बॉलीवूड

कतरिना-विकीनंतर श्रद्धा कपूर अडकणार लग्नाच्या बेडीत, पद्मिनी कोल्हापुरेने दिली हिंट

Trupti Paradkar  |  Dec 9, 2021
कतरिना-विकीनंतर श्रद्धा कपूर अडकणार लग्नाच्या बेडीत, पद्मिनी कोल्हापुरेने दिली हिंट

लग्नाचा सीझन सध्या धुमधडाक्यात सुरू आहे. बॉलीवूडमध्येही एका पाठोपाठ एक सेलिब्रेटी कपल लग्नाच्या बेडीत अडकताना दिसत आहेत. राजकुमार-पत्रलेखाच्या लग्नानंतर लगेच कतरिना-विकीच्या लग्नाची धमाल सुरू झाली. एवढंच नाही लवकरच आपल्या सर्वांची आवडती अभिनेत्री श्रद्धा कपूरदेखील लग्नाच्या बेडीत अडकण्याची शक्यता आहे. श्रद्धा कपूर तिचा बॉयफ्रेंड रोहन श्रेष्ठसोबत रिलेशनशिपमध्ये आहे अशी चर्चा आहे. अशातच श्रद्धाची मावशी आणि दिग्गज पद्मिनी कोल्हापुरेने श्रद्धाच्या लग्नाची हिंटच तिच्या चाहत्यांना दिली आहे.

श्रद्धा कपूर होणार लवकरच नवरी 

श्रद्धा कपूर सर्वांचीच आवडती अभिनेत्री आहे. काही दिवसांपासून श्रद्धा तिचा मित्र लोकप्रिय फोटोग्राफर रोहन श्रेष्ठसोबत डेट करत आहे. बऱ्याचदा दोघांना एकत्र डिनर अथवा पार्टीसाठी जाताना स्पॉट केलं जातं. त्यामुळे लवकरच ते दोघं लग्न करणार अशी चर्चा चाहत्यांमध्ये  सुरू आहे. आता श्रद्धाची मावशी आणि अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरेने याबाबत एक हिंटच दिली आहे.

काय दिली आहे पद्मिनी कोल्हापुरेने हिंट

अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे ही एके काळी गाजलेली लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने काही दिवसांपूर्वीच तिचं चित्रपटात गाजलेलं गाणं “ये गलियॉं ये चौबारा”  रिक्रेएट व्हर्जन लॉंच केलं होतं.  या गाण्याला खुद्द पद्मिनी कोल्हापुरे यांनी स्वतःच्या आवाजात गायलं आहे. जेव्हा श्रद्धा कपूरने तिच्या मावशीचं म्हणजेच पद्मिनी कोल्हापुरेच्या गाण्याचा ट्रॅक इन्साग्रामवर शेअर केला. तेव्हा त्यावर पद्मिनी कोल्हापुरेने दिलेली प्रतिक्रिया म्हणजेच श्रद्धाच्या लग्नाची हिंट आहे. कारण हे गाणं लग्नातील गाणं आहे आणि पद्मिनी कोल्हापुरेने कंमेट केली आहे की “मी हे गाणं तुझ्या (श्रद्धा) च्या आणि वेदिकाच्या लग्नात गाणार आहे” यावरूनच श्रद्धा कपूर लवकरच लग्न करणार आणि तिच्या लग्नात मावशी तिचं फेव्हरेट गाणं गाणार असे संकेत मिळत आहेत . मावशीने जरी भाचीच्या लग्नाची तयारी सुरू केली असली तरी याआधी जेव्हा श्रद्धा कपूरचे वडील शक्ती कपूर यांना श्रद्धाच्या लग्नाविषयी विचारण्यात आले होते. तेव्हा त्यांनी श्रद्धा आणि रोहनच्या रिलेशनशिपविषयी त्यांना काहीच माहीत नाही, असं सांगितलं होतं. पण ते दोघं एकमेकांचे चांगले मित्र आहेत त्यामुळे एकत्र फिरतात हे त्यांनी मान्य केलं होतं. वडिलांनी परवानगी दिल्यावरच श्रद्धा आणि रोहनच्या लग्नाचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे शक्ती कपूर हे नातं मान्य करतील आणि लवकरच श्रद्धा आणि रोहन लग्न करतील अशी आशा चाहत्यांना वाटत आहे. 

Read More From बॉलीवूड