व्हेरिकोज व्हेन्सकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे स्वरूप गंभीर होण्याची आणि वेदना, दाह वाढण्याची शक्यता असते. ज्यामुळे रुग्णाला दैनंदिन कामे करणे जसं की,चालणे, उभं राहणे कठीण होतं. या समस्येवर वैद्यकीय उपचार असले तरी व्हेरिकोज व्हेन्स घरगुती उपाय (Varicose Veins Home Remedies In Marathi ) करून ही समस्या नियंत्रणात आणता येते. एखाद्या व्यक्तीच्या पायातील रक्तवाहिन्या सुजून मोठ्या होतात तेव्हा या समस्येला व्हेरिकोज व्हेन्स असं म्हणतात. काही जणांना यामुळे प्रंचड वेदना आणि दाह सहन करावा लागतो. यासाठी जाणून घ्या व्हेरिकोज व्हेन्स म्हणजे काय आणि व्हेरिकोज व्हेन्स उपाय (Varicose Veins Upay In Marathi) कोणते करावे.
Table of Contents
व्हेरिकोज व्हेन्स म्हणजे काय (What Are Varicose Veins In Marathi)
पायातील रक्तवाहिन्यांमधील झडपा कमजोर झाल्यामुळे होणाऱ्या समस्येला व्हेरिकोज व्हेन्स असं म्हणतात. या झडपांमधून रक्तवाहिन्यांमध्ये मागच्या दिशेला वाहणारे रक्त नियंत्रित केले जाते. मात्र जेव्हा रक्तवाहिन्यांमधील झडपा कमजोर होतात तेव्हा ते रक्त पुन्हा मागच्या दिशेला वाहतं आणि खराब होऊन रक्तवाहिन्यांमध्ये जमा होतं. ज्यामुळे पायाच्या शिरा सूजतात आणि फुगून मोठ्या होतात. त्या एवढ्या वाढतात की त्या चक्क पायाच्या त्वचेमधून बाहेर आल्या आहेत हे दिसू लागतं. व्हेरिकोज व्हेन्स निळ्या, जांबळ्या रंगाच्या असल्यामुळे त्या कोणालाही पटकन दिसू शकतात.
व्हेरिकोज व्हेन्सची लक्षणे (Varicose Veins Symptoms In Marathi)
व्हेरिकोज व्हेन्स ओळखण्याची काही प्रमुख लक्षणे (Varicose Veins Symptoms In Marathi) आहेत ज्यामुळे तुम्हाला या आरोग्य समस्येचे निदान करता येते. यासाठी करा हे व्हेरिकोज व्हेन्स घरगुती उपाय (Varicose Veins Gharguti Upay In Marathi).
- पायाच्या शिरा निळ्या जांभळ्या होणे
- पायाच्या शिरा फुगून मोठ्या होणे
- पाय आणि पावलावर सूज येणे
- व्हेरिकोज व्हेन्सवरील त्वचा कोरडी होणे आणि दाह होणे
- सतत पायामधून वेदना आणि जळजळ जाणवणे.
- पाय खूप दड होणे आणि चालताना त्रास जाणवणे
- खूप वेळ एकाच ठिकाणी उभे राहणे कठीण वाटणे
- रात्रीच्या वेळी पायात सतत मसल क्रॅम्प येणे
व्हेरिकोज व्हेन्स घरगुती उपाय (Varicose Veins Gharguti Upay In Marathi)
व्हेरिकोज व्हेन्स ही एक त्रासदायक आणि वेदनादायक आरोग्य समस्या असली तरी तुम्ही काही व्हेरिकोज व्हेन्स वर उपाय (Varicose Veins Upay In Marathi) करून या समस्येला नियंत्रणात ठेवू शकता.
व्यायाम (Exercise)
नियमित व्यायाम केल्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते. ज्यामुळे तुमच्या पायाच्या रक्तवाहिन्यांना रक्ताचा योग्य प्रमाणात पूरवठा होतो. व्यायामामुळे रक्तवाहिन्यांमध्ये साठलेले दूषित रक्त पुढे ढकलण्यास मदत होते. व्यायमामुळे रक्तदाबही नियंत्रणात राहण्यास मदत होते. ज्याचा व्हेरिकोज व्हेन्स असलेल्या लोकांना चांगला फायदा मिळतो. व्हेरिकोज व्हेन्समधून आराम मिळणय्यासाठी पोहणे, चालणे, सायकल चालवणे, योगासने करणे अशा प्रकारचे व्यायाम करणे फायदेशीर ठरते. सायकल चालवण्याचे फायदे वाचाल तर थक्क व्हाल (Benefits Of Cycling In Marathi).
वजन नियंत्रणात ठेवणे (Maintaining a Healthy Weight)
वजन कमी करणे हे कोणतीही आरोग्य समस्या नियंत्रणात ठेवण्यासाठी सोयीचे ठरते. जर तुमचे वजन जास्त असेल तर व्हेरिकोज वेन्सची समस्या अधिक त्रासदायक ठरते. कारण त्यामुळे तुम्हाला तुमची दैनंदिन कामे करतानाही त्रास होतो. मुळात व्हेरिकोज वेन्समुळे पायात सूज आणि वेदना असतात. त्यात अती वजनामुळे तुम्हाला तुमच्या शरीरावर नियंत्रण ठेवता येत नाही. सतत बसून पायाचा त्रास वाढण्याची शक्यता असते. यासाठी व्हेरिकोज वेन्सवरील बेस्ट उपाय काही किलोंनी तुमचे वजन कमी करणे हा होय.
आहारात बदल (Dietary Changes)
आहारामध्ये काही बदल करूनही व्हेरिकोज व्हेन्समध्ये फायदा होऊ शकतो. जसं की, सोडियमयुक्त पदार्थत खाण्यामुळे तुमचा त्रास जास्त वाढू शकतो. यासाठी आहारातून मीठ कमी करावे. ज्या पदार्थांमध्ये जास्त पोटॅशिअम आहे असे पदार्थ तुम्ही नक्कीच खाऊ शकता. जसं की पालेभाज्या, बदाम, बटाटा, मासे. त्याचप्रमाणे सुपरसीड्स, ओट्स, अळशी, तृणधान्ये खाण्यामुळे तुमच्या शरीराला पुरेसे फायबर्स मिळतात. ज्यामुळे तुमचे वजन नियंत्रित राहते आणि पायातील वेदना कमी होतात.
फ्लेव्होनॉईडचे प्रमाण वाढवणे (Eat More Flavonoids)
आहारात फ्लेव्होनॉईड वाढवल्यास तुमचे रक्ताभिसरण सुधारते, रक्तप्रवाह सुरळीत सुरू राहिल्यामुळे शिरांमध्ये साचलेले खराब रक्त प्रवाहित होते आणि पायावरील ताण कमी होतो. फ्लेव्होनॉईडमुळे तुमचा रक्तदाबही नियंत्रित राहण्यास मदत होते. यासाठी आहारात, कांदा, पालक, ब्रोकोली, चेरीज, सफरचंद, द्राक्षे, लसूण याचा समावेश वाढवावा. रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी उच्च रक्तदाब आहार (High Blood Pressure Diet In Marathi)
आरामदायक कपडे निवडणे (Choose Non-Restrictive Clothing)
तुम्ही कसे आणि कोणते कपडे वापरता यावर तुमच्या व्हेरिकोज वेन्सच्या वेदना अवलंबून असतात. कारण अती तंग आणि घट्ट कपडे वापरण्यामुळे तुमच्या शरीरातील रक्तप्रवाहात अडचणी येतात. त्यामुळे व्हेरिकोज वेन्स असलेल्या लोकांनी नेहमी सैल आणि आरामदायक कपडे घालावे. त्याचप्रमाणे अशा लोकांनी नेहमी फ्लॅट फूटवेअर वापरावे. ज्यामुळे त्यांना चांगला फायदा होऊ शकतो.
सतत हालचाल करणे (Keep Moving)
व्हेरिकोज वेन्स असलेल्या लोकांनी कधीच एका ठिकाणी जास्त वेळ बसून राहू नये. कारण कामानिमित्त एकाच ठिकाणी तासनतास बसण्यामुळे तुमचा त्रास अधिक वाढू शकतो. यासाठी दर एक तासाने थोडं फिरणे आणि पाय मोकळे करण्याची सवय लावावी. त्याचप्रमाणे अशा लोकांनी मांडी घालून फार वेळ बसू नये. कारण त्यामुळे रक्तप्रवाहात अडथळा येतो आणि पायाची हालचाल करणे कठीण होते.
मालिश (Massage)
मालिश करणे ही एक पारंपरिक उपचार पद्धती आहे. त्वचेवर तेलाने मालिश केल्यामुळे त्वचेखाली रक्तप्रवाह सुधारतो आणि त्याचा आरोग्यावर चांगला फायदा होतो. व्हेरिकोज वेन्स या समस्येवर पायाला हळूवार मालिश केल्यामुळे चांगला फायदा होतो. मात्र लक्षात ठेवा या समस्येवर उपचार करताना हळूवार मसाज करावा. जास्त दाब पडल्यास व्हेरिकोज वेन्स फुटून समस्या जास्त वाढू शकते.
पाय वर उंचावर ठेवणे (Keep The Legs Elevated)
व्हेरिकोज वेन्समध्ये तात्पुरता आराम मिळण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे पाय काही वेळ उंचावर ठेवून बसणे. जर तुमच्या पायाची स्थिती तुमच्या ह्रदयाच्या उंचीवर आली तर तुमचा रक्ततप्रवाह सुरळीत होतो. यासाठी अचानक वेदना जाणवू लागल्यास काही काळासाठी हा उपाय जरूर करवा. बराच वेळ उभं राहिल्यावर अथवा बसून काम केल्यावर थोडा आराम मिळण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. यासोबतच वाचा गुडघेदुखीवर रामबाण उपाय (Knee Pain Home Remedies In Marathi)
आयुर्वेदिक उपाय (Herbal Remedies)
प्राचीन काळापासून आर्युवेदिक उपचार अनेक आरोग्य समस्यांवर केले जातात. व्हेरिकोज वेन्सवरही काही औषधी वनस्पतींचे उपचार करता येतात. व्हेरिकोज वेन्सवर द्राक्षाच्या बियांचा अर्क घेण्याचा सल्ला दिला जातो. याचप्रमाणे या समस्येवर अॅपल सायडर व्हिनेगर, लसूण, लिंबू असे घरगुती उपायही करता येतात. कारण त्यामुळे तुमच्या पायामधीलल दाह आणि वेदना कमी होतात. मात्र ज्यांना व्हेरिकोज वेन्सवर रक्त पातळ होण्यासाठी औषधे दिलेली असतात. अशा लोकांनी हर्बल उपचार काही काळ करू नयेत.
व्हेरिकोज व्हेन्सबाबत निवडक प्रश्न – FAQ’s
1. व्हेरिकोज वेन्सवर कोणते तेल परिणामकारक आहे ?
जर तुम्हाला व्हेरिकोज वेन्ससाठी पायाला मालिश करायची आहे. तर तुम्ही ग्रेप्स सीड ऑईल, लव्हेंडर ऑईल, सी पाईन ऑईल, हॉर्स चेस्टनट ऑईल वापरू शकता.
2. व्हेरिकोज वेन्स असल्यास कोणते पदार्थ खाणे टाळावे ?
व्हेरिकोज वेन्स असलेल्या लोकांनी मीठाचे, अती साखरेचे, प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे टाळावे. जास्त प्रमाणात कर्बोदके असलेले पदार्थ खाऊ नये. मद्यपान करणे टाळावे.
3. व्हेरिकोज वेन्स नैसर्गिक पद्धतीने कमी होतात का ?
कोणतीही आरोग्य समस्या आपोआप कमी होत नाही. तुम्हाला त्यासाठी काही प्रयत्न नक्कीच करावे लागतात. जसं की व्यायाम, वजन कमी करणे आणि आहारावर नियंत्रण ठेवणे. यामुळे व्हेरिकोज वेन्स नियंत्रणात येऊ शकते.