तमाशा म्हटला की काही नावं आवर्जून डोळ्यासमोर येतात आणि त्यापैकी तमाशा रंगभूमीवरील गाजलेले नाव म्हणजे कांताबाई सातारकर. आपल्या अभिनयाने सर्वांना आपलंसं केलेल्या आणि शिवाजी महाराज, संभाजी महाराज अशा पुरूषी भूमिका रंगविणाऱ्या अव्वल अभिनेत्री कांताबाई सातारकर यांचे वयाच्या 82 व्या वर्षी संगमनेर येथे निधन झाले आहे. काही दिवसांपूर्वीच कोरोनाने त्यांना ग्रासले होते. ज्येष्ठ तमाशा कलाकार रघुवीर खेडकर यांच्या आई होत्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांचे संपूर्ण कुटुंब हे आजही तमाशा रंगभूमीची सेवा करत आहे. संपूर्ण परिवार तमाशा रंगभूमीच्या सेवेत असून स्वतःला यामध्ये वाहून घेतलं आहे.
सर्वांनाच झाली होती कोरोनाची लागण
घरामध्ये सर्वांनाच कोरोनाची लागण झाली होती. रघुवीर खेडकर यांच्यासह संपूर्ण कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती. काही जणांना त्यातून डिस्चार्जही देण्यात आला होता. कांताबाई यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचाराला प्रतिसाद न दिल्याने कांताबाई यांचे निधन झाले. कोरोनामुळे कांताबाई सातारकर यांचे निधन झाल्याने सगळीकडेच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
अभिनेत्री पूजा सावंत पडली प्रेमात, ‘पिकबू’ लाडाचे नाव
बहुआयामी चेहरा हरवला
लोककलेची परंपरा पुढे घेऊन जाणारा एक बहुआयामी चेहरा हरवला हीच भावना सगळीकडे सध्या व्यक्त केली जात आहे. 2005 मध्ये महाराष्ट्र शासनाने तमाशा क्षेत्रामधील योगदानासाठीचा पहिला विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार देऊन कांताबाई सातारकर यांचा सन्मान केला होता. इतकंच नाही तर दिल्लीमध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांताबाई आणि त्यांचा मुलगा रघुवीर या दोघांनाही तमाशा सादर करण्याचा बहुमान प्राप्त झाला होता. उत्तम अभिनेत्री, उत्तम गायिका, वगनाट्य दिग्दर्शिका, उत्तम व्यवस्थापक अशा अनेक भूमिका त्यांनी वैयक्तिक आयुष्यात पार पाडल्या. आपल्या अभिनयाने आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाने त्यांनी नेहमीच आपली छाप सोडली आहे. आजपर्यंत आपण अनेक पुरूषांनी महिलांची भूमिका केल्याचे आवर्जून सांगतो. पण रंगभूमीवर अशा प्रकारे महिलेने पुरूषांची भूमिका केल्याची उदाहरणे फारच कमी आहेत. कांताबाईंनी इतकी हुबेहूब पुरूष व्यक्तिरेखा साकारली की त्यांना ओळखणेदेखील कठीण जात होते असं म्हटलं जातं. रायगडची राणी, कलंकिता मी धन्य झाले, अधुरे माझे स्वप्न राहिले, गोविंदा गोपाळा, गवळ्याची रंभा, कोंढाण्यावर स्वारी अशा अनेक वगनाट्यामध्ये कांताबाईंनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं करून घेतले होते.
बॅकग्राऊंड डान्सर्सच्या मदतीसाठी अक्षय कुमार आला पुढे, 3600 डान्सर्संना पूरवणार भोजन
वयाच्या 9 व्या वर्षी चालू झालेला प्रवास संपला
गुजरातमधील लहानशा टिंबा या गावात कांताबाईचा जन्म झाला. दगडखाणीत काम करणाऱ्या आईवडिलांच्या पोटी जन्माला येऊन कुटुंबात तमाशाचा कोणताही वारसा नसताना आपली एक छाप कांताबाईंनी सोडली. गुजरातमधून साताऱ्यात आल्यानंतर मेळ्यात नृत्य पाहून कांताबाई नक्कल करू लागल्या. कोणत्याही गुरूविना त्यांनी स्वतःच नृत्य शिकले. नवव्या वर्षी त्यांना साताऱ्यातील नवझंकार मेळ्यात नृत्याची संधी मिळाली आणि तिथून त्यांचा प्रवास सुरू झाला. मात्र आता 82 व्या वर्षी हा प्रवास कायमचा थांबला आहे. मात्र कुटुंबातील सर्व व्यक्ती हा वारसा जपत असून पुढेही तमाशा परंपरा अशीच चालू ठेवणार आहेत. आजही ही लोककला जपण्याचा वारसा त्यांचा कुटुंबाने घेतला असल्याचे दिसून येत आहे.
पकडला जाणार देवी सिंग, ‘देवमाणूस’ मालिकेला रंजक वळण
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade