पावसाळा जसा रोमॅंटिक आहे तसाच तो आजारपणांना आमंत्रण देणाराही आहे. सहाजिकच पावसाळ्यात सतत आजारपण, इनफेक्शनचा धोका असतो. पावसाळ्यात इनफेक्शन होण्यासाठी जसं दूषित पाणी, दूषित अन्न कारणीभूत असू शकतं. तसंच काही भाज्यांच्या माध्यमातूनही तुम्हाला आजारपण येऊ शकतं. या भाज्या आरोग्यासाठी कितीही चांगल्या असल्या तरी पावसाळ्यात त्यातून इनफेक्शन होण्याचा धोका जास्त असतो. यासाठी जाणून घ्या पावसाळ्यात कोणत्या भाज्या मुळीच खाऊ नयेत.
पावसाळ्यात या भाज्या खाणे आवर्जून टाळावे
पावसाळ्यात सर्वत्र वातावरण दमट असल्यामुळे जीवजंतूंसाठी अतिशय पोषक असतं. यासाठीच या भाज्या खाण्यामुळे तुम्हाला इनफेक्शनचा धोका असू शकतो.
टोमॅटो
आता तुम्ही म्हणाल स्वयंपाकासाठी टॉमॅटो हवेच. कारण भारतीय खाद्यसंस्कृतीत साध्या डाळ, आमटी, सार, भाजीसाठीपण टोमॅटो लागतात. पण टोमॅटो पचण्यासाठी अतिशय जड असतात. पावसाळ्यात मुळातच तुमची पचनशक्ती कमी झालेली असते. त्यात जर जास्त प्रमाणात टोमॅटो सेवन केला तर तुमच्या पचनशक्तीवर भार पडतो. त्याचप्रमाणे पावसाळ्यात टोमॅटो लवकर सडू नयेत यासाठी पिकावर केमिकल्स मारले जातात. ज्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होण्याचा धोका असतो. यासाठी पावसाळ्यात टोमॅटोचा वापर स्वयंपाकात कमी करावा. त्याचप्रमाणे टोमॅटो कच्चा खाण्यापेक्षा शिजवूनच खावा. भाज्या आणि फळं झटपट कापण्यासाठी सोप्या किचन टिप्स
कोबी
कोबीची भाजी जरी तुम्हाला खूप आवडत असेल तरी ती पावसाळ्यापुरती कमी खा. चायनिज सारख्या पदार्थांमध्ये कोबीचा भरपूर वापर केला जातो. सलाडमध्ये फायबर्ससाठी कोबीची पाने असतात. मात्र ही कोबी वरून कितीही छान आणि ताजी दिसत असली तरी ती आतून खराब असण्याची शक्यता असते. कारण कोबीची पाने पातळ असतात. या पानांच्या मध्ये जीवजंतूंसाठी पोषक वातावरण असतं. त्यामुळे पावसाळ्यात कोबीत कीड असण्याची शक्यता जास्त असते. यासाठी कोबी स्वयंपाकासाठी वापरण्यापूर्वी तो काही वेळ मीठ अथवा खाण्याच्या सोड्यात बुडवून ठेवा. बाजारातून आणलेली फळं आणि भाज्या धुताना अशी घ्या काळजी
पालेभाज्या
पावसाळ्यात पालेभाज्या खूप कमी प्रमाणात मिळतात. मात्र पालेभाज्यांमधून पोषक घटक शरीराला मिळत असल्यामुळे काही प्रमाणात या भाज्या पावसाळ्यातही खाणं गरजेचं आहे. पालक आणि मेथीसारख्या बारमाही मिळणाऱ्या भाज्या पावसाळ्यात खाताना थोडं सावधही असावं. कारण या भाज्यांच्या पानांमधून सूक्ष्म जीव तुमच्या शरीरात प्रवेश करू शकतात. यासाठी पावसाळ्यात पालेभाज्या घेताना त्या सावधपणे निवडा आणि स्वच्छ धुवून, शिजवून मगच खा.
मशरूम
पावसाळ्या निरनिराळ्या प्रकारचे मशरूम बाजारात येतात. मात्र जर तुम्ही गावच्या ठिकाणी अथवा नैसर्गिक पद्धतीने उगवलेले मशरूम खाणार असाल तर काहीच हरकत नाही. वास्तविक पावसाळ्यात कोणत्याही ओलसर जागी मशरूम वाढतात. दूषित जागी उगवलेले मशरूम खाण्यामुळे तुमच्या शरीरात रोगाचे संक्रमण होण्याचा धोका अधिक असतो.भाज्या आणि फळं फ्रीजमध्ये जास्त काळ टिकवण्यासाठी सोप्या टिप्स
वांगे
चार्तुमासामध्ये वांगे खाऊ नये असं सांगितलं जातं. यामागचं एक कारण पावसाळ्यात वांगे किडके असण्याची शक्यता जास्त असते. शिवाय वांगे पचायला जड असल्यामुळे पावसाळ्यात वांगे खाण्यामुळे तुमच्या पचनशक्तीवर वाईट परिणाम होतो. यासाठी शक्य असल्यास पावसाळ्यापुरतं तरी वांगे खाणं टाळायला हवे.