गिफ्ट करा. त्याची आवड लक्षात ठेऊन त्याला दिलेलं हे गिफ्ट त्याच्यासाठी नक्कीच अविस्मरणीय ठरेल. जे तो आयुष्यभर त्याच्याजवळ जपून ठेवेल. पुस्तक विकत घेताना त्याच्या आवडीचा विषय आणि आवडीच्या लेखकाचा जरूर विचार करा. ज्यामुळे हे गिफ्ट त्याच्यासाठी खूप भावनिक ठरेल.

3. ग्रिटिंग (Greeting)

तुम्ही हाताने बनवलेले शुभेच्छापत्र देखील त्यांना बनवून देऊ शकता. कारण या गोष्टी सुद्धा अनेकांना आवडतात. त्यामुळे तुम्ही तुम्हाला येते तसे शुभेच्छापत्र बनवा.

4. डायरी (Diary)

काही लोकांना नियमित डायरी लिहण्याची सवय असते. तुम्ही तुमच्या बॉयफ्रेंडला त्यांच्या कामानुसार डायरी गिफ्ट देऊ शकता. हल्ली इतक्या वेगळ्या डिझाईन्सच्या डायरी मिळतात की, तुम्ही एखादी डायरी नक्कीच देऊ शकता.

POPxo Travel on my mind- Notebook Hard Cover खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लीक करा 

किंमत – 249 रू.

5. ब्लुटूथ स्पीकर (Bluetooth Speaker)

ब्लुटूथ स्पीकरही तुम्ही तुमच्या बॉयफ्रेंडला गिफ्ट म्हणून देऊ शकता. ब्लुटुथ स्पीकर त्याला अगदी कधीही वापरता येतील. त्यामुळे तुम्ही लहान आणि वेगवेगळ्या कंपनीचे ब्लुटुथ स्पीकर घेऊ शकता. कारण आजकाल बाजारात विविध प्रकारचे ब्लु टूथ स्पिकर विकत मिळतात. 

Portable Bluetooth Speaker with FM radio खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लीक करा.

किंमत – 3999 रू. 

बॉयफ्रेन्डसाठी स्वतः तयार करा हे गिफ्ट्स (Valentine’s Day Gift Ideas For Him)

बॉयफ्रेन्डला स्वतःच्या हाताने काहीतरी तयार करून देण्याची मौजच वेगळी आहे. म्हणूनच या प्रेमदिनाला त्याला हे गिफ्ट अवश्य द्या.

1. आवडता पदार्थ (Favorite Dish)

तुमचा प्रियकर खवैय्या असेल तर त्याच्यासाठी हे गिफ्ट खूपच स्पेशल असेल. या व्हॅलेंटाईनडेला तुमच्या प्रियकराची एखादी आवडती डीश तयार करा आणि आकर्षक पॅकींग करून त्याला ती गिफ्ट करा. किंवा घरीच स्पेशल डिनर डेट प्लॅन करुन त्याच्या आवडीचा मेन्यू तयार करा आणि रोमॅंटिक पद्धतीने त्याला सर्व्ह करा. हे गिफ्ट त्याच्यासाठी नक्कीच खास ठरेल.

2. रेकॉर्डेड लव्हमेसेज (Recorded Love Message)

जर या व्हॅलेंटाईनडेला तुम्ही त्याच्यापासून दूर असाल तर दूराव्यातून निर्माण झालेल्या प्रेमाच्या अव्यक्त भावना व्यक्त करण्यासाठी हेच गिफ्ट अगदी योग्य ठरेल. कधी कधी दूर असल्यामुळे मेसेज अथवा फोनवरून आपल्याला आपल्या मनातील भावना आहेत तशा व्यक्त करता येत नाहीत. किंवा कधी कधी समोरच्या व्यक्तीपर्यंत त्या आहेत तशा पोहचतही नाहीत. जर या व्हॅलेंटाईनला तुम्हाला त्याच्यापासून दूर राहावं लागणार असेल तर तुमच्या मनातील भावना रेकॉर्ड करा आणि व्हॅलेंटाईन डे एसएमएस लव्ह मेसेज त्याच्यापर्यंत कुरिअर करा. या गिफ्टमुळे तो नक्कीच भावनिक होईल आणि तुमच्यामधील प्रेमबंध आणखीनच दृढ होतील.

3. प्रेम पत्र (Love Letter)

प्रेम पत्र पाठवण्याचा काळ आता नसला तरी प्रेम पत्र पाठवण्याची कल्पना नक्कीच भन्नाट आहे. तुमच्या मनातील भावना या ओठांवरही यायला हव्यात. जर तुम्हाला बोलणे शक्य नसेल तर मग तुम्ही प्रेमपत्र देखील लिहू शकता. प्रेमपत्र लिहिणे सगळ्यात बेस्ट आहे. कारण काही जणांना बोलता येत नाही. अशावेळी प्रेम पत्र हा एक चांगला पर्याय आहे.

4. व्हिडिओमधून शेअर करा आठवणी (Video Memories)

आजकालचा जमाना हा डिजिटलचा आहे. त्यामुळे तुमच्या काही रोमॅंटिक आठवणींचा एक व्हिडिओही तुम्हाला त्या गिफ्ट करता येईल. तुम्हाला एकदम सरप्राईज देण्यासाठीही या व्हि़डिओचा उपयोग नक्कीच होईल. शिवाय हा व्हिडिओ तुम्ही त्याला व्हॉटसअॅपही करू शकता.

5. स्केच (Sketch)

जर तुमच्याकडे चित्र काढण्याचं कौशल्य असेल तर तुम्ही हे गिफ्ट त्याला नक्कीच देऊ शकता. तुम्ही त्याचं पोट्रेट अथवा स्केच काढून तुमच्या मनातील भावना नक्कीच व्यक्त करू शकता.

6. हार्ट शेप टी बॅग (Heart Shaped Tea Bag)

या व्हॅलेंटाईन्स डेला तुम्ही त्याला हार्ट शेपची टी बॅग तयार करून प्रेझेंट करू शकता. यासाठी त्याची फेव्हरेट चहा निवडा. कात्रीने टी बॅग फिलर्सला ह्रदयाचा शेप द्या. टी बॅगमध्ये चहा पावडर भरून दोऱ्याने ती पॅक करा. कलरफुल कागदाने या बॅग्ज रोमॅंटिक पद्धतीने पॅक करा. तुम्ही त्याची आवड निवड जपून स्वतःच्या हाताने त्याच्यासाठी काहीतरी तयार केलं याचा त्याला फार आनंद होईल. 

7. अरोमा कॅंडलने सुंगधित करा तुमच्या जीवनातील आनंद (Aroma Candles) 

कॅंडल बनवणं खूपच सोपं आहे. जर तुम्हाला त्याला स्वतः काहीतरी तयार करून सरप्राईझ द्यायचं असेल तर त्याच्या आवडीचा सुंगध असलेली अरोमा कॅंडल स्वतः तयार करा आणि त्याला गिफ्ट करा.

8. सिक्रेट नोट (Secret Note)

लव्ह नोट लपवून ठेवून त्याला शोधायला लावणं हा नक्कीच एक रोमॅंटिक प्रकार आहे. ज्यामुळे तुमचा व्हलेंटाईन डे अगदी मस्त पद्धतीने साजरा होईल. यासाठी त्याच्यासाठी सिक्रेट नोट्स तयार करा आणि त्या घरात सगळीकडे लपवून ठेवा. नोट सापडल्यावर त्याच्या चेहऱ्यावरील भाव हळूवार टिपा.

बॉयफ्रेन्डला या रोमॅंटिक आणि क्यूट गिफ्टने द्या सरप्राईझ (Romantic And Cute Valentine’s Day Gift Ideas For Him)

काही गिफ्ट असे असतात जे दिल्यामुळे तुम्ही त्याची आवड निवड जपत आहात हे त्याला नक्कीच कळू शकतं. तेव्हा हे क्यूट गिफ्ट त्याला जरूर द्या. 

1. बिअर्ड ऑईल अथवा ग्रुमिंग सेट (Beard Oil Or Grooming Set)

सध्या तरूणांमध्ये स्टायलिश बिअर्ड फॅशन ट्रेंडमध्ये आहे. कारण क्लीन शेव्हची फॅशन कधीच मागे पडली आहे. निरनिराळ्या दाढीच्या शेपमधील पुरूष रुबाबदारही दिसतात. त्यामुळे आजकाल मुलींनाही स्टायलिश बिअर्ड असलेली मुलंच आवडतात. मुलंही स्टायलिश दाढी ठेवण्याला प्राधान्य देतात. स्टायलिश बिअर्डसाठी दाढीचे केस नैसर्गिकरित्या वाढलेले आणि दाट असणं गरजेचं असतं. हे दाढीचे केस नैसर्गिक पद्धतीने वाढविण्यासाठी त्या केसांना बिअर्ड ऑईल लावलं जातं. जर तुमच्या प्रियकराला स्टायलिश बिअर्डची आवड असेल तर या व्हॅलेंटाईन डेला त्याला बिअर्ड ऑईल गिफ्ट करा. तुम्ही त्याला खूश करण्यासाठी ग्रूमिंग सेटही गिफ्ट करू शकता.

Beard Lovers Gift Set खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लीक करा
किंमत 1999 रू.

2. परफ्युम (Perfume)

प्रत्येकाची परफ्युमची आवड ही वेगवेगळी असते. ज्यामुळे तुमच्या बॉयफ्रेन्डला नेमका कोणता सुंगध आवडतो हे ठरवून तुम्ही त्याच्यासाठी हे गिफ्ट सिलेक्ट करू शकता. यातून तुमच्या बॉयफ्रेन्डला तुम्ही यातून सरप्राईझ देऊ शकता. त्याच्या आवडीनिवडी जपल्यामुळे त्याला नक्कीच आनंद होईल.

Forest Essentials Kit for Him खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लीक करा
किंमत 1495 रू.

3. एखादं रोमॅंटिक गाणं गा (Sing A Romantic Song)

जर तुम्हाला त्याला सरप्राईझ द्यायचं असेल तर एखादं रोमॅंटिक गाणं तयार करा. हे गाणं तुम्ही दोघं असताना अथवा तुमच्या मित्रमंडळींसमोर गाऊन त्याला चकीत करा.

4. सरप्राईझ भेट द्या (Surprise Gift)

तुम्ही जवळ असणं यापेक्षा त्याच्यासाठी आणखी काय रोमॅंटिक असेल. जर तुम्ही त्याच्यापासून दूर असाल तर या खास दिवशी त्याला न सांगता त्याला भेटायला या.  

5. हार्ट शेप चॉकलेट्स गिफ्ट करा (Heart Shaped Chocolate)

तुम्ही तुमच्या बॉयफ्रेन्डसाठी स्वतःच्या हाताने हार्ट शेपचे चॉकलेट्स अथवा केक तयार करू शकता. असं क्यूट गिफ्ट मिळाल्यामुळे त्याला नक्कीच आनंद होईल.

दोघांनी मिळून एन्जॉंय करण्यासारखे वॅलेंटाईन्स गिफ्ट (Valentine’s Day Gifts)

कधी कधी तुम्ही असंही एखादं गिफ्ट त्याला देऊ शकता. जे तुम्ही दोघंही मिळून मस्त एन्जॉंय कराल.

1. पिकनिक पार्टी (Picnic Party)

असं म्हणतात स्त्रीला पुरूषांच्या मनातलं पटकन कळतं. म्हणूनच तुमच्या बॉयफ्रेन्डसोबत निवांत वेळ घालवण्यासाठी त्याच्या आवडीच्या ठिकाणी पिकनिक प्लॅन करा. ज्यामुळे तो तुमच्या मनाने अधिक जवळ येईल. शिवाय हे गिफ्ट तुम्हा दोघांना एकत्र एन्जॉंय करता येईल. 

2. कपल टीशर्ट (Couple T Shirt)

वॅलेंटाईन्स डे स्पेशल कपल टी-शर्ट तुम्ही त्याला नक्कीच देऊ शकता. हे गिफ्ट तुम्ही दोघंही वापरू शकता. फोटोसेशनसाठी हे अगदी परफेक्ट गिफ्ट आहे. शिवाय जेव्हा जेव्हा तुम्ही हे टी-शर्ट घालाल तेव्हा तुम्हाला त्याची विशेष आठवण येईल.

Surprisestore Couple Tshirts Together Forever Printed Matching Tees Valentine Gift for Couples खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लीक करा
किंमत 799 रू.

3. डिजिटल कॅमेरा (Digital Camera)

डीजिटल कॅमेरा ही कदाचित खूप मोठी किंमत वाटू शकेल. पण तुमच्या आयुष्यातील अनेक आठवणी कॅप्चर करण्यासाठी तुम्हाला हा कॅमेरा नक्कीच उपयोगी पडेल.आता तुम्हाला तुमच्या रेंजनुसार चांगला कॅमेरा निवडता येईल. शिवाय हे गिफ्ट तुमच्या दोघांसाठीही खास असेल. 

Fujifilm Instax Mini 9 Instant Camera खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लीक करा
किंमत 5530 रू.

4. सिनेमाचा शो बुक करा (Go To The Movies)

सिनेमाला एकत्र जाणं आणि एकमेकांसाठी वेळ काढणं नक्कीच खास असू शकतं. म्हणूनच तुमच्या बॉयफ्रेन्डसाठी सिनेमाचा खास प्लॅन करा यासाठी घरीच त्याच्या आवडीचा सिनेमा पाहण्याची सोय करा अथवा त्याचा आवडीच्या सिनेमाचं तिकीट बुक करून त्याला सरप्राईझ द्या.

5. आठवणींचा कोलाज (Collage Of Memories)

रिलेशनशीपमध्ये असल्यावर खूप फोटो काढणे आलेच. तुमच्या या जर्नीचा तुम्ही कोलाज करायला हवा. तुम्ही फोटोची कॉपी काढून छान त्याचा कोलाज करु शकता. त्यामुळे तुमच्या अनेक चांगल्या गोष्टी अनेक आनंदाचे प्रसंग तुम्ही या कोलजमध्ये एकत्र करुन ठेवा.

बजेटमध्ये असतील असे वॅलेंटाईन्स गिफ्ट (Budget Friendly Valentine’s Day Gifts)

जर तुम्हाला तुमच्या बॉयफ्रेन्डला भरपूर गिफ्ट द्यायचे असतील तर असे बजेटमध्ये बसतील गिफ्ट जरूर घ्या.

1. जिम विअर (Gym Wear)

तुमचा प्रियकर फिटनेसप्रेमी असेल तर त्याला जीम, मॉर्निंगवॉक अथवा व्यायाम करण्याची नक्कीच  आवड असेल. त्यामुळे या व्हॅलेंटाईन डेला त्याला जीम विअर गिफ्ट करणं तुमच्या खूपच फायद्याचं ठरेल. एकतर यामुळे तुम्ही त्याच्या आवडीनिवडींचा किती विचार करता हे त्याला कळेल शिवाय तो जेव्हा जेव्हा हे कपडे घालेललतेव्हा त्याला तुमची आठवण येईल. मात्र जिम विअर विकत घेण्यापूर्वी त्याच्या आवडीच्या ब्रॅंडचा विचार अवश्य करा ज्यामुळे ते त्याला आरामदायकही वाटतील.

Pro Gym Compression Lower/Pant Skin Tights Leggings Men खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लीक करा
किंमत – 1999 रू.

2. स्पोर्ट्स शूज (Sports Shoes)

आजकाल मुलंही हेल्थ कॉन्शिअस असतात. त्यामुळे तासनतास व्यायामासाठी देणं, ट्रेकला जाणं अथवा जॉगिंग करण्याची त्यांना आवड असते. जर तुमच्या प्रियकरालाही अशा प्रकारची एखादी आवड असेल तर त्याला या व्हॅलेंटाईनडेला त्याच्या आवडीचे  स्पोर्ट्स शूज गिफ्ट करा. ज्यामुळे तो आनंदी तर होईलच शिवाय हे गिफ्ट त्याच्यासाठी उपयोगीही असेल.

Nike Boy’s Supergame Alt (Gs) Running Shoes खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लीक करा
किंमत 2495 रू.

3. घड्याळ (Clock) 

निरनिराळ्या स्टाईलची घड्याळ अनेकांचा आवडीचा विषय असतो. अनेकांना अशा घड्याळ्यांच्या कलेक्शनची आवड असते. आजकाल बाजारात विविध प्रकारची घड्याळ उपलब्ध असतात. फॉर्मल विअर, कॅज्युअल विअर अथवा स्पोर्ट्स विअर अशा विविध प्रकारातून तुम्ही यांची निवड करू शकता. तुमच्या प्रियकराला अशा घड्याळ्यांच्या कलेक्शनची आवड असेल तर त्याच्याकडे नसलेलं एखादं घड्याळ तुम्ही त्याला गिफ्ट करू शकता. शिवाय आजकाल स्मार्ट वॉचचीही फॅशन आहे. स्मार्ट वॉचमधील विविध फंक्शनचा त्याला दररोज चांगला फायदाही होऊ शकेल.

Fastrack Casual Analog White Dial Men’s Watch खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लीक करा
किंमत – 995 रू.

4. वॉलेट (Wallet)

पैशांचं वॉलेट प्रत्येकासाठी खास असतं. विविध प्रकारचे वॉलेट बाजारात उपलब्ध असतात. निरनिराळ्या पॅटर्न्स आणि ब्रॅंडमधून तुम्ही एखादं मस्त वॉलेट त्याच्यासाठी निवडू शकता. वॉलेट ही गरजेची गोष्ट असल्याने ते नेहमीच त्याच्या जवळ राहील आणि ते पाहताना त्याला तुमची सतत आठवण येईल. मात्र गिफ्ट करताना पाकीटात तुमच्या दोघांचा एखादा रोमॅंटिक फोटो नक्की ठेवा. ज्यामुळे तो जेव्हा जेव्हा हे गिफ्ट पाहील तेव्हा तो प्रत्येक क्षण तुमच्यासाठी अगदी खास ठरेल.

WildHorn Brown Men’s Wallet या ठिकाणी क्लीक करा
किंमत 1599 रू.

5. गॅझेट्स (Gadgets)

मुलांना इलेक्ट्रॉनिक वस्तू फारच आवडतात. त्यामुळे तुम्ही त्याला या व्हॅलेंटाईन डेला एखादं गॅझेट गिफ्ट करू शकता. खरंतर तुम्ही तुमच्या बजेटनुसार कोणत्याही वस्तूंची निवड करू शकता.प्रत्येकासाठी प्रिय व्यक्तीही नेहमीच अनमोल असते. त्यामुळे या व्हॅलेंटाईन डेला त्याचा आवडीचा एखादा मोबाईल फोन त्याला देण्यास काहीच हरकत नाही. पण कदाचित ते थोडं खर्चिक पडू शकतं. त्याच्याजवळ नुकताच घेतलेला नवीन मोबाईल असेल तर तुम्ही त्याला ब्ल्यू टुथ स्पीकर, हेडफोन, पॉवरबॅंक  गिफ्ट करू शकता ज्या गोष्टी त्याला नक्कीच आवडतील आणि उपयोगीही पडतील.

 

बॉयफ्रेन्डसाठी पर्सनाईज गिफ्ट (Personalised Gifts For Boyfriend)

तुमच्या बॉयफ्रेन्डसाठी हे काही गिफ्ट खास कस्टमाईज करून घ्या.

1. कॉफी मग (Coffee Mug)

तुमच्या बॉयफ्रेन्डला कॉफी आवडत असेल. तर कॉफीसाठी पर्सनलाईझ कॉफी कप गिफ्ट करणं ही एक बेस्ट कल्पना आहे. आजकाल बाजारात पर्सनलाईझ कॉफी मग तयार करून मिळतात.

POPxo Virgo Magic Mug विकत घेण्यासाठी या ठिकाणी क्लीक करा 

किंमत 399 रू. 

2. फोटोफ्रेम (Photoframe)

तुमच्या त्याच्या बद्दल काय भावना आहेत ते त्याला कळण्यासाठी तुम्ही अशा प्रकारची फ्रेमसुद्धा त्याला मस्त गिफ्ट करु शकता. कारण तुम्हाला यात नुसते फोटो नाहीत तर भावना व्यक्त करण्याची संधी मिळते.

Collage frame for 5 photos खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लीक करा.
किंमत 999 रू.

3. केक (Cake)

कोणत्याही नात्याची सुरुवात ही छान गोड असावी म्हणून तुम्ही अशाप्रकारचा केक देखील तयार करुन घेऊ शकता. तुम्हाला त्याच्या छान फोटोचा वापर करून असा केक तयार करू शकता. कारण आजकाल केक शॉप्समध्ये असे केक पर्सनाईझ करून मिळतात.

4. प्लॅनर (Plannar)

जर तुमचा बॉयफ्रेन्ड कामावर प्रेम करणारा असेल तर त्याची ही आवड तुम्ही नक्कीच जपायला हवी. त्याची ही आवड जपण्यासाठी तुम्ही एखादं प्लॅनर त्याच्यासाठी पर्सनाईझ करून घेऊ शकता. ज्यामुळे तो नक्कीच सरप्राईझ होईल.

POPxo My Year Planner 2020 खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लीक करा

किंमत 1199 रू. 

5. पोस्टर – (Poster)

आजकाल वेगवेगळे मेसेज असलेले पोस्टर बाजारात मिळतात. जर तुम्हाला त्याचा आणि तुमचा एकत्र असलेला एखादा फोटो अथवा लव्हमेसेज त्याच्यासाठी लिहून पोस्टर तयार करायचं असेल तर ते तुम्ही करू शकता.

POPxo Oh The Places You Go Poster खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लीक करा.
किंमत 120 रू. 

बॉयफ्रेन्डला द्या हे नॉटी गिफ्ट्स (Naughty Gifts For Boyfriend)

हे काही गिफ्ट्स पाठवून तुम्ही तुमच्या मनातील नॉटी आयडियाज त्याच्यासोबत शेअर करू शकता. 

1. सरप्राईझ भेट (Surprise Visit)

रिलेशनशिपमध्ये असताना तुम्हाला दोघांनाही जास्तीत जास्त एकत्र राहावं असं नक्कीच वाटत असतं. दूरावा दूर करण्याचा आणि सरप्राईझ दूर करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे अचानक भेट घेणं. या व्हॅलेटाईन्स डेला त्याला फोन करा आणि तुम्हाला भेटायला यायला सांगा. घरी कोणीच नसताना त्याला भेटायला बोलावल्यामुळे तो नक्कीच चकीत होईल.

2. सेक्सी इनरवेअर (Sexy Innerwear)

जेव्हा तुम्ही रिलेशनशिपमध्ये असता तेव्हा तुमच्या दोघांच्याही मनात काय सुरू आहे हे तुम्हाला नक्कीच कळत असतं. मात्र यासाठी पुढाकार कोणी घ्यायचा हा मोठा प्रश्न असतो. म्हणूनच अशा प्रकारचं एखादं नॉटी गिफ्ट देऊन तुम्ही तुमच्या मनातील भावना व्यक्त करू शकता.

3. रोमॅटिक मेसेज (Romantic Message)

तुम्ही तुमच्या मनातील त्या नाजूक भावना एखाद्या लव्ह मेसेजमधून त्याला पाठवू शकता. रात्री झोपण्यापूर्वी तुमचा असा रोमॅंटिक मेसेस पाहून त्याला तुमच्या मनातलं नक्कीच समजू शकतं.

4. सेक्स फॅंटसी गिफ्ट (Sex Fantasy Gift)

प्रत्येकाची काही ना काहीतरी सेक्स फॅंटसी असते. तुमच्या बॉयफ्रेन्डची सेक्स फॅंटसी ओळखा आणि त्यानूसार त्याच्यासाठी काहीतरी नॉटी गिफ्ट प्लॅन करा.

5. टॉवेल (Towel)

टॉवेल अथवा सॅनिटरी गिफ्टमधून तुम्ही त्याला तुमच्या मनातील मेसेज सांगू शकता. यासाठी असा एखादा नॉटी मेसेज लिहीलेला टॉवेल त्याला गिफ्ट करा.

अधिक वाचा़ –

बॉयफ्रेंडला प्रपोज करण्याचे ‘हे’ हटके प्रकार तुम्ही पाहिलेत का

१० गोष्टींतून मुली व्यक्त करतात प्रेम, जाणून घ्या या गोष्टी

प्रेम करता? घरी सांगायचय? तुमच्यासाठी खास टीप्स

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम आणि शटरस्टॉक

Read More From नातीगोती