काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या मयूर मधुकर शिंदे दिग्दर्शित ‘विशू’ (Vishu) या चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये एक डायलॉग होता. ‘ये मालवण कहा आया? त्यावर ‘विशू’ म्हणतो, यहा दिल में… या एका डायलॉगने अनेक कोकणवासीयांसह अनेकांची मने जिंकली. कोकणचे निसर्गरम्य सौंदर्य, निळेशार समुद्रकिनारे, तिथली साधी भोळी माणसे, प्राचीन मंदिरे, तिथली संस्कृती, परंपरा या सगळ्याचेच अनेक पर्यटकांना आकर्षण आहे. सौंदर्याने बहरलेले हे मालवण ‘विशू’ चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. अनेकदा चित्रीकरणासाठी महाराष्ट्राबाहेरील आणि परदेशातील बेटांचा विचार केला जातो. परंतु आपल्या महाराष्ट्रातही खूप सुंदर बेटं आहेत, याचा आपल्याला अनेकदा विसर पडतो. त्यापैकीच एका सुंदर बेटाचे दर्शन आपल्याला ‘विशू’ पाहिल्यावर घडणार आहे.
कोकणातील बेटावर चित्रीकरण
‘विशू’चे काही चित्रीकरण कोकणातील एका बेटावर करण्यात आले आहे. चित्रपटात सुंदर दिसणाऱ्या या बेटावर चित्रीकरण करणे तसे आव्हानात्मक होते. एकतर या बेटावर मोबाईलचे नेटवर्क नव्हते, त्यामुळे इतरांशी संपर्कात राहणे खूप कठीण होते. त्यात चित्रीकरण बेटावर आणि बाहेर कलाकरांच्या राहण्याची सोय त्यामुळे बोटीने ये-जा करावी लागत होती. तांत्रिकदृष्ट्याही हे कठीण जात होते. तरीही या सगळ्यावर मात करत ‘विशू’चे चित्रीकरण पूर्ण झाले.
याबाबत गश्मीर महाजनी (Gashmeer Mahajani) आणि मृण्मयी गोडबोले (Mrunmayee Godbole) म्हणतात,” मालवणमध्ये शूट करताना एक वेगळीच मजा आली. बाजूला इतके निसर्गसौंदर्य असताना काम करण्यातही एक वेगळाच उत्साह असतो. चित्रीकरणासाठी रोज बोटीने बेटावर जाणे, दगदगीचे होते, मात्र त्याचा कधी कंटाळा नाही आला. अनेकदा तांत्रिक अडचणी आल्या परंतु या जादुई बेटावर त्या अतिशय नगण्य वाटल्या. चित्रपट पाहताना प्रेक्षकही या बेटाच्या नक्कीच प्रेमात पडतील.” तर दिग्दर्शक मयूर शिंदे म्हणतात की, “आपल्या महाराष्ट्रातही निसर्गाची मुक्तहस्ते उधळण असलेली अनेक ठिकाणे आहेत आणि त्यापैकीच एक असलेल्या मालवणातील एका बेटाचा आम्ही चित्रीकरणासाठी विचार केला. ‘विशू’च्या निमित्ताने मालवणचे सौंदर्य प्रेक्षकांसमोर येईल. ही एक प्रेमकहाणी आहे, जी मालवणच्या निसर्गसौंदर्यात अधिकच खुलणार आहे.”
विशूची प्रेमकहाणी
श्री कृपा प्रॉडक्शन प्रस्तुत बाबू कृष्णा भोईर निर्मित या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन मयूर मधुकर शिंदे यांनी केले आहे. हृषिकेश कोळी यांनी विशू’चे संवाद, पटकथा केले असून या चित्रपटाला हृषिकेश कामेरकर यांचे संगीत लाभले आहे. तर मंगेश कांगणे यांनी गाणी शब्दबद्ध केली आहेत. ‘विशू’चे छायाचित्रण मोहित जाधव यांनी केले आहे.या चित्रपटात गश्मीर महाजनी, मृण्मयी गोडबोले यांच्यासोबत ऐताशा संझगिरी, मानसी मोहिले, मिलिंद पाठक, विजय निकम, संजय गुरुबक्शानी, प्रज्ञेश डिंगोरकर हे प्रमुखेत दिसणार आहे.
एक गोड प्रेमकहाणी
आपल्याकडे प्रेमकहाणीच्या कथा कधीच जुन्या होत नाहीत. प्रेमकहाणी या प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यात नेहमीच यशस्वी होतात. मराठीमध्ये फारच कमी प्रेमकहाणीवर चित्रपट प्रदर्शित होताना दिसतात. विशू ही अशीच एक गोड प्रेमकहाणी आहे. थोडी वेगळी अशी ही कहाणी घेऊन पहिल्यांदाच गश्मीर आणि मृण्मयी ही जोडी पडद्यावर दिसणार आहे. दिग्दर्शक मयूर मधुकर शिंदेने सांगितले की, ‘’हा एक कौटुंबिक चित्रपट असून ‘विशू’मधून एक गोड प्रेमकहाणी दाखवण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. चित्रपटाविषयी मी जास्त काही बोलणार नाही फक्त एकच सांगेन की, काही गोष्टींची जाणीव आणि सकारात्मकता देणारा हा चित्रपट आहे.’’ तर चित्रपटाचे दिग्दर्शक मयूर मधुकर शिंदे यांनी पुढे सांगितले की, ‘’या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी मी खूपच उत्सुक आहे. गश्मीर, मृण्मयी बरोबरच विशूमधील सगळ्याच कलाकारांसोबत काम करताना खूप मजा आली. मुळात हे सगळेच कसलेले कलाकार आहेत. दोन परस्परविरोधी स्वभाव जेव्हा एकत्र येतात तेव्हा काय होते, हे एका गोड प्रेमकहाणीमधून दाखवण्याचा प्रयत्न ‘विशू’मधून करण्यात आला आहे. मला खात्री आहे, हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल.’’ लवकरच हा चित्रपट येतोय प्रेक्षकांच्या भेटीला
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade