Uncategorized

या कारणामुळे लता मंगेशकर राहिल्या अविवाहित

Dipali Naphade  |  Feb 6, 2022
या कारणामुळे लता मंगेशकर राहिल्या अविवाहित

लता मंगेशकर हे नाव कोणाला माहीत नाही असं अजिबात नाही. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत अगदी अरसिक माणसांनाही लता मंगेशकर (Lata Mangeshkar) हे नाव माहीत (लता मंगेशकर माहिती मराठी) आहे. गानसम्राज्ञी आणि भारताच्या गानकोकिळा आपल्यातून निघून गेल्या असल्या तरीही ‘मेरी आवाजही पेहचान है’ हे त्यांच्या बाबतीत खरं ठरलं आहे. लता मंगेशकर हे नाव कायम रसिकांच्या मनावर कोरलं गेलं आहे. अशी गायिका पुन्हा होणे नाही असं म्हटलं तर अजिबातच वावगं ठरणार नाही. मात्र अशा गायिकेने आजन्म अविवाहित राहण्याचा नक्की का निर्णय घेतला तुम्हाला माहीत आहे का? लता मंगेशकर हे असं नाव आहे जे कधीही कोणाहीबरोबर सहसा जोडण्यात आले नाही. कधीही त्यांच्या नात्याबाबत गॉसिप झाले नाही. याचे नक्की कारण काय होते? लता मंगेशकर यांची माहिती खास तुमच्यासाठी. 

अत्यंत फिल्मी लव्हस्टोरी आणि अविवाहित राहण्याचे कारण 

लता मंगेशकर यांची लव्हस्टोरी फारच कमी लोकांना माहीत आहे? पहिलं प्रेम काही जणांना कधीच विसरता येत नाही आणि अशा व्यक्ती कायम एकटं राहण्याला प्राधान्य देतात. लतादीदींच्या बाबतीतही हेच घडलं. याच कारणामुळे लतादीदी कायम अविवाहित राहिल्या असं सांगण्यात येतं. डुंगरपूर राजघराण्याचे महाराजा राज सिंह यांच्यावर लता मंगेशकर यांचे प्रेम होते असं सांगितलं जातं. लतादीदींचे भाऊ हृदयनाथ यांचे राज सिंह अत्यंत जवळचे मित्र होते. लता मंगेशकर यांच्या खांद्यावर आपल्या घराची जबाबदारी फारच कमी वयात आली. आपल्या सर्व भावंडांना सांभाळत त्यांनी आपल्यासह इतर भावंडांचे करिअरही तितकेच उभे केले. या सगळ्यात कुटुंबाची जबाबदारी पूर्ण करत असताना लता मंगेशकरांनी कुटुंबाला वाहून घेतले आणि लग्न केले नाही असंही सांगण्यात येते. मात्र हे कारण नाही. 

राज सिंह जेव्हा मुंबईत आले तेव्हा लता मंगेशकर यांच्या घरी हृदयनाथशी मैत्री असल्यामुळे त्यांचे येणे जाणे खूपच वाढले. त्यांची लता यांच्याशी मैत्रीही झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमातही झाले. दोघांनाही एकमेकांशी लग्न करायचे होते. मात्र हे प्रत्यक्षात घडू शकले नाही. राज सिंह यांच्या आई-वडिलांना या लग्नाला विरोध करत, सामान्य मुलीशी लग्न करण्याचे वचन राज सिंह यांच्याकडून घेतले. राज सिंह आपल्या आई-वडिलांना दिलेले वचन आजन्म पाळले. मात्र त्यांनीही लग्न न करता अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला. तर लता मंगेशकर यांनीही राज सिंह यांच्यावरील प्रेमापोटी लग्न न करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान राज सिंह यांना क्रिकेटचे वेड असल्याने ते कित्येक वर्ष BCCI शी जोडलेले होते. लता आणि राज सिंह यांच्या भेटीगाठी चालू असल्या तरीही ते लग्न करू शकले नाही. मीडियामध्येही याची खूपच चर्चा झाली होती. 

लता मंगेशकरांवर अपार प्रेम 

राज सिंह आणि लता मंगेशकर यांची खूपच घट्ट मैत्री होती. राज सिंह प्रेमाने लताजी यांना मिठ्ठू अशी हाक मारायचे. तर लता मंगेशकर यांनाही क्रिकेटची खूपच आवड होती. ही आवड तर जगजाहीर आहे. राज सिंह यांच्या खिशामध्ये कायम एक टेपरेकॉर्डर असायचा. ज्यामध्ये केवळ लताजींच्या निवडक गाण्यांचा समावेश होता. राज सिंह यांचे 2009 मध्ये निधन झाले. मात्र एखाद्या चित्रपटातील कथेप्रमाणे या दोन जीवांची प्रेमकहाणी अपूर्ण राहिली. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From Uncategorized